सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या आजचे भाव

काम-धंदा
Updated Jul 01, 2019 | 18:56 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Gold, Silver: सोनेच्या दरात आज घसरण झाली आहे. आज सोने, चांदीच्या दरावर अमेरिका आणि चीन यांच्यात चांगली चर्चा झाल्याने परिणाम झाला. जाणून घ्या आजचे दर

gold rate
सोन्याचे दर  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई: पावसाळा सुरू झाल्याने लग्नसराईचा हंगाम संपल्यातच जमा आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीसाठी होणारी गर्दी थोडी कमी झालेली. तुम्ही जर सोन्याच्या खरेदीचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी ही गुडन्यूज आहे. आठवड्याभरात आज सोन्याचे दर चक्क घसरले आहेत. सोन्याच्या किंमतीत आठवड्यात पहिल्यांदाच घट झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीदारांसाठी आजचा दिवस चांगला म्हणण्यास हरकत नाही. दागिन्यांची घडणावळ करणाऱ्यांकडून घटलेल्या मागणीमुळे तसेच अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापाराबाबत तणाव कमी झाल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्या. सोमवारी सोन्याच्या दरात १३० रूपयांची घट पाहायला मिळाली. सोने १३० रूपयांनी कमी होत ते ३४,१४० रूपये प्रति दहा ग्रॅमवर घसरले. अखिल भारतीय सराफा संघाने ही माहिती दिली. 

जागतिक स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या घसरणीसोबत ते १,३८७.०९ डॉलर प्रति औंसवर पोहोचले. चांदीमध्ये तोटा होत ते १५.१७ डॉलर प्रति औंसवर पोहोचली होती. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे हरीश व्ही यांनी सांगितले, आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात घसरण होत ते १,३८८.०९ डॉलर प्रति औंसवर पोहोचले. 

सोन्याच्या दराचा या आठवड्यातील नीचांकी स्तर आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापाराबाबत पुन्हा चर्चा सुरू करण्याबाबत सहमती झाली आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारांनी पुन्हा जोखीम उचलण्याची तयारी दाखवली आहे. यामुळे गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सोन्याचे आकर्षण कमी झाले. त्याचा परिणाम त्याच्या किंमतीवर पाहायला मिळाला. 

औद्योगिक युनिट्स तसेच नाण्यांची निर्मिती करणाऱ्यांकडून मागणी घटल्याने चांदीच्या दरातही २६० रूपयांची घट होत ते ३८,७५० रूपयांवर पोहोचले. सोने ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात प्रत्येकी १३० रूपयांची घट होत ते प्रति ग्रॅम अनुक्रमे ३४,१४० रूपये आणि ३३,९७० रूपयांवर पोहोचले आहेत. 

शनिवारी सोन्याच्या किंमतीत १५ रूपयांची घट होत ते ३४,२७० रूपयांवर पोहोचले होते. तर चांदीच्या दरात २३० रूपयांची वाढ होत ते ३८,८३० रूपये प्रति किलोग्रॅम झाले होते. या दरम्यान, चांदी हाजिर २६० रूपयांनी कमी होत ३८,५७० रूपये प्रति किलोग्रॅम तर साप्ताहिक डिलीव्हरी २९५ रूपयांनी कमी होत ३७,१७५ रूपये प्रति किलोग्रॅमवर आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या आजचे भाव Description: Gold, Silver: सोनेच्या दरात आज घसरण झाली आहे. आज सोने, चांदीच्या दरावर अमेरिका आणि चीन यांच्यात चांगली चर्चा झाल्याने परिणाम झाला. जाणून घ्या आजचे दर
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola