Gold Rate: सोनं-चांदी पुन्हा महागलं, जाणून घ्या काय आहेत आजचे दर

काम-धंदा
Updated Sep 03, 2019 | 20:05 IST

सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा तेजी पहायला मिळाली आहे. गेल्या सोमवारी स्वस्त झालेल्या सोन्याच्या दरात आता पुन्हा वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर किमतीत वाढ झाल्याने सोनं आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे

Gold Rate
सोनं-चांदीच्या दरात वाढ  |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

  • सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ
  • सोनं-चांदी खरेदी करणं झालं महाग
  • सोमवारी झालेल्या घसरणीनंतर आता पुन्हा एकदा सोनं-चांदीच्या दरात तेजी

नवी दिल्ली: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा तेजी आल्याचं दिसून आलं. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात ५३८ रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात झालेल्या या दरवाढीमुळे सोन्याचा दर ३८९८७ रुपयांच्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेजीमुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. केवळ सोन्याच्या दरातच नाही तर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.

दिल्लीतील सराफा बाजारात चांदीच्या दरात १०८० रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे चांदीचा दर ४७,९६० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असेलल्या व्यापार युद्धामुळे सोन्याचा दर वाढला आहे. तसेच बाजारातील अनियमितता हे सुद्धा सोनं-चांदी महागण्या मागचं एक कारण असल्याचं बोललं जात आहे.

शेअर बाजारही गडगडला

मंगळवारी सकाळी बाजारात घसरण झाली होती आणि त्यानंतर सोनं - चांदीच्या दरात तेजी आल्याचं पहायला मिळालं. दुसरीकडे शेअर बाजारात आलेली घसरण आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण या सर्वांचाही परिणाम सोन्याच्या दरवाढीला कारणीभूत ठरलं आहे. आज (मंगळवारी) रुपयात ६७ पैशांची घसरण झाली आणि त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया ७२.०९ वर पोहोचला. आज सेन्सेक्समध्ये ७६९ पॉईंट्सच्या घसरणीनंतर ३६,५६२ अंकांवर बंद झाला. 

सोमवारी सोन्याच्या दरात घसरण

सोमवारी (२ सप्टेंबर) सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पहायला मिळालं होतं. सोमवारी सोन्याच्या दरात ४० रुपयांनी घसरण झाली होती आणि त्यामुळे सोन्याचा दर ३९,६०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला होता. गेल्या अेक दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सलग वाढ होत होती त्याच दरम्यान सोमवारी सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाल्यामुळे नागरिकांना एक दिलासा मिळाला होता. या घसरणीमुळे सोनं खरेदीत वाढ होईल असा अंदाज होता. मात्र, आता मंगळवारी पुन्हा एकदा सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. 

गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी पहायला मिळाली होती. अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे तसेच डॉलर मजबूत स्थितीत पोहोचल्याने सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचा दर हा नवनवा उच्चांक गाठत असल्याचं दिसत आहे. MCX वर सोन्याच्या दरात १८५ रुपयांच्या तेजीसह ३९,२७२ रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीच्या दरात ५०९ रुपयांची वाढ होत ४७,९९८ रुपयांवर पोहोचला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...