PM Kisan Tractor Yojna | ट्रॅक्टर विकत घ्या ५० टक्के सब्सिडीवर, असा मिळेल फायदा

PM Kisan Tractor Yojna | केंद्र सरकार शेतकऱ्यांना (Farmer) ट्रॅक्टर विकत घेण्यावर सब्सिडी (Subsidy for tractor) देते. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर (Tractor purchasing)विकत घेऊ शकतात. अर्ध्या किंमतीच शेतकऱ्याला ट्रॅक्टर विकत घेता येते. उर्वरित अर्धी रक्कम केंद्र सरकार सब्सिडीच्या रुपात देते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना चालवल्या जात आहेत. शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी अनेक उपकरणे, मशीनची आवश्यकता भासते.

PM Kisan Tractor Yojna
पीएम किसान ट्रॅक्टर योजना  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची खास योजना
 • पीएफ किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळतेय सब्सिडी
 • ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार ५० टक्के सब्सिडी

PM Kisan Tractor Yojna : नवी दिल्ली : केंद्र सरकार शेतकऱ्यांना (Farmer) ट्रॅक्टर विकत घेण्यावर सब्सिडी (Subsidy for tractor) देते. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर (Tractor purchasing)विकत घेऊ शकतात. अर्ध्या किंमतीच शेतकऱ्याला ट्रॅक्टर विकत घेता येते. उर्वरित अर्धी रक्कम केंद्र सरकार सब्सिडीच्या रुपात देते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना चालवल्या जात आहेत. शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी अनेक उपकरणे, मशीनची आवश्यकता भासते. यामध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची खूप आवश्यकता असते. (Government giving 50% subsidy to farmers on tractor purchasing)

PM Kisan Tractor Yojna – ५० टक्के सब्सिडी 

केंद्र सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी सब्सिडी देते. यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही किंमतीचे ट्रॅक्टर निम्म्या किंमतीत विकत घेता येते. ट्रॅक्टरच्या किंमतीतील अर्धी रक्कम सरकार सब्सिडीच्या रुपात देते. याशिवाय अनेक राज्य सरकार आपल्या पातळीवर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर २० ते ५० टक्के सब्सिडी देते. अर्थात ही सब्सिडी १ ट्रॅक्टर विकत घेणाऱ्या शेतकऱ्याला म्हणजे एकाच ट्रॅक्टरवर मिळते आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सब्सिडीचा फायदा घेण्यासाठी जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, जमिनीचे कागदपत्र, बॅंकेची माहिती, पासपोर्ट साइज फोटोची आवश्यकता असणार आहे.

किसान ट्रॅक्टर योजनेचे उद्दिष्ट

या योजनेचे मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना शेतीच्या उपकरणांसाठी सब्सिडी उपलब्ध करून देत मदत करण्याचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना फारच कमी किंमतीत उपकरण खरेदी करता येणार आहे. ही योजना छोटे शेतकरी ज्यांच्याकडे जास्त जमीन नाही आणि उत्पन्नाची साधने नाहीत, अशा शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून आणण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी सरकार सुविधा देते आहे.

पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचा लाभ आणि वैशिष्ट्ये-

 1. ही योजना केंद्र सरकारद्वारे संचालित आहे.
 2. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना नव्या कृषी उपकरणांच्या खरेदीवर सरकारकडून ५० टक्के सब्सिडी मिळते.
 3. यातून कमी उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक कृषी उपकरणे विकत घेता येणार आहेत.
 4. सब्सिडीद्वारे ट्रॅक्टर विकत घेऊन शेतकऱ्यांना अधिक सक्षमपणे शेती करता येणार आहे.
 5. शेतकरी कोणत्याही कंपनीच्या ट्रॅक्टरला अर्ध्या किंमतीत विकत घेऊ शकतात. उर्वरित रक्कम सब्सिडीद्वारे सरकार देते.
 6. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना त्यांच्या बॅंक खात्यात थेट दिला जातो. 
 7. राज्य सरकार देकील शेतकऱ्यांना आपल्या पातळीवर ट्रॅक्टरसाठी २० ते ५० टक्के सब्सिडी देते.
 8. या योजनेसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर सीएससीच्या मदतीने अर्ज करू शकता. 
   
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी