कोरोनाच्या काळामुळे (Corona pandemic) गेल्या वर्षी अनेक कंपन्यांच्या (companies) कर्मचाऱ्यांचा (employees) पगार (salary) वाढलेला नाही. पण इन्क्रीमेंटची (increment) वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी (good news) आहे. कोरोनानंतर कारभारात वेगाने सुधारणा (improvements) होत आहेत. त्यामुळे या वर्षी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवू शकतात. एका फर्मने सांगितले आहे की यावर्षी आपल्या पगारात सरासरी 7.3 टक्क्यांची वाढ होऊ शकते. ही वाढ गेल्यावर्षीच्या तुलनेत खूप चांगली आहे. ही वाढ 2020च्या 4.4 टक्क्यांपेक्षा जास्त पण 2019च्या 8.6 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यावर्षी सर्वेक्षणात (survey) सहभागी झालेल्या 92 टक्के कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याबद्दल संकेत दिले आहेत. गेल्यावर्षी 60 टक्के कंपन्याच पगार वाढवण्याबद्दल बोलल्या होत्या.
हे सर्वेक्षण 2020मध्ये चालू झाले आणि यात सात क्षेत्रांमधील साधारण 400 कंपन्या सहभागी झाल्या होत्या यात म्हटले गेले आहे की भारतात सरासरी वेतनवाढ 7.3 टक्के राहण्याची अपेक्षा आहे जी 2020मध्ये 4.4 टक्के होती. यात यंदा वाढ झाली आहे. आर्थिक उलाढालींमध्ये वेगाने सुधारणा आणि चांगल्या मार्जिनमुळे कंपन्यांनी वेतनवाढीसाठी आपले बजेट वाढवले आहे.
या सर्वेक्षणानुसार 20 टक्के कंपन्यांनी यावर्षी दोन अंकी वेतनवाढ देण्याची योजना केली आहे. 2020मध्ये हा आकडा फक्त 12 टक्के होता. सर्वेक्षणानुसार ज्या कंपन्यांनी गेल्या वर्षी वेतनवाढ दिली नव्हती त्यापैकी एक तृतियांश कंपन्या यावर्षी वाढ किंवा बोनसच्या रुपात याची भरपाई करण्याच्या तयारीत आहेत.
या सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात सर्वात अधिक वेतन वाढ होण्याची आशा आहे तर मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस क्षेत्रातील कंपन्या सर्वात कमी वेतनवाढ देण्याची शक्यता आहे.