PM Kisan Yojana 11th Installement Released: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पंतप्रधान मोदींनी लागू केली PM Kisan Yojana चा 11वा हफ्ता, लवकर तपासा यादीतले तुमचे नाव!

PM Kisan 11th Installment: पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Scheme) लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. पीएम मोदी किसान सम्मान निधीचा 11वा हफ्ता लागू करण्यात आला आहे

Good news for farmers! PM Modi implements 11th week of PM Kisan Yojana, check your name
पंतप्रधान मोदींनी लागू केली PM Kisan Yojana चा 11वा हफ्ता  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • PM Kisan 11th Installment: पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Scheme) लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे.
  • पीएम मोदी किसान सम्मान निधीचा 11वा हफ्ता लागू करण्यात आला आहे
  • याअंतर्गत 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 21,000 कोटी रुपये पोचले आहेत.

नवी दिल्ली : PM Kisan 11th Installment: पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Scheme) लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. पीएम मोदी किसान सम्मान निधीचा 11वा हफ्ता लागू करण्यात आला आहे. याअंतर्गत 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 21,000 कोटी रुपये पोचले आहेत. तुम्हीही त्यात लगोलग आपले नाव तपासून घ्या.  (Good news for farmers! PM Modi implements 11th week of PM Kisan Yojana, check your name )

पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी मोठीच आनंदाची बातमी आहे. पीएम मोदींनी काल 31 मे 2022 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 11वा हफ्ता लागू केला आहे. याअंतर्गत जवळपास 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 21,000 कोटी रुपये पाठवले आहे. 

केंद्र सरकारने आपली 8 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने हिमाचल प्रदेशाची राजधानी शिमलामध्ये राष्ट्रीय स्तरावर ‘गरीब कल्याण संमेलना'चे आयोजन केले होते. यानिमित्ताने पीएम मोदीही शिमला येथे उपस्थित होते. यादरम्यान केंद्राच्या के आठ मंत्रालयांच्या 16 योजनांअंतर्गत देशाच्या हरेक जिल्ह्यातून निवडलेल्या लाभार्थींशी पीएम मोदींनी व्हर्चुअल संवादही केला.

तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर लवकर तुमचे नाव आणि खाते चेक करा. असे स्टेप बाय स्टेप चेक करा लाभार्थींचे नाव: 
 

  1. यासाठी सर्वात आधी पीएम किसान योजनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. https://pmkisan.gov.in 
  2. आता होमपेजवर तुम्हाला Farmers Corner चा पर्याय दिसेल.
  3.  Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List च्या पर्यायावर क्लिक करा. 
  4. आता तुम्ही ड्रॉप डाउन लिस्टमधून राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक आणि गाव निवडा.
  5. यानंतर 'Get Report' वर क्लिक करा. 
  6.  यानंतर लाभार्थींची संपूर्ण यादी समोर येईल. यात तुम्ही तुमचे नाव तपासू शकता. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी