एसबीआयची कोट्यावधी ग्राहकांसाठी खुशखबर

काम-धंदा
Updated Jul 12, 2019 | 15:32 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

State Bank Of India: सरकारी बँक एसबीआयने आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी गिफ्ट दिले आहे. बँकेने डिजीटल ट्रान्झॅक्शनला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी IMPS, RTGS आणि NEFT चार्ज रद्द केले आहेत.

sbi bank
एसबीआय 

थोडं पण कामाचं

  • एसबीआयकडू IMPS, RTGS आणि NEFT चार्ज रद्द 
  • मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिगचा उपयोग करणाऱ्यांना फायदा
  • एसबीआयचे  ६ कोटी ग्राहक इंटरनेट बँकिंगचा वापर करतात

मुंबई: देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने IMPS, RTGS आणि NEFT वरील चार्ज रद्द केले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या एका विधानात म्हटले की, त्यांनी संपूर्ण देशात योनो, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग ग्राहकांसाठी १ जुलै २०१९ पासून हे चार्ज रद्द करण्यात आले आहेत. बँक १ ऑगस्ट २०१९ पासून इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि योनो ग्राहकांसाठी IMPS चार्जही रद्द करणार आहे. ३१ मार्च २०१९पर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ६ कोटी ग्राहक इंटरनेट बँकिंगचा वापर करत आहेत. तर १.४१ कोटी लोग मोबाईल बँकिंगचा वापर करतात. बँकेचे डिजीटल आणि लाईफस्टाईल प्लॅटफॉर्म योनो १ कोटी ग्राहक वापरतात. 

बँकेने आधीच ब्रांचच्या माध्यमातून RTGS आणि NEFT ट्रान्झॅक्शन करणाऱ्यांसाठी २० टक्के फी घटवली आहे. एसबीआयने डिजीटल ट्रान्झॅक्शन वाढवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. बँकेच्या रिटेल आणि डिजीटल बँकिंगचे एमडी पीके गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार बँकांचा उद्देश ग्राहकांच्या  सुविधा वाढवण्यासाठी तसेच त्यांना डिजीटल प्लॅटफॉर्मवर आणणे होय. एसबीआयने योनो, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी RTGS आणि NEFT चार्ज रद्द केले आहेत. एसबीआय यापूर्वी १० हजार रूपयांपर्यंत पैसे ट्रान्सफर करण्यासाठी २.५ रूपये घेत होताी. तर १० हजार ते १ लाख रूपयापर्यंतचे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी ५ रूपये NEFT चार्ज . तर १ लाख ते २ लाख रूपये ट्रान्सफर करण्यासाठी १५ रूपये आणि २ लाख रूपयांहून अधिक रूपये ट्रान्सफर करण्यासाठी २५ रूपये चार्ज आहे.

तर RTGS ट्रान्सफरसाठी २५ रूपयांपासून ५६ रूपये वसूल करत होती. RTGS २ लाख रूपयांच्या जास्त पैशांवर असते. नुकत्याच झालेल्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये रिझर्व्ह बँकने RTGS आणि NEFT चार्ज १ जुलैपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. बँक १००० रूपयांपर्यंतच्या IMPS ट्रान्सफरसाठी १ रूपया चार्ज करत होते. १००१ ते १० हजार रूपयांपर्यंत २ रूपये, १०००१ ते १ लाख रूपयांपर्यंत २ रूपये IMPS चार्ज आहे. तर १ लाख रूपयांहून अधिक २ लाख पर्यंत ३ रूपये IMPS चार्ज आहे. यात टॅक्सही जोडला जातो. 

इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून IMPS ट्रान्सफरसाठी १००० रूपयांपर्यंत कोणतेही चार्ज नाही. तर १००१ ते १ लाख रूपयांपर्यंत ५ रूपये आणि जीएसटी आहे. १००००१ ते २ लाख रूपयांपर्यंत १५ रूपये आणि जीएसटी आहे. एसबीआयचे ३१ मार्च २०१९पर्यंत २९ लाख कोटी रूपये डिपॉझिट बेस होते. तर २२ लाख कोटी रूपये अॅडव्हान्स होते. बँकेची संपूर्ण देशात २२०१० शाखा आहेत. याशिवाय ५८ हजार एटीएम आहेत.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
एसबीआयची कोट्यावधी ग्राहकांसाठी खुशखबर Description: State Bank Of India: सरकारी बँक एसबीआयने आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी गिफ्ट दिले आहे. बँकेने डिजीटल ट्रान्झॅक्शनला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी IMPS, RTGS आणि NEFT चार्ज रद्द केले आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola