Gold silver price fall: सोने-चांदीच्या किमती दररोज वर-खाली होत असतात. गेल्या काही दिवसांत सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली होती. मात्र, आता सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पहायला मिळालं. प्युअर सिल्वरच्या रेटमध्ये 400 रुपयांनी घसरण झाली आहे. तर 24 कॅरेट 8 ग्रॅम सोन्याच्या भावात 504 रुपयांनी घसरण झाली आहे. जाणून घ्या या घसरणीनंतर सोने आमि चांदीचे लेटेस्ट दर काय आहेत. (Gold silver rate today in mumbai thane pune nagpur check the latest price list in marathi)
24 कॅरेट 8 ग्रॅम सोन्याच्या भावात 504 रुपयांनी घसरण झाली आहे. तर 22 कॅरेट आणि 25 कॅरेटच्या एक आणि आठ ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे पाहुयात.
हे पण वाचा : मुलांना परीक्षेचं टेन्शन आहे हे कसं ओळखाल?
चांदीच्या भावाचं बोलायचं झालं तर यामध्येही घसरण झाली आहे. 28 जानेवारी रोजी बाजारात चांदीच्या भावात 400 रुपयांनी घसरण झाली आहे. यानुसार आता 1 ग्रॅम चांदीची किंमत 74.6 रुपये तर एक किलो चांदीचा भाव 74600 रुपये इतका झाला आहे.
हे पण वाचा : अशा मुलांवर मुली सहज होतात घायाळ
भारतात सोने-चांदीचा भाव वायदा बाजारातील ट्रेडिंगनुसार ठरतो. ज्या दिवशी ट्रेडिंग होते त्या दिवसाच्या क्लोजिंगचा भाव पुढील दिवसाचा बाजार भाव म्हणून गणला जातो. मात्र, ही एक सेंट्रल प्राईज असते. यामध्ये आणखी काही दर लावले जातात आणि मग वेगवेगळ्या शहरांतील सोने-चांदीचा भाव ठरतो. तसेच विक्रेता सोने-चांदीच्या दागिन्यांवर मेकिंग चार्ज सुद्धा लावतात.
हे पण वाचा : कोणती फळे साल न सोलता खावी आणि कोणी खाऊ नये?
24 कॅरेट गोल्ड 99.9 टक्के शुद्ध असतो आणि 22 कॅरेट जवळपास 91 टक्के शुद्ध असतो. 22 कॅरेट गोल्डमध्ये 9 टक्के इतर धातू ज्यामध्ये तांबे, चांदी, जिंक मिसळून दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध असल्याने त्यापासून दागिने बनवता येत नाही.