DA and DR Hike update : नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा (Central Employees) महागाई भत्ता (DA) सरकारने 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यांवर 3 टक्क्यांनी वाढवला आहे. यामुळे केंद्र सरकारचे कर्मचारी खूश आहेत. मात्र आता हा आनंद फक्त नियमित केंद्रीय कर्मचाऱ्यांपुरताच मर्यादित नाही. केंद्र सरकारच्या पेन्शनर्ससाठीदेखील आनंदाची बातमी आहे. त्यांच्या पेन्शनमध्ये आता वाढ होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पेन्शनधारकांच्या महागाई रिलीफ (DR) मध्येही ३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2022 च्या संदर्भात दरांमध्ये वाढ करण्यात आली होती. महागाई भत्त्यातील वाढ आणि डीआरमधील वाढीमुळे 47 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. (Good News for Central government employees & pensioners, check the benefits)
सरकारच्या अधिकृत घोषणेनुसार वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर डीएमध्ये वाढ करण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार त्यांची वाढ करण्यात आली आहे. इंधनाच्या महागाईबरोबरच अन्नधान्याच्या महागाईने सर्वसामान्यांच्या खांद्यावर मोठा ताण पडला आहे. ताज्या सरकारी अंदाजानुसार ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) मार्च 2022 मध्ये 6.95 टक्क्यांवर पोचला आहे.
अधिक वाचा : PPF investment limit : पीपीएफमधील करमुक्त गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचा केंद्राचा विचार
प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार DR वाढीमुळे खालील निवृत्तीवेतनधारकांवर परिणाम होईल.
अधिक वाचा : PM Kisan Samman Yojana: मोठी बातमी! या लोकांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळणार नाही
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर यावर्षी वाढणार नाही. सध्या सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्यास इच्छिक नाही. कोरोना महामारी (Covid-19)आणि महागाईमुळे (Inflation) हा अतिरिक्त आर्थिक बोजा सध्या वाढवता येणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वेतन आयोगापर्यंत फिटमेंट फॅक्टरवर कोणताही निर्णय होणे शक्य नाही. पुढील वेतन आयोग कधी येईल हे सांगणेही कठीण आहे. सरकार असा फॉर्म्युला बनवण्याचा प्रयत्न करते आहे की ज्यामुळे वेळोवेळी पगार वाढेल आणि कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल. खरं तर, केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचार्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्क्यांवरून 3.68 टक्क्यांपर्यंत वाढवावा, अशी दीर्घकाळापासूनची मागणी होती. दुसरीकडे, मार्च महिन्याच्या पगारात वाढीव फिटमेंट फॅक्टर जाहीर केला जाऊ शकतो, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती. मात्र आता या आघाडीवर कर्मचाऱ्यांच्या हाती निराशा पडणार आहे.