eKYC deadline for PM Kisan: नवी दिल्ली : पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana)लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी (eKYC)पूर्ण करण्याची अंतिम मुदत आता 31 जुलै 2022 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी त्याची अंतिम मुदत 31 मे 2022 होती. पीएम किसान वेबसाइटवरील फ्लॅशनुसार, "सर्व PM KISAN लाभार्थ्यांसाठी eKYC ची अंतिम मुदत 31 जुलै 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे." पीएम किसान योजनेच्या 11व्या हफ्त्याची रक्कम सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. (Government extends the deadline for PM Kisan Yojana)
अधिक वाचा : PM Kisan 11th Installment : तुमच्या खात्यात 2000 रुपये आले का? नसतील तरी चिंता नको! अशी नोंदवा तक्रार
अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 04 June 2022: सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढले, जाणून घ्या आजचा भाव...
जर सर्व काही ठीक झाले तर eKYC पूर्ण होईल नाहीतर Invalid लिहून येईल. जर तुमचे eKYC आधीच पूर्ण झाले असेल तर eKYC आधीच पूर्ण झाले आहे असा संदेश दिसेल. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशात आणखी 12 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील (PM KIsan scheme) अकराव्या टप्प्याची (Installment) रक्कम (Amount) केंद्र सरकारनं लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात (Bank Account) जमा केली आहे. एकूण 10 कोटी शेतकऱ्यांना 21 हजार कोटींच्या रकमेचं वाटप करण्यात आलं आहे.
पीएम किसानच्या लाभार्थ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पीएम मोदींनी 31 मे 2022 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 11वा हफ्ता लागू केला आहे. याअंतर्गत जवळपास 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 21,000 कोटी रुपये पाठवले आहे.
केंद्र सरकारने आपली 8 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने हिमाचल प्रदेशाची राजधानी शिमलामध्ये राष्ट्रीय स्तरावर ‘गरीब कल्याण संमेलना'चे आयोजन केले होते. यानिमित्ताने पीएम मोदीही शिमला येथे उपस्थित होते. यादरम्यान केंद्राच्या के आठ मंत्रालयांच्या 16 योजनांअंतर्गत देशाच्या हरेक जिल्ह्यातून निवडलेल्या लाभार्थींशी पीएम मोदींनी व्हर्चुअल संवादही केला. https://pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपले नाव तपासू शकता.