रात्रपाळी करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; नाइट ड्युटी अलाउंसच्या नियमात बदल

काम-धंदा
भरत जाधव
Updated Apr 09, 2021 | 10:48 IST

7th Pay Commission: भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी हाती आली आहे. रेल्वे मंत्रालयाने नाइट ड्युटी अलाउंसविषयी मोठी घोषणा केली.

Good news for Railway  night shift railway employees, get night duty allowance
रात्रपाळी करणाऱ्या केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • पीयुष गोयल यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांचे मानले आभार
  • रात्र पाळी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार फायदा
  • मुळ वेतनानुसार कर्मचाऱ्याला नाइट अलाउंस

7th Pay Commission, नवी दिल्ली : भारतीय रेल्वे (Indian  Railway Employee) च्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी हाती आली आहे. रेल्वे मंत्रालयाने (Raliway Ministry) नाइट ड्युटी अलाउंसविषयी मोठी घोषणा केली आहे. याअंतर्गत भारतीय रेल्वे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागा (Department of Personnel and Training ) ला एक पत्र पाठविण्यात आले आहे. जे कर्मचारी नाइट ड्युटी भत्ते(Night Shift Allowance) घेण्यासाठी अपात्र आहेत त्यांना देण्यात आलेले भत्ते वसूल करण्याची कार्यवाही थांबविण्यात यावी असं या पत्रात म्हटलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन व्यवस्थेनुसार ज्या कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन ४३, ६०० पेक्षा जास्त आहे, त्यांना नाइट ड्युटी अलाउंस दिला जात नाही. दरम्यान ७ वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर रेल्वे ज्या कर्माचाऱ्यांना नाइट ड्युटी अलाउंस दिला गेला, त्यांच्याकडून तो भत्ते परत घेतले जात होते. ते भत्त्यांची वसुली करणे थांबवावे, यासाठी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला रेल्वेने पत्र पाठवलं आहे. याशिवाय वेगवगेळ्या परिस्थितीत काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या स्थितीला लक्षात घेत नाईट ड्युटी अलाउंसची व्यवस्था करण्यात यावी ,असे सांगण्यात आले आहे. 


कॅलक्युलेशनचा फार्मुला ही बदलला 

 नाइट ड्युटी अलाउंस नियम बदलतांना केंद्र सरकारने नाइट ड्युटी अलाउंस कॅलक्युलेशन फार्मुला ही बदलला आहे. नवीन नियमांनुसार, कोणाचे नाइट ड्युटी अलाउंस असा असेल.मुळ वेतन+ महागाई भत्ता (डिए) + हा फार्मुला सर्व केंद्र सरकारच्या कार्यालयात आणि मंत्रालयांमध्ये लागू करण्यात आला आहे. याआधी नाइट ड्युटी अलांउस समान ग्रेड वेतनाच्या सर्व कर्माचाऱ्यांसाठी एक सारखा होता. तर नवीन नियामांनुसार सरकारी कर्मचाऱ्याच्या मुळ वेतनानुसार त्याला नाइट ड्युटी अलाउंसाचा लाभ दिला जात आहे. 

रेल्वेमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांची मानले आभार , कामचं केलं कौतुक

कौतुकाची गोष्टी म्हणजे रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी मागील आठवड्यात १३ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना पत्र लिहिले आणि कोरोना व्हायरसच्या संकटादरम्यान त्यांनी केलेल्या कामाविषयी आभार मानले. गोयल म्हणाले की, 'आपल्या नुकसानाला कधी विसरता येणार नाही. परंतु हे रेल्वे परिवारचं धैर्य, दृढ़ निश्चय आणि संकल्प होता, जे अशा महामारीच्या काळात विजयी झालं'. कोविड-१९ जागतिक महामारीच्या दरम्यान रेल्वे परिवारने आपल्या स्वता:ला राष्ट्राच्या सेवेसाठी समर्पित केलं. ते म्हणाले की, 'जेव्हा जग थांबलं होते तेव्हा रेल्वे कर्मचाऱ्यांनी एक दिवस पण सुट्टी न घेता अर्थव्यवस्थेची चाके रुळावर राहावीत यासाठी आपला जीव धोक्यात टाकून कठोर मेहनत केली'.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी