Google Pay New Rule | एक जानेवारीपासून बदलणार गुगल पे चा हा नियम, कोट्यवधी ग्राहकांवर थेट परिणाम

Google Pay Payments | स्मार्टफोनमुळे सर्वसामान्य माणूस विविध बाबीं आता ऑनलाइन किंवा डिजिटल स्वरुपातच करू लागला आहे. डिजिटल क्रांतीमुळे आपल्या पारंपारिक व्यवस्थेत मोठाच बदल झाला आहे. आधी छोट्या छोट्या बाबींसाठी किंवा आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी लोकांचा बराच वेळ खर्च व्हायचा. मात्र आता डिजिटल पेमेंट व्यवस्था आल्यापासून काही सेंकदांतच आर्थिक देवाण घेवाण पूर्ण होते. गुगल पे (Google Pay)सारख्या सेवा अत्यंत लोकप्रिय झाल्या आहेत. मात्र आता गुगल पे एक नवा बदल लागू करणार आहे.

Google Pay new rule
गुगल पे चा नवा नियम 
थोडं पण कामाचं
  • गुगल पे च्या नियमात जानेवारीपासून बदल
  • आरबीआयच्या सूचनेनुसार गुगल पे च्या वापरात बदल
  • कार्डची माहिती आता सेव्ह होणार नाही

Google Pay New Rule | नवी दिल्ली : नोटबंदीनंतर भारतात डिजिटल पेमेंट (Digital Payments system)करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यातच डिजिटल अर्थव्यवस्थेमुळे (Digital economy)अनेक आर्थिक व्यवहार हे डिजिटल स्वरुपातच (Digital Transactions)होऊ लागले आहेत. स्मार्टफोनमुळे सर्वसामान्य माणूस विविध बाबीं आता ऑनलाइन किंवा डिजिटल स्वरुपातच करू लागला आहे. डिजिटल क्रांतीमुळे आपल्या पारंपारिक व्यवस्थेत मोठाच बदल झाला आहे. आधी छोट्या छोट्या बाबींसाठी किंवा आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी लोकांचा बराच वेळ खर्च व्हायचा. मात्र आता डिजिटल पेमेंट व्यवस्था आल्यापासून काही सेंकदांतच आर्थिक देवाण घेवाण पूर्ण होते. गुगल पे (Google Pay)सारख्या सेवा अत्यंत लोकप्रिय झाल्या आहेत. मात्र आता गुगल पे एक नवा बदल लागू करणार आहे. आरबीआयच्या सूचनेनुसार हा बदल लागू केला जाणार आहे. (Google Pay to implement new rule as per RBI guidelines)

गुगल पे चा नवा नियम

डिजिटल व्यवहारांच्यासंदर्भात रिझर्व्ह बॅंक वेळोवेळी बदल करत असते. आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित आणि सुलभ व्हावेत यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून पावले उचलली जात असतात. या धोरणानुसार रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या सूचनेनुसार गुगल पे १ जानेवारी २०२२ पासून आपल्या नियमात बदल करते आहे. गुगल पे कडून करण्यात येत असलेल्या बदलाचा कोट्यवधी ग्राहकांवर थेट परिणाम होणार आहे. गुगल पे चा हा नवा नियम गुगल अॅड, गुगल प्ले स्टोअर, यु ट्युब इत्यादींवरदेखील लागू होणार आहे. गुगल पे कडून बदलण्यात येत असलेल्या नियमाबद्दल जाणून घेऊया.

कार्डची माहिती सेव्ह होणार नाही

या नव्या नियमानुसार गुगल पे १ जानेवारी २०२२ पासून आपल्या ग्राहकांच्या कार्डचे डिटेल्सची माहिती सेव्ह करणार नाही. याआधी गुगल पे तुमच्या कार्डशी संबंधित माहिती सेव्ह करून ठेवत असे. यात एक्सपायरी डेट, कार्ड नंबर इत्यादी बाबी गुगल पे च्या सर्व्हरमध्ये सेव्ह केल्या जात असत. या नव्या नियमाच्या अंमलबजावणीनंतर गुगल पे च्या ग्राहकांना पेमेंट करताना आपल्या कार्डच्या डिटेल्स पुन्हा भराव्या लागणार आहेत. आरबीआयच्या सूचनेनुसार गुगल पेने मॅन्युअल ऑनलाइन पेमेंट च्या नियमात हे बदल केले आहेत. 

सायबर सुरक्षेसाठी उचलले पाऊल

या नव्या नियमामुळे ग्राहकांची वैयक्तिक माहिती लीक होण्याची भीती दूर होणार आहे. सायबर सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सायबर फ्रॉडच्या प्रकारांमध्येदेखील घट होणार आहे. या बदलानंतर जे लोक किंवा ग्राहक मास्टर कार्डचा वापर करत आहेत त्यांना एका नव्या फॉर्मेटमध्ये आपल्या कार्डचे डिटेल्स सेव्ह करण्यासाठी आधी ऑथोराइज्ड करावे लागणार आहे. आपल्या कार्डची माहिती भरल्यानंतर ग्राहक एकदाच मॅन्युअल पेमेंट करू शकणार आहेत. तर दुसऱ्यांदा किंवा पुन्हा पेमेंट करण्यासाठी ग्राहकांना पुन्हा आपल्या कार्डची माहिती त्यात भरावी लागणार आहे. हा नवा नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी