गुडनाइटचे ४ इन १, सर्वात ताकदवान लिक्विड व्हेपोरायझर, ‘गुडनाइट गोल्ड फ्लॅश’ बाजारात

भारतातील प्रत्येक कुटुंब आणि लहान मुलांचे डासांपासून संरक्षण करण्यासाठी गुडनाइटने ‘गुडनाइट गोल्ड फ्लॅश’ हे नवे, अनोखए उत्पादन सादर केले आहे.

goodkinght gold flash most powerful liquid vapourise in india business news in india
गुडनाइटचे ४ इन १, सर्वात ताकदवान लिक्विड व्हेपोरायझर  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  •  फ्लॅश व्हेपर्सद्वारे कार्यक्षमतेचा पुरावा देणारे भारताचे एकमेव व्हेपरायझर 
  • अनोखी चिप असलेले हे फ्लॅश मशिन ऑटोमॅटिकपणे बदलते स्वरूप 
  • मशिन आणि रिफिल केवळ 89 रुपयांत उपलब्ध, तर रिफिलची किंमत 75 रुपये

मुंबई  : भारतातील प्रत्येक कुटुंब आणि लहान मुलांचे डासांपासून संरक्षण करण्यासाठी गुडनाइटने ‘गुडनाइट गोल्ड फ्लॅश’ हे नवे, अनोखे उत्पादन सादर केले आहे. हे उत्पादन भारतातील सर्वात ताकदवान लिक्विड व्हेपोरायझर असून त्याची कार्यक्षमता सहजपणे दिसून येते. घरगुती कीटकांपासून संरक्षण करणाऱ्या उत्पादनांच्या क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठा ब्रँड म्हणून प्रसिद्ध असलेले गुडनाइट ‘गुडनाइट गोल्ड फ्लॅश’च्या सादरीकरणातून 2200 कोटी रुपयांच्या लिक्विड व्हेपोरायझर बाजारपेठेतील समीकरणे नव्याने प्रस्थापित करत आहे. 

गुडनाइटच्या संशोधनानुसार भारतातील 90 टक्के ग्राहकांना डासांची समस्या भेडसावते. कुटुंबाचे सर्व बाजूंनी डासांपासून संरक्षण करण्यासाठी गुडनाइटने लोकांना ‘गुडनाइट गोल्ड फ्लॅश’ हे सर्वात ताकदवान उपलब्ध तयार करून दिले आहे. सध्या लिक्विड व्हेपोरायझर्सच्या तुलनेत गुडनाइट मशिनचा सुरुवातीच्या काही काळात दृश्यमान फ्लॅश व्हेपर्स सोडून डासांना नष्ट करण्याचा वेग खूप जास्त आहे. 

या क्रांतीकारी लाँचविषयी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे (जीपीसीए) मुख्य कार्यकारी अधिकारी – भारत आणि सार्क, सुनील कटारिया म्हणाले, ‘भारतातील गृहोपयोगी कीटकनाशक क्षेत्रात गुडनाइट आघाडीवर आहे. कीटकांपासून होणाऱ्या आजारांविरोधात संरक्षण करणाऱ्या उत्पादनांमध्ये भारतातील कुटुंबांची गुडनाइटला पसंती असते. ग्राहकांसाठी आम्ही कायमच क्रांतीकारी उत्पादने सादर करून या उत्पादन विभागाची समीकरणे नव्याने प्रस्थापित केली आहेत. गुडनाइट गोल्ड फ्लॅश, भारतातील सर्वात ताकदवान लिक्विड व्हेपोरायझर हे आमचे लिक्विड व्हेपोरायझेशन विभागातील सर्वात नवे उत्पादन आहे.’   

ते पुढे म्हणाले, ‘अद्यावत हीटिंग तंत्रज्ञान आणि दृश्यमान कार्यक्षमतेच्या मदतीने गुडनाइट गोल्ड फ्लॅश भारतातील 2200 कोटी रुपयांच्या लिक्विड व्हेपरायझर बाजारपेठेतील समीकरणे नव्याने बदलण्यासाठी सज्ज झाले आहे. या उत्पादनाच्या मदतीने आम्ही कॉइल्स आणि अगरबत्तीसारखी जळणारी उत्पादने वापरण्याऐवजी नवा, जास्त आधुनिक पर्याय देत असून त्याद्वारे अशा उत्पादनांच्या 250 कोटी रुपयांच्या बाजारपेठेला काबीज करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.’

गुडनाइट गोल्ड फ्लॅशमध्ये नॉर्मल आणि फ्लॅश मोड बसवण्यात आले असून चिपवर आधारित तंत्रज्ञानाची जोड त्याला देण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे मोड्स आपोआप बदलले जातात. अधिक वेगवान परिणाम मिळवण्यासाठी मशिन सुरू करायचे झाल्यास युजरला फ्लॅश मोड सुरू करावा लागेल आणि मशिन 30 मिनिटे दृश्यमान फ्लॅश व्हेपर्स सोडत राहील. त्यानंतर हे मशिन आपोआप नॉर्मल मोडला येईल. हे चक्र मशिन बंद होईपर्यंत दर चार तासांनी परत सुरू होत राहील. फ्लॅश व्हेपर्स आणि मशिनच्या अद्यावतपणामुळे कोपऱ्यांतील डासही दूर होतात. गुडनाइड गोल्ड फ्लॅश मशिनचे सच्छिद्र विक हीटिंग तंत्रज्ञानसह अधिक कार्यक्षमतेने घटक सोडत राहते. 

कीटकांपासून होणाऱ्या आजारांविरोधात कुटुंबांचे संरक्षण करण्याची ब्रँडची बांधिलकी गुडनाइड गोल्ड फ्लॅशमुळे आणखी मजबूत झाली आहे. फ्लॅश मशिनमुळे व्यापक परिसरातील डास दूर होतात. या मशिनमध्ये अनोखी लॉकिंग यंत्रणा देण्यात आल्यामुळे केवळ गुडनाइट फ्लॅश रिफिल्स मशिनमध्ये फिट होतात.  

गुडनाइट हा भारतातील गृहोपयोगी कीटक क्षेत्रातील सर्वात मोठा, विश्वासार्ह ब्रँड असून 7.4 कोटी घरांत लोकप्रिय आहे. कंपनीची डास प्रतिरोधक उत्पादने कुटुंबांचे घरातील व घराबाहेरच्या डासांपासून संरक्षण करतात. गुडनाइट गोल्ड फ्लॅशचे मशिन आणि रिफिलची किंमत 89 रुपये असून रिफिलची किंमत 75 रुपये आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी