Gold-Silver Rate: सोन्याच्या दरात किंचित घसरण; देशांतर्गत बाजारात मागणी घटली

काम-धंदा
Updated Jun 26, 2019 | 19:29 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Gold-Silver Rate: भारतात आज सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. दिल्लीच्या सराफ बाजारपेठेत आज, सोन्याचा दर तोळ्यामागे ३०० रूपये तर चांदीचा दर किलोमागे ५०० रूपयांनी घसरला आहे. नफेखोरीमुळे ही घसरण झाली आहे.

Gold Silver Rates
सोने-चांदी दरांत घसरण (प्रतिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली : भारतात आज सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. दिल्लीच्या सराफ बाजारपेठेत आज, सोन्याचा दर प्रति तोळा (१० ग्रॅम) ३०० रूपयांनी घसरला. सोन्याला स्थानिक बाजारातून मागणी कमी असल्यानं दर घसरल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर विदेशातही सोन्याचे दर घसरल्याची माहिती आहे. दुसरीकडं चांदीच्या दरात खूप मोठी घसरण पाहायला मिळाली. चांदीचा दर प्रति किलो ५०० रूपयांनी घसरला. दिवसभरात दिल्लीच्या बाजारात चांदी ३८ हजार १७० रूपये किलो दराने विकली गेली. तर सोन्याचा दर ३०० रूपयांच्या घसरणीनंतर ३४ हजार १७० रूपये प्रति तोळा होता. देशांतर्गत बाजारात औद्योगिक क्षेत्रातून आणि नाणी निर्मात्यांकडून चांदीची मागणी कमी असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

गुंतवणूकदारांची नफेखोरी

या संदर्भात बाजारात मागणी कमी असल्यामुळे दर घसरल्याचे निरीक्षण सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या लग्न सराई संपली आहे. कोणताही सण समारंभ नाही. त्याचा परिणाम दागिन्यांच्या मागणीवर झाल्याचा दिसत आहे. नव्या दागिन्यांना मागणी नाही. त्यामुळं सोन्याच्या चांदीचे दागिने तयार करणाऱ्यांकडे सोन्याची मागणी कमी होते. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर, सोन्याचा दर १४०७ डॉलर प्रति औंस तर चांदीचा १५.२२ डॉलर प्रति औंसच्या आसपास राहिला आहे. याबाबत एचडीएफसी सिक्युरिटीजचे सिनिअर अॅनालिस्ट (कमॉडिटी) तपन पटेल म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर १४१० डॉलर प्रति औंसच्या खाली जात आहे. डॉलरच्या मुल्यामध्ये होत असलेली सुधारणा त्याचे प्रमुख कारण आहे. सोन्यात गुंतवणूकदारांनी नफेखोरी सुरू केली आहे. त्याचा परिणाम दरावर होताना दिसत आहे. अमेरिकी सरकारच्या एका अधिकाऱ्याने अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार करार ९० टक्के पूर्णत्वास आल्याची घोषणा केल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे.’

काय आहेत दिल्लीतील दर?

देशातील सोन्या-चांदीच्या दरांवर नजर टाकली तर राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा दर ३०० रूपयांनी घसरून ३४ हजार १७० रूपये तोळा झाला आहे. तर ९९.५० टक्के शुद्ध सोन्याचा दर ३०० रूपयांनीच घसरून ३४ हजार रूपये झाला आहे. पण, आठ ग्रॅमचे सोन्याचे नाणे केवळ १०० रूपयांनी घसरून २६ हजार ८०० रूपयांवरच राहिले आहे. चांदीमध्ये ५०० रूपयांची घसरण झाली आहे. चांदीचा दर ३९ हजार ०९० रूपये प्रति किलो आहे. चांदीच्या नाण्याचा लिलाव ८१ हजार रूपयांना होत असून विक्री ८२ हजार रूपयांना होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Gold-Silver Rate: सोन्याच्या दरात किंचित घसरण; देशांतर्गत बाजारात मागणी घटली Description: Gold-Silver Rate: भारतात आज सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. दिल्लीच्या सराफ बाजारपेठेत आज, सोन्याचा दर तोळ्यामागे ३०० रूपये तर चांदीचा दर किलोमागे ५०० रूपयांनी घसरला आहे. नफेखोरीमुळे ही घसरण झाली आहे.
Loading...
Loading...
Loading...