Pension Scheme : कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ, ज्यादा पेन्शनसाठी EPFO कडे 1.2 लाख अर्ज

EPFO Higher Pension : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना करोडो ईपीएस सदस्यांना उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ देत आहे. आतापर्यंत एकूण 1.20 लाख लोकांनी यासाठी अर्ज केले आहेत.

Good news for PF account holders, now they will get more pension; Apply by this date
कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये लवकरच वाढ, ज्यादा पेन्शनसाठी EPFO कडे 1.2 लाख अर्ज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आता कर्मचाऱ्यांना अधिक निवृत्ती वेतनाचा लाभ मिळू शकणार
  • EPFO ​​ने आपल्या EPS सदस्यांना पेन्शन योजनेत अधिक योगदान देण्याची परवानगी दिली.
  • उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची मुदत वाढ

Employees Pension Scheme : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) EPS सदस्यांना उच्च पेन्शन मिळण्याची सुवर्ण संधी मिळत आहे. कर्मचाऱ्यांना या संधीचा पुरेपूर फायदा घेत आहेत. 9 मार्च 2023 पर्यंत एकूण 1,20,279 लोकांनी ऑनलाइन EPFO ​​पोर्टलवर उच्च पेन्शनसाठी अर्ज केले आहेत. सरकारने गुरुवारी संसदेत ही माहिती दिली. (Good news for PF account holders, now they will get more pension; Apply by this date)

अधिक वाचा : Aadhaar Update Steps in marathi: आता Aadhaar अपडेट होईल फुकटात; UIDAI ने दिली माहिती

तुम्ही ३ मे पर्यंत अर्ज करू शकता

कर्मचारी पेन्शन योजनेच्या विद्यमान नियमांनुसार, कोणत्याही कर्मचार्‍यांचे मूळ वेतन जास्त असू शकते, परंतु त्यांना पेन्शनमध्ये केवळ 15,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी मिळायची. मात्र आता नियमात बदल केल्यानंतर 15 हजार रुपयांची मर्यादा हटवण्यात आली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना अधिक निवृत्ती वेतनाचा लाभ मिळू शकणार आहे. 1 सप्टेंबर 2014 पूर्वी जे लोक ईपीएस सदस्य आहेत तेच या उच्च पेन्शनमध्ये गुंतवणूक करू शकतात. उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ५ जानेवारीपासून सुरू करण्यात आली होती. त्याची अंतिम मुदत 3 मार्च 2023 रोजी संपणार होती, जी आता 3 मे 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. EPFO ने 13 मार्च रोजी एक अधिसूचना जारी करून मुदत वाढवण्याबाबत माहिती दिली आहे. गेल्या वर्षी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, EPFO ​​ने आपल्या EPS सदस्यांना पेन्शन योजनेत अधिक योगदान देण्याची परवानगी दिली.

अधिक वाचा : 7th pay commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देऊ शकते मोठे गिफ्ट; इतकी वाढेल सॅलरी

अधिक पेन्शन मिळविण्यासाठी अर्ज कसा करावा?

  1. जर तुम्ही 1 सप्टेंबर 2014 पूर्वी EPS चे सदस्य असाल तर तुम्ही या अधिक पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहात.
  2. जास्त पेन्शनसाठी, सर्वप्रथम ईपीएफओच्या कार्यालयात जावे लागेल.
  3. तेथे तुम्हाला यासाठी अर्ज भरावा लागेल.
  4. पुढे, तुम्हाला संयुक्त पर्यायामध्ये डिस्क्लेमर आणि डिक्लेरेशनचा पर्याय निवडावा लागेल.
  5. यासोबतच मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रेही सादर करावी लागणार आहेत.
  6. येथे तुम्हाला आधारशी लिंक केलेला नोंदणीकृत क्रमांक टाकावा लागेल.
  7. या संपूर्ण प्रक्रियेनंतर अर्जदाराला एक पावती क्रमांक मिळेल.
  8. अर्ज तपासल्यानंतर, तुम्हाला ईमेल किंवा एसएमएसद्वारे सूचित केले जाईल.
  9. त्यामुळे अनेकांनी ई-लेबर पोर्टलवर आपली नोंदणी केली
  10. ई-लेबर पोर्टलबद्दल माहिती देताना सरकारने गुरुवारी संसदेत माहिती दिली की 10 मार्च 2023 पर्यंत या पोर्टलवर एकूण 28.64 कोटी कामगारांनी अर्ज केले आहेत. यापैकी २.६७ कोटी महिला कामगार आहेत. यासोबतच 31 मार्च 2022 पर्यंत ई-श्रम पोर्टलवर एकूण 3,250 लोकांनी अपघात आणि मृत्यूचे दावे दाखल केले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी