Gold Price Today | विक्रमी पातळीवरून स्वस्त झाले सोने...सोने खरेदीची जबरदस्त संधी...पाहा आजचा भाव

Gold Investment : सध्या लग्नसराई सुरू आहे. अशा परिस्थितीत स्वस्त दरात सोने खरेदी करायचे असेल तर त्यासाठीची सुवर्णसंधी चालून आली आहे. सध्या सोन्याच्या भावात (Gold Price)मोठी घसरण झाली असल्यामुळे तुम्ही खरेदी करू शकता. तसेच सोन्यात गुंतवणूक (Gold Investment)करण्याचीदेखील सुवर्णसंधी आहे.अलीकडच्या काही दिवसांतील घसरणीने सोने आणि चांदीच्या (Gold-Silver Price) बाजाराचे चित्र बदलून टाकले आहे.

Gold Price Today
सोन्याचा ताजा भाव 
थोडं पण कामाचं
  • सोने आणि चांदीच्या भावातील घसरणीचा ग्राहकांना फायदा
  • लग्नसराईच्या हंगामात सोने खरेदीची संधी
  • विक्रमी उच्चांकीवरून सोने घसरल्याने सोन्यात गुंतवणुकीची संधी

Gold Price Today 5 April 2022 :  नवी दिल्ली :  सध्या लग्नसराई सुरू आहे. अशा परिस्थितीत स्वस्त दरात सोने खरेदी करायचे असेल तर त्यासाठीची सुवर्णसंधी चालून आली आहे. सध्या सोन्याच्या भावात (Gold Price)मोठी घसरण झाली असल्यामुळे तुम्ही खरेदी करू शकता. तसेच सोन्यात गुंतवणूक (Gold Investment)करण्याचीदेखील सुवर्णसंधी आहे. काही दिवसांपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र अलीकडच्या काही दिवसांतील घसरणीने सोने आणि चांदीच्या (Gold-Silver Price) बाजाराचे चित्र बदलून टाकले आहे. काल सोन्याचा भाव आजही तसाच आहे. सोन्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही, त्यामुळे तुम्ही विलंब न करता या संधीचा लाभ घेऊ शकता. चांदी प्रतिकिलो 643 रुपयांनी स्वस्त होऊन 65825 रुपये किलो झाली, तर 24 कॅरेट सोने 10 ग्रॅम 51457 रुपयांच्या पातळीवर आहे. (Good time to buy gold, gold prices down from the record high, check the latest rate)

अधिक वाचा : CNG Price Hike : मुंबईत सीएनजी महागला वॅट कमी केल्याचा दिलासा पाच दिवस टिकला

लग्नसराईचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात बदल होत आहे. आता सोने 56254 रुपयांच्या आतापर्यंतच्या उच्चांकावरून केवळ 4669 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे. तर, दोन वर्षांपूर्वीच्या सर्वोच्च दराच्या तुलनेत चांदी प्रति किलो फक्त १०१७५ रुपयांनी स्वस्त झाली आहे.

इंडिया बुलियन असोसिएशनने जारी केलेल्या स्पॉट रेटनुसार, 24 कॅरेट शुद्ध सोने आज सराफा बाजारात केवळ 6 रुपयांनी महागले आणि 51457 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. यावर 3 टक्के जीएसटी जोडला तर तो जवळपास 53000 रुपये बसतो. त्याच वेळी, चांदीवर जीएसटी जोडल्यानंतर, चांदीचा भाव 67799 रुपये प्रति किलो इतका असेल.

अधिक वाचा : NEET UG 2022 Date: NEET परीक्षेची मोठी अपडेट... सुरु होऊ शकते रजिस्‍ट्रेशन; भेट द्या @neet.nta.nic.in

22 आणि 24 कॅरेटमधील फरक

24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने पूर्ण शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो.

अधिक वाचा :  Indian Railway Update | रेल्वे प्रवाशांना दणका...'या' ट्रेनचे भाडे वाढणार ५० रुपयांनी! जाणून घ्या तपशीलवार माहिती

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नसते आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

असा तपासा सोन्याचा भाव

सोन्याच्या दागिन्यांची किंमत देशभर बदलते, कारण त्यात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्ज यांचाही वाटा असतो. तुमच्या शहरातील सोन्याची किंमत तपासण्यासाठी तुम्ही इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. तुमच्या मोबाईल नंबरवर सोन्याच्या ताज्या दराचा संदेश येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी