Gold Silver rate: सोन्याला आणखी झळाळी; दिवाळीपर्यंत सोने कितीच्या घरांत जाणार?

काम-धंदा
Updated Aug 13, 2019 | 18:05 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Gold Silver rate: कमॉडिटी मार्केटमध्ये मध्ये सध्या सोन्याचा भाव गेल्या सहा वर्षांतील उच्चांकी पातळीवर गेला आहे. भारतात एमसीएअसमध्ये सोन्याच्या भावाने विक्रम केला आहे. तर, दिल्लीच्या बाजारात चांदीने तेजी घेतलीय.

Gold Silver Rates
सोने-चांदी दरांत तेजी कायम (फाइल फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • सोने-चांदी दरात पुन्हा तेजी; दिवाळीपर्यंत सोने चाळीस हजारांच्या घरात जाणार
  • डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण; हाँगकाँगमधील आंदोलनाचा शेअर बाजारावर परिणाम
  • जागतिक अर्थव्यवस्थेत फारशी समाधानकारक स्थिती नाही; गुंतवणूकदारांचा सोन्याकडे वाढता कल

मुंबई : शेअर बाजारात सध्या गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक करताना मंदीत चांदी असं म्हटलं जात असलं तरी, दिवसेंदिवस खाली येणारा शेअर बाजार आणखी किती खाली येणार याचा अंदाज येत नसल्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदार सध्या सावध आहेत. त्यामुळेच सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. विशेषतः कमोडिटी मार्केटमध्ये मध्ये सध्या सोन्याचा भाव गेल्या सहा वर्षांतील उच्चांकी पातळीवर गेला आहे. भारतात एमसीएक्समध्ये सोन्याच्या भावाने विक्रम केला आहे. तर, दिल्लीच्या सराफ बाजारात चांदीच्या भावाने उच्चांक गाठला आहे. चांदीच्या भावात प्रति किलो दोन हजार रुपयांनी झपाट्याने वाढ झाली आहे. तर सोन्याचं ८ ग्रॅमचं नाणं २०० रुपयांनी महाग होऊन २८ हजार ८०० रुपयांवर गेलं आहे. तर सराफा बाजारात सोन्याचा भाव १०० रुपयांनी घसरून ३८ हजार ३७०वर आला आहे. येत्या काही दिवसांत सोन्या चांदीच्या दरातील ही तेजी कायम राहण्याची चिन्हे आहेत.

रुपयाची घसरण कारणीभूत

कमोडिटी मार्केट (वायदे बाजारात) सोन्याचा दर ३२९ रुपयांनी तेजी असून, तो प्रति तोळा २८ हजार ५७० रुपयांवर गेला होता. चांदी ७८४ रुपयांनी महागली आणि ४४ हजार ४५० रुपयांवर गेली. मुळात वायदे बाजारातील किंमत आणि प्रत्यक्ष सराफ बाजारातील किंमत यात फरक अतो. या संदर्भात केडिया कमॉडिटीचे प्रमुख अजय केडिया म्हणाले, ‘डॉलरच्या तुलनेत रुपया दिवसेंदिवस घसरत चालला आहे. डॉलरचा दर ७१.३९ रुपयांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा विचार केला तर, हाँगकाँगमध्ये सुरू असणारी राजकीय आंदोलने आणि रुपयाची घसरती किंमत सोन्याच्या दरांमध्ये वाढ होण्यास कारणीभूत आहे.’ मुंबईच्या रिटेल मार्केटमध्ये सोन्याचा दर, ५८१ रुपये तेजीने सुरू झाला. त्यावेळी सोन्याचा भाव प्रति तोळा ३७ हजार ८३२ रुपये होता. तर चांदी ४४ हजार रुपये किलो होती. चांदीच्या दरात आज १०१० रुपयांची तेजी पहायला मिळाली. आता चांदी ४४ हजार ०८५ रुपये किलो दराने मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम

हाँगकाँगमध्ये सरकार विरोधात आंदोलन सुरू आहेत. त्यात पाश्चिमात्य देशांनी हस्तक्षेप करू नये, असा इशारा चीनने दिला आहे. चीनची भूमिका आणि एकूण जागतिक अर्थव्यवस्था पाहता हाँगकाँगमधील आंदोलनाचा जगभरातील शेअर बाजारावर परिणाम होण्याचा धोका आहे. सध्या हाँगकाँगला जाणाऱ्या अनेक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. त्याचवेळी चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युद्ध टोकाला गेले आहे. अर्जेंटिनाच्या चलनामध्येही घसरण पहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर बँकांनी मॉनिटररी पॉलिसीमध्ये नरमाईची भूमिका घेतली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत फारशी समाधानकारक स्थिती नसल्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहे. इंडिया निवेशमधील कमोडिटी विभागाचे प्रमुख मनोज कुमार जैन यांच्या म्हणण्यानुसार सोने आणि चांदीच्या दरात आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. एँजल ब्रोकिंगच्या अनुज गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार दिवाळीपर्यंत सोने प्रति तोळा ४० हजार रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात याचे परिणाम दिसू लागले आहेत. सोने कारागिरांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या ग्राहकांकडून सोन्याची मागणी कमी होताना दिसत असून, ग्राहक जुने सोने विकण्यासाठी येत असल्याचे दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
Gold Silver rate: सोन्याला आणखी झळाळी; दिवाळीपर्यंत सोने कितीच्या घरांत जाणार? Description: Gold Silver rate: कमॉडिटी मार्केटमध्ये मध्ये सध्या सोन्याचा भाव गेल्या सहा वर्षांतील उच्चांकी पातळीवर गेला आहे. भारतात एमसीएअसमध्ये सोन्याच्या भावाने विक्रम केला आहे. तर, दिल्लीच्या बाजारात चांदीने तेजी घेतलीय.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...