Gold-Silver Rate Today, 28 July 2022: सोने-चांदीच्या भावात वाढ, पटापट पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 28 July 2022: जागतिक बाजारातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा उसळी दिसून येत आहे. 27 जुलैला सोन्याच्या भावात (Gold Price) घसरण झाल्यानंतर आज पुन्हा सोन्याचा भाव तेजीत आहे. चांदीच्या भावातदेखील (Silver price) थोडी वाढ झाली आहे. या क्रमाने आज सोन्याचा भाव 51,000 च्या जवळ पोचला आहे.

Gold and Silver Rate Today: Gold Price rises
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात वाढ 
थोडं पण कामाचं
  • सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ
  • सोने 51,000 रुपयांजवळ पोचले
  • चांदी 1200 रुपयांनी महागली आहे

Gold and Silver Rate Today, 28 July 2022 : नवी दिल्ली : जागतिक बाजारातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर  आज आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा उसळी दिसून येत आहे. 27 जुलैला सोन्याच्या भावात (Gold Price) घसरण झाल्यानंतर आज पुन्हा सोन्याचा भाव तेजीत आहे. चांदीच्या भावातदेखील (Silver price) थोडी वाढ झाली आहे. या क्रमाने आज सोन्याचा भाव 51,000 च्या जवळ पोचला आहे. जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या भावात झालेल्या वाढीचा परिणाम भारतीय वायदे बाजारावरही दिसून येत आहे. सोने आणि चांदीचा ताजा भाव पाहूया. (Gold & Silver prices surge amid global trends)

अधिक वाचा : Deep Puja 2022: दीप पुजेच्या शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

सोने-चांदीचा ताजा भाव

मल्टीकमोडिटी एक्सचेंज म्हणजे एमसीएक्सवर(MCX)24-कॅरेट शुद्धतेच्या फ्युचर्सचा भाव सकाळी 178 रुपयांनी वाढून 50,898 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर MCX वर चांदीचा वायदा सकाळी 1,189 रुपयांनी वाढून 56,033 रुपयांवर पोहोचला. यापूर्वी सोन्याचा व्यवहार 50,760 रुपयांवर सुरू झाला होता, तर चांदीचा व्यवहार 55,345  रुपयांवर सुरू होता. सोने सध्या मागील बंद किमतीपेक्षा 0.35 टक्क्यांनी वाढले आहे, तर चांदी सध्या मागील बंद किमतीच्या तुलनेत 2.17 टक्क्यांनी वाढून व्यवहार करत आहे. वृत्त लिहेपर्यंत सोन्याचा भाव 50,970 वर आहे.

अधिक वाचा : Rakshabandhan: भावासाठी राखी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात, भावा-बहिणीमध्ये वाढेल प्रेम

जागतिक बाजारपेठेतही भाव वाढले

आज जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. अमेरिकन बाजारात आज सोन्याची स्पॉट किंमत 1,736.55 डॉलर प्रति औंस, तर चांदीची स्पॉट किंमत आज 19.26 डॉलर प्रति औंस होती. आज भारतीय वायदे बाजारात चांदीच्या किमतीत जोरदार झेप घेतली आहे. म्हणजेच जागतिक बाजाराचा परिणाम आज सोन्या-चांदीच्या भावावरही दिसून येत आहे.

अधिक वाचा : ४५ वर्षीय करोडपती महिलेने १४ वर्षीय मुलासोबत जबरदस्ती ठेवले शारीरिक संबंध आणि मग घडलं असं की...

सोन्याचा भाव असा तपासा 

तुम्हालाही सोन्या-चांदीचा भाव जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि त्यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल. येथे तुम्ही ताजा भाव तपासू शकता.

आता जागतिक बाजारातील परिस्थिती पाहायची तर मोठ्या घसरणीनंतर जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली आहे. चलनविषयक धोरणावर आणि पुढील वाटचालीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह या आठवड्यात बैठक घेणार आहे. डॉलरच्या मूल्यात 0.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे इतर चलने असलेल्या खरेदीदारांसाठी सोने अधिक महाग झाले आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. त्या बैठकीत अमेरिकेतील व्याजदर 75 बेस पॉइंट्सने वाढण्याची अपेक्षा आहे. वाढत्या महागाईने गुंतवणुकदारांना महागाईविरोधात बचाव करणाऱ्या मालमत्ता आणि गुंतवणूक प्रकारांकडे  वळवले आहे. डॉलरची उच्चांकावरून विक्री होते आहे आणि अमेरिकेच्या आर्थिक वाढीवरील चिंतेमुळे सोन्याची मागणी वाढली आहे. मोठ्या मध्यवर्ती बँकांकडून करण्यात आलेली आक्रमक दरवाढ आणि कडक वित्तीय उपाय सोन्याला मोठा प्रतिकार म्हणून काम करतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी