7th Pay Commission : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात आले डीए थकबाकीचे पैसे, लगेच तपासा

Maharashtra Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्र सरकारनंतर अनेक राज्यांनीही डीए (Dearness Allowance)वाढवला आहे. अनेक राज्यांतील कर्मचाऱ्यांचा डीए देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 34% इतका आहे. आता महाराष्ट्र सरकारही (Maharashtra Government)आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी देत ​​आहे. याआधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन हप्ते आले आहेत. आता सरकारने जूनपासूनच तिसरा हप्ता पाठवण्यास सुरुवात केली आहे.

7th pay commission latest news in Marathi
सातव्या वेतन आयोगाची ताजी बातमी 
थोडं पण कामाचं
  • केंद्र सरकारनंतर अनेक राज्यांनीही डीए वाढवला आहे
  • महाराष्ट्र सरकारही (Maharashtra Government)आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यातील थकबाकी देते आहे
  • सरकारने जूनपासूनच तिसरा हप्ता पाठवण्यास सुरुवात केली

7th Pay Commission Latest News: मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central government employees)31 टक्के महागाई भत्ता (Dearness Allowance) देण्यासंदर्भात मंजूरी मिळाली आहे. मात्र अद्याप केंद्रीय कर्मचारी 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याच्या थकबाकीच्या (DA Arrear) प्रतिक्षेत आहेत. या १८ महिन्यांच्या थकित महागाई भत्त्याची रक्कमदेखील लवकरात लवकर मिळावी यासाठी कर्मचारी संघटना चर्चा करत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  याआधीच महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government)आपल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन हप्ते जमा केले आहेत. आता सरकारने जूनपासूनच तिसरा हप्ता पाठवण्यास सुरुवात केली आहे.(Good news for Maharashtra government employees as DA arrear credited to accounts)

अधिक वाचा : ITR Filing: प्राप्तिकर विवरणपत्राची शेवटची तारीख, नेमका किती कर भरावा आणि कर नियोजन कसे करावे, जाणून घ्या

केंद्र सरकारनंतर अनेक राज्यांनीही डीए (Dearness Allowance)वाढवला आहे. अनेक राज्यांतील कर्मचाऱ्यांचा डीए देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 34% इतका आहे. आता महाराष्ट्र सरकारही (Maharashtra Government)आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी देत ​​आहे. याआधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन हप्ते आले आहेत. आता सरकारने जूनपासूनच तिसरा हप्ता पाठवण्यास सुरुवात केली आहे. तुमच्या माहितीसाठी तिसरा हप्ता जून ते ऑगस्ट दरम्यान कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाणार आहे.

कसा मिळणार डीएचा हफ्ता

विशेष म्हणजे महाराष्ट्रात सन 2019 मध्ये राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. यानंतर, सरकारने निर्णय घेतला की 5 वर्षांत आणि 2019-20 वर्षापासून पाच हप्त्यांमध्ये कर्मचार्‍यांना त्यांची थकबाकी दिली जाईल. याअंतर्गत आतापर्यंत कर्मचाऱ्यांना 2 हप्ते मिळाले आहेत. आता तिसरा हप्ता खात्यात येऊ लागला आहे. यानंतर चौथा आणि पाचवा हप्ता अधिक शिल्लक राहील.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 25 July 2022: सोन्यावरील अस्थिरतेचे सावट कायम, चांदीच्या भावातदेखील घसरण, पाहा ताजा भाव

कर्मचाऱ्यांची दिवाळी

शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ लागले आहेत. तुम्ही महाराष्ट्र सरकारचे कर्मचारी असाल तर तुमचे खाते तपासा. याअंतर्गत कर्मचाऱ्यांमधील गट अ अधिकाऱ्यांना 30 ते 40 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर गट ब अधिकाऱ्यांना 20 ते 30 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. या अंतर्गत क गटातील लोकांना 10 ते 15 हजार रुपये आणि चौथ्या श्रेणीतील लोकांना 8 ते 10 हजार रुपये मिळतील. महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना 31% DA चा लाभ मिळतो आहे.

अधिक वाचा : ATM Safety Tips : एटीएम वापरणाऱ्यांनी या टिप्स लक्षात ठेवाव्यात, नाहीतर होईल फसवणूक...

महागाई भत्त्याचे कॅल्क्युलेशनमध्ये बदल

केंद्र सरकारने (Central Government) केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्याच्या कॅल्क्युलेशनमध्ये (Calculation for DA)काही बदल केले आहेत. केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाद्वारे अलीकडेच हा फॉर्म्युला बदलण्यात आला आहे. त्यामुळे आता महागाई भत्त्याचे (Dearness Allowance) कॅल्क्युलेशन करताना 1963-65 या आधारभूत वर्षाऐवजी नवे वेतन दर निर्देशांक नवीन आधारभूत वर्ष 2016ला मानले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या (ILO) शिफारशींनुसार राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने कक्षा रुंदावण्यासाठी आणि निर्देशांकाच्या कक्षेत सुधारणा करण्यासाठी 1963-65 हे आधारभूत वर्ष बदलून त्याऐवजी 2016 हे आधारभूत वर्ष स्वीकारले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी