Gold Price Today 14 April 2022 update : नवी दिल्ली : लग्नसराई (Wedding season) आली की आपल्याला दागिने आणि सोन्याचा भाव या गोष्टी डोळ्यासमोर येतात. आता लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे साहजिकच सोन्याच्या दागिन्यांची (Gold Jewellery)मागणी वाढल्याने सोन्या-चांदीच्या भावात वाढ (Gold-Silver Price) होताना दिसत आहे. सोने-चांदीची खरेदी वाढते आहे आणि भावदेखील वाढतायेत. मात्र तरीही तुम्हाला संधी आहे. सोने उच्च नव्या उच्चांकी पातळीवर जाण्यापूर्वी, तुम्हाला स्वस्त दरात सोने खरेदी करायचे असेल, तर ते खरेदी करा किंवा तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याच्या भावात घसरण होत होती मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने महाग झाले आहे. सोने 52913.00 रुपयांवर (Gold Price)व्यवहार करते आहे. चांदीचा भाव (Silver Price)देखील 68952 रुपयांवर पोचला आहे. (Gold & Silver prices to reach at new record level amid wedding season, check the latest rates)
अधिक वाचा : PPF investment limit : पीपीएफमधील करमुक्त गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचा केंद्राचा विचार
एमसीएक्सशिवाय सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 49702 रुपयांवर तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 54220 रुपयांवर आहे. त्याच वेळी, 20 कॅरेट सोन्याचा भाव 45183 रुपये आणि 18 कॅरेटचा भाव 40665 रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय 16 कॅरेट सोन्याचा दर 36147 रुपयांवर पोहोचला आहे.
24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने आलिशान असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.
अधिक वाचा : PM Kisan Samman Yojana: मोठी बातमी! या लोकांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळणार नाही
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
वाढत्या महागाईच्या काळात देशात सोन्याकडे लोकांची क्रेझ वाढत आहे. 2021-22 च्या पहिल्या 11 महिन्यांत (एप्रिल-फेब्रुवारी) देशातील सोन्याची आयात 73 टक्क्यांनी वाढून 45.1 अब्ज डॉलर झाली आहे. मागणी वाढल्याने सोन्याची आयात वाढली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत सोन्याच्या आयातीचा आकडा 26.11 अब्ज डॉलर होता.