टॅक्स चुकवेगिरी करणाऱ्यांवर सरकारची नजर, पकडले गेल्यास १० वर्षांची शिक्षा

काम-धंदा
Updated Mar 03, 2021 | 17:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतात लोक टॅक्सपासून बचाव करण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करतात. इतकं की परदेशातही लोक आपली संपत्ती लपवून ठेवतात. आता त्यांच्यावर मोठी कारवाई होऊ शकते. 

income tax
टॅक्सपासून बचाव करणाऱ्यांवर सरकारची नजर,नाहीतर इतकी शिक्षा 

थोडं पण कामाचं

  • काही वर्षांपूर्वी काळ्या पैशाबाबत कायदा बनवण्यात आला होता
  • काळा पैसा कायदा २०१५मध्ये परदेशात काळा पैसा लपवल्यास १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आहे.
  • काळा पैशाबाबत २०१५मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने कायदा केला होता.

मुंबई: सरकारकडे जमा होणाऱ्या टॅक्सपासून कसा बचाव करता येईल यासाठी लोक विविध शक्कल लढवत असतात. काहीजण तर आपली संपत्ती परदेशात लपवून ठेवतात.. मात्र अशा लोकांवर आता मोठी कारवाई होणार आहे. हे तेच लोक आहेत ज्यांना म्हटले जाते की परदेशात काळा पैसा लपवला आहे. लवकरच इनकम टॅक्स डिपार्टमेंट काळा पैसा ठेवणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. इनकम टॅक्स डिपार्टमेंट ४००हून अधिक लोकांवर काळा पैसा कायद्यांतर्गत कारवाई करणार आहे. 

काही वर्षांपूर्वी काळ्या पैशाबाबत कायदा बनवण्यात आला होता आणि आता सांगितले जात आहे की लवकरच या कायद्यांतर्गत मोठी कारवाई केली जाणार आहे. जाणून घ्या किती होणार शिक्षा

काळा पैसा म्हणजे काय?

कायद्यामध्ये काळा पैशाची कोणताही विशेष व्याख्या नाही. मात्र काळा पैसा अशा पैशाला म्हटले जाते ज्यात टॅक्स भरावा लागतो मात्र याची माहिती टॅक्स डिपार्टमेंटला दिली जात नाही. असंही म्हटलं जात की एक इनकम लपवण्यासाठी हा प्रयत्न केला जातो. हे अनेक पद्धतीने केले जाते. परदेशात लपवली जाणाऱ्या संपत्तीसाठी याचा वापर केला जातो. 

काय आहे कायदा?

काळा पैशाबाबत २०१५मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने कायदा केला होता. या कायद्यामध्ये काळा पैशावरील तपास प्रक्रियेसाठी नवीन संरचना तयार करण्यात आली आहे. यासोबतच प्राथमिकतेच्या आधारावर परदेशात जमा असलेल्या काळा पैसा अथवा अघोषित परदेशी संपत्तीबाबत माहिती मिळवण्यास मदत मिळेल. या कायद्यात शिक्षेती तरतूदही अधिक आहे आणि कारवाईबाबत कडक नियम आहेत. सरकारने Undisclosed Foreign Income and Assets (Imposition of Tax) या नावाने खास विधेयक सादर केले होते. 

किती असते शिक्षा?

काळा पैसा कायदा २०१५मध्ये परदेशात काळा पैसा लपवल्यास १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आहे. टॅक्स चोरी करणाऱ्यांवर ३०० टक्के दंड. परदेशातील संपत्तीबाबत रिटर्न दाखल न करणे अथवा अर्धवट रिटर्न दाखल केल्यास सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. यासोबतच परेशातील संपत्तीचे मालवक अथवा त्याचे लाभ मिळवणाऱ्या व्यक्तीला इनकम होत नसतानाही रिटर्न दाखल करावा लागेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी