Gold Price Today | सोने खरेदी करणाऱ्यांसाठी सुगीचे दिवस, सोने झाले स्वस्त, पाहा सोन्याचा भाव

Gold Price | सोने आपल्या उच्चांकीपेक्षा ७,४३९ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त झाले आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोने आपल्या आतापर्यतच्या उच्चांकीवर पोचले आहे. त्या वेळेस सोने ५६,२०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर पोचले होते. तर चांदी आपल्या उच्चांकीपेक्षा जवळपास १८,२६९ प्रति किलो दराने स्वस्त झाली आहे. चांदीने ७९,९८० रुपये प्रति किलोची उच्चांकी पातळी गाठली होती. गुरूवारी सोन्याचा भाव ४८,३८४ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता.

Gold Price Today
सोन्याची खरेदी करण्याची मोठी संधी 
थोडं पण कामाचं
  • सोन्याची खरेदी करण्याची मोठी संधी
  • सोने उच्चांकीपेक्षा ७,४३९ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त
  • मुंबईत २२ कॅरेट सोने ४५,६४१ रुपये आणि २४ कॅरेट सोने ४९,७९० रुपयांवर

Gold Price Today | नवी दिल्ली : सोने (Gold) खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार सोन्याचा भाव (Gold rate)३७७ रुपये प्रति १० ग्रॅमच्या तेजीसह ४८,७६१ रुपयांच्या पातळीवर होता. गुरूवारी सोन्याचा भाव ४८,३८४ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता. तर चांदीचा भाव (Silver rate) ६४० रुपये प्रति किलोच्या तेजीसह ६१,७११ रुपयांच्या पातळीवर होता. याआधी गुरुवारी चांदीचा भाव ६१,०७१ रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोचला. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनप्रमाणेच मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX)सोने तेजीमध्ये व्यवहार करत होते. सोने ३४ रुपयांच्या तेजीसह ४८,६८० रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. तर चांदी १०९ रुपयांच्या घसरणीसह ६०,०४२ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होती. (Good time to purchase Gold, check the gold rate)

ऑलटाइम उच्चांकीपेक्षा सोने ७,४३९ आणि चांदी १८,२६९ रुपयांनी स्वस्त

अर्थात सध्याच्या तेजीनंतरदेखील सोने आपल्या उच्चांकीपेक्षा ७,४३९ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त झाले आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोने आपल्या आतापर्यतच्या उच्चांकीवर पोचले आहे. त्या वेळेस सोने ५६,२०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर पोचले होते. तर चांदी आपल्या उच्चांकीपेक्षा जवळपास १८,२६९ प्रति किलो दराने स्वस्त झाली आहे. चांदीने ७९,९८० रुपये प्रति किलोची उच्चांकी पातळी गाठली होती.

१४ ते २४ कॅरेट सोन्याचा ताजा भाव

सोन्याचा भाव २४ कॅरेट सोन्याचा ताजा भाव ४८,७६१ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २३ कॅरेट सोन्याचा भाव ४८,५६६ रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४,६६५ रुपये प्रति १० ग्रॅम, १८ कॅरेट सोन्याचा भाव ३६,५७१ रुपये प्रति १० ग्रॅम आणि १४ कॅरेट सोन्याचा भाव जवळपास २८,५२५ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर आहे. देशातील प्रमुख शहरातील सोन्याचा भाव पाहता, दिल्लीत २२ कॅरेट सोने ४५,५५८ रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९,७०० रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. मुंबईत २२ कॅरेट सोने ४५,६४१ रुपये आणि २४ कॅरेट सोने ४९,७९० रुपयांवर आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोने ४५,५७७ रुपये आहे तर २४ कॅरेट सोने ४९,७२० रुपयांच्या पातळीवर आहे. तर चैन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५,२२८ रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९,९३० रुपये आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचा बाजार

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भावात तेजी दिसून येते आहे. अमेरिकेत सोने ६.४१ रुपये डॉलरच्या तेजीसह १,८०५.१२ डॉलर प्रति औंसच्या भावावर व्यवहार करतो आहे. तर चांदी ०.०३ डॉलरच्या तेजीसह २२.४९ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. 

सोने विकत घेताना हॉलमार्क पाहूनच सोने विकत घ्यावे. हॉलमार्क ही एक प्रकारे सोन्याच्या शुद्धतेसंदर्भात सरकारची गॅरंटी आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड हॉलमार्कची निश्चिती करते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी