Yes Bank च्या ग्राहकांसाठी खूशखबर...RBI कडून मोठी घोषणा

काम-धंदा
Updated Mar 16, 2020 | 18:06 IST

येस बँकेच्या ग्राहकांना घाबरून जाण्याची गरज नाही आणि बँकेवरील लादलेले निर्बंध बुधवारपासून उठविण्यात येणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

RBI Governor Shaktikanta Das
Yes Bank च्या ग्राहकांसाठी खूशखबर...RBI कडून मोठी घोषणा 

मुंबईः  येस बँक ग्राहकांसाठी आरबीआयनं मोठी दिलासा देणारी बातमी दिली आहे. सोमवारी पत्रकार परिषदेत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, येस बँकेवरील लादण्यात आलेली निर्बंध बुधवारपासून उठवण्यात येतील. तर 26 मार्चपासून नवीन बोर्ड पदभार स्वीकारेल. त्यांनी बँकेच्या ग्राहकांना खात्री दिली की त्यांचे पैसे सुरक्षित आहेत आणि घाबरून जाण्याची गरज नाही.

येस बँकेतील खातेदारांचे पैसे सुरक्षित आहेत, असे दास यांनी सांगितले. येस बँकेच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरु आहेत. बँकेला कोणतीही आर्थिक चणचण भासल्यास रिझर्व्ह बँक मदतीसाठी पुढाकार घेईल,अशी हमी दास यांनी दिली.

सरकार आणि आरबीआयनं कठोर पाऊलं उचलली

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले की येस बँकेला वाचविण्यासाठी आम्ही कठोर पावले उचलली. ते म्हणाले की, लोकांना दिलासा देण्यासाठी सरकार आणि आरबीआयने योग्य वेळी पाऊलं उचलली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले, 'देशातील बँकिंग क्षेत्र मजबूत आणि सुरक्षित आहे. खासगी क्षेत्रातील बँका अर्थव्यवस्था आणि आर्थिक स्थिरतेत महत्त्वपूर्ण योगदान देतात. येस बँकेकडे पैशांची कमतरता नाही आहे आणि आवश्यक असल्यास आरबीआय बँक मदत करेल.

कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल

आरबीआय गव्हर्नर म्हणाले की येस बँक पुन्हा जोरदार कमबॅक करेल आणि ग्राहकांना काळजी करण्याची गरज नाही. कोरोना व्हायरसबद्दल बोलताना शक्तिकांत दास म्हणाले की, या व्हायरसवर सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. 

कोरोनाशी व्यवहार करण्यासाठी RBI कडेही आआहेत उपाय 

ते म्हणाले, कोरोनासंदर्भात सरकार आणि आरबीआय यांच्यात चांगले समन्वय आहे. कोरोना व्हायरसचा परिणाम देशातील व्यापार वाहिन्यांवर होईल. आर्थिक धोरणांच्या बैठकीत कोरोनाच्या अर्थकारणावर होणाऱ्या परिणामावर चर्चा केली जाईल. गेल्या काही दिवसांमध्ये रिझर्व्ह बँक आणि सरकारने आर्थिक स्थैर्यासाठी अनेक पाऊलं उचलली आहेत. अर्थव्यवस्थेला कोरोना व्हायरसच्या परिणामाशी सामना करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (आरबीआय) इतर अनेक उपाययोजना आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...