LPG Sabsidy : खुशखबर! गॅस सिलिंडरवरील अनुदान पुन्हा सुरू, असे चेक करा तुमचे खाते, स्टेप्स पाहा

gas cylinder Subsidy । गेल्या काही दिवसांपासून एलपीजी सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमती वाढत आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ पोहचत आहे.

Good news! Subsidies on gas cylinders will resume
LPG Sabsidy : खुशखबर! गॅस सिलिंडरवरील अनुदान पुन्हा सुरू होणार  
थोडं पण कामाचं
  • गेल्या काही दिवसांपासून एलपीजी सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमती वाढत आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ पोहचत आहे.
  • आता LPG गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
  • एलपीजी गॅसचे अनुदान आता ग्राहकांच्या थेट खात्यात जमा होणार आहे.

LPG cylinder Subsidy । मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एलपीजी सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमती वाढत आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ पोहचत आहे. मात्र आता LPG गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांची चिंता मिटणार आहे.

एलपीजी गॅसचे अनुदान आता ग्राहकांच्या थेट खात्यात जमा होणार आहे. यापूर्वीही सबसिडी (LPG Gas Sabsidy) येत असले तरी अनेक ग्राहकांच्या खात्यात अनुदान जमा होत नसल्याच्या अनेक तक्रारी सातत्याने येत होत्या. आता पुन्हा अनुदान सुरू झाल्यानंतर या तक्रारी येणे बंद झाल्या आहेत. 

LPG गॅस ग्राहकांना प्रति सिलिंडर 79.26 रुपये अनुदान म्हणून दिले जात आहेत. परंतु ग्राहकांना वेगवेगळी अनुदान मिळत असल्याची खात्री कंपन्यांनी केली आहे. अशा स्थितीत किती पटींनी अनुदान मिळते, असा संभ्रम लोकांमध्ये आहे. अनेकांना 79.26 रुपये अनुदान मिळत आहे, तर अनेकांना 158.52 रुपये किंवा 237.78 रुपये अनुदान मिळत आहे.

तुमच्या खात्यातील अनुदान असे तपासा- 

एलपीजी गॅसचे अनुदान आता ग्राहकांच्या थेट खात्यात जमा होणार आहे.

STEP 1
सर्व प्रथम www.mylpg.in उघडा.
STEP 2
त्यानंतर तुम्हाला स्क्रीनच्या उजव्या बाजूला गॅस कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा फोटो दिसेल.
STEP 3
सेवा पुरवठादाराच्या गॅस सिलेंडरच्या फोटोवर क्लिक करा.
STEP 4
यानंतर स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल जी तुमच्या गॅस सेवा प्रदात्याची असेल.
STEP 5
आता वरच्या उजवीकडे साइन-इन आणि नवीन वापरकर्ता पर्यायावर टॅप करा.
STEP 6
तुम्ही तुमचा आयडी आधीच तयार केला असेल, तर साइन-इन करा. जर तुमचा आयडी नसेल, तर तुम्ही New User वर टॅप करून वेबसाइटवर लॉग इन करू शकता.
STEP 7
आता तुमच्या समोर विंडो उघडेल, उजव्या बाजूला View Cylinder Booking History वर टॅप करा.
STEP 8
तुम्हाला कोणत्या सिलिंडरवर किती अनुदान दिले गेले आहे, कधी दिले गेले आहे याची माहिती इथे मिळेल.
STEP 9
जर तुम्ही गॅस बुक केला असेल आणि तुम्हाला सबसिडीची रक्कम मिळाली नसेल, तर तुम्ही फीडबॅक बटणावर क्लिक करू शकता.
STEP 10
तुम्ही अनुदानाचे पैसे न मिळाल्याची तक्रार देखील दाखल करू शकता.
STEP 11
याशिवाय, तुम्ही या टोल फ्री क्रमांक 18002333555 वर मोफत कॉल करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी