आनंदाची बातमी।। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढणार?

काम-धंदा
भरत जाधव
Updated Jan 12, 2022 | 11:35 IST

राज्य शासकीय कर्मचऱ्यांना (State Government, Employees) मागील तीन महिन्यांपासून थांबलेला वाढीव 3 टक्के महागाई भत्ता  (DA) देण्याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारने (Government of Maharashtra) सरकारात्मकता दाखवली आहे.

DA to increase state government employees
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव महागाई भत्ता
  • जानेवारी महिन्याच्या वेतन देयकसोबत मिळणार भत्ता

मुंबई : राज्य शासकीय कर्मचऱ्यांना (State Government, Employees) मागील तीन महिन्यांपासून थांबलेला वाढीव 3 टक्के महागाई भत्ता  (DA) देण्याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारने (Government of Maharashtra) सरकारात्मकता दाखवली आहे. कोरोनाच्या (Corona) महामारीच्याा काळात कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लांबणीवर जाणार असे प्रत्येक कर्मचाऱ्यांना वाटत होते. परंतु राज्य सरकारने जानेवारी महिन्याच्या वेतन देयकसोबत राज्य कर्मचाऱ्यांचा 3 टक्के महागाई  भत्ता दिला जाणार आहे. या विषयावर वित्त विभागासोबत चर्चा झाली आहे.

हा वाढीव महागाई भत्ता केंद्र सरकरच्या नियमाप्रमाणे 1 जुलै 2021 पासून लागू केला जाणार आहे. तसेच 1 जुलै 2021 पासून डिसेंबर 2021 पर्यंत  3 टक्के महागाई भत्ता यामधील फरक सुद्धा सोबत दिला जाणार आहे. हा वाढीव महागाई भत्ता सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू असणार आहे. राज्य शासकीय कर्मचारी यांच्यामध्ये महागाई भत्ता मिळणे बाबत मोठा असंतोष वाढत असल्याने राज्य सरकारने  याबाबत निर्णय अधिक योग्य ठरेल. जर राज्य कर्मचाऱ्यांना  याबाबत आंदोलन केल्यास कोरोना महामारीचा संसर्ग जास्त मोठा प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने राज्य शासनाकडून कर्मचाऱ्यांना आंदोलन करणयाबाबत विरोध केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी