Gold price today | सोने-चांदीच्या भावात आज झाली वाढ मात्र अजूनही उच्चांकीच्या बरेच खाली...आहे खरेदीची संधी, पाहा ताजा भाव

Gold Jewellery : सोन्याचे भाव दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरल्यानंतर जागतिक दरात घट झाल्यामुळे आज भारतीय बाजारात सोने आणि चांदीचे भाव वाढले आहेत.अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी अजूनही संधी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी दिसत नसली तरी भारतात लग्नसराई आणि अक्षय तृतीया या दोन घटकांमुळे सोने आणि चांदीच्या भावात वाढ होण्याची चिन्हे आहेत.

Gold Price Today
सोन्याचा ताजा भाव 
थोडं पण कामाचं
  • सोने आणि चांदीच्या भावात आज झाली वाढ
  • अक्षय तृतीया आणि लग्नसराईमुळे भारतीय बाजारपेठेत तेजी
  • आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेतील व्याजदर, बॉंडचा परतावा यांचा सोन्यावर दबाव

Gold Price Today 25 April 2022 update : नवी दिल्ली : सोन्याचे भाव दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरल्यानंतर जागतिक दरात घट झाल्यामुळे आज भारतीय बाजारात सोने आणि चांदीचे भाव वाढले आहेत. एमसीएक्सवर ( MCX) सोन्याचे फ्युचर्स 0.58% वाढून 51,560 रुपये प्रति 10 ग्रॅम होते पण तरीही 18 एप्रिलच्या उच्चांकावरून सुमारे 2,000 रुपये खाली आहेत. चांदीचे भाव आज 0.5% वाढून 64,915 रुपये प्रति किलोवर पोचले आहेत. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी अजूनही संधी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी दिसत नसली तरी भारतात लग्नसराई आणि अक्षय तृतीया या दोन घटकांमुळे सोने आणि चांदीच्या भावात वाढ होण्याची चिन्हे आहेत. (Gold & Silver prices surged, but still lower than the record high, check the latest rate)

अधिक वाचा : PUC Rate hike | महाराष्ट्रातील पीयूसी चाचणी दर झाले महाग...जाणून घ्या नवीन दर

जागतिक घटकांचा प्रभाव

जागतिक बाजारात सोन्याचे भाव आज स्थिर होते आणि सराफा बाजाराने सात महिन्यांतील सर्वात मोठी मासिक घसरण नोंदवली. स्पॉट गोल्ड प्रति औंस 1,897.01 डॉलर वर 0.1% पर्यत वाढले. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या आक्रमक व्याजदर वाढीच्या भीतीमुळे सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. यामुळे डॉलर आणि अमेरिकन बाँडच्या परताव्यात वाढ झाली आहे. उच्च अल्प-मुदतीसाठीचे अमेरिकेतील व्याजदराचा सराफा बाजारावर थेट परिणाम होत असतो. 

“सोने 1875 डॉलरच्या पुढे जाण्याची  शक्यता कमी आहे. दिवसभरात यात वाढ होण्याची शक्यता आहे. 1875 डॉलरच्या खाली थेट घसरण लिक्विडेशन प्रेशर चालू ठेवेल,” असे जाणकारांचे म्हणणे आहे. जर चांदीने 23 डॉलरच्या सपोर्टच्या खाली आली तर त्यात आणखी घसरण होऊ शकते. असे झाल्यास पुन्हा रिकव्हरी होण्यास वेळ लागू शकतो, असेही जाणकारांना वाटते. 

अधिक वाचा : LIC IPO | एलआयसी आयपीओबद्दल जाणून घ्या सर्वकाही...पुढील आठवड्यात आयपीओ सुरू होईल, तुम्ही गुंतवणूक करावी का?

या आठवड्यात झाली होती घसरण

या आठवड्याच्या सुरुवातीला, सोने सुमारे दोन महिन्यांतील नीचांकी पातळीवर घसरले. कारण मजबूत डॉलरमुळे ग्रीनबॅक-किंमतीचे सोने इतर चलन धारकांसाठी कमी आकर्षक बनते. इतर मौल्यवान धातूंपैकी स्पॉट सिल्व्हर 0.2% वाढून 23.17 डॉलर प्रति औंस झाले तर प्लॅटिनम 0.1% घसरून 918.67 डॉलरवर आले.

सोने-चांदी स्थिरावले

“गुरुवारी, आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदी चढउतार नोंदवत स्थिरावली. सोन्या-चांदीच्या भावात तेजी आणू पाहणारे गुंतवणुकदार नुकत्याच झालेल्या किंमतीतील घसरणीला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. सोन्याच्या किंमती एका रात्रीत नऊ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर गेल्या. मजबूत यूएस डॉलर आणि वाढत्या बॉंड परताव्यामुळे अलीकडेच या दोन्ही मौल्यवान धातूंना दणका बसला आहे,” असे मेहता इक्विटीज लिमिटेडचे ​​व्हीपी कमोडिटीज राहुल कलंत्री म्हणाले.

अधिक वाचा : Elon to buy Cocoa-cola | "इलॉन, कोक विकत घेण्यासाठी तू खूप गरीब आहेस", कोका-कोला खरेदी करण्यावर मस्कच्या ट्विटवर इंटरनेटवर धूम...

अमेरिकन इफेक्ट

"अमेरिकन जीडीपी अहवालात -1.4% चे आश्चर्यकारकपणे घसरण दिसून आली. ते 1.0% च्या वाढीच्या अपेक्षेपेक्षा नकारात्मक आहे. त्या अहवालानंतर सोन्याच्या बाजारात सौम्य तेजी दिसून आली, परंतु वाढ होऊ शकली नाही. जपानी येन यूएस डॉलरच्या तुलनेत 20 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोचला. कारण बँक ऑफ जपानने महागाई वाढूनही कमी व्याजदरांबाबत आपली वचनबद्धता अधिक वाढवली आहे. दरम्यान, युरो चलन डॉलरच्या तुलनेत पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर आले कारण ऊर्जेच्या वाढत्या किंमती युरो झोनच्या अर्थव्यवस्थेला खिळखिळत आहेत. यूएस डॉलर निर्देशांक आज पुन्हा मजबूत झाला आहे आणि आणखी दोन वर्षांच्या उच्चांकावर पोचला आहे," असेही ते पुढे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी