Flex Fuel Vehicles | जबरदस्त ! पेट्रोलची गरज संपणार...६ महिन्यात येणार 'फ्लेक्स फ्युएल'वर चालणारी वाहने, प्रदूषणमुक्त आणि स्वस्त

Automobile sector | केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितिन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांनी आता फ्लेक्झिबल फ्युएलवर चालणारी इंजिन असणारी वाहने बनवण्यास सुरूवात करावी, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी याबाबत ट्विटदेखील केले आहे. प्रदूषण कमी करून वाहनांद्वारे होणारे कार्बन उत्सर्जन (Carbon emission) कमी करण्यासाठी सरकार पावले उचलत असून प्रदूषण कमी करणाऱ्या इंधनाला प्रोत्साहन दिले जाते आहे.

Govt advisory to Automobile Manufacturers
वाहन उत्पादक कंपन्यांना बनवणार फ्लेक्स इंधनावरील वाहने  
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची महत्त्वाची घोषणा
  • पुढील सहा महिन्यात फ्लेक्स फ्युएलवर आधारित वाहने बनवण्याच्या वाहन उत्पादक कंपन्यांना सूचना
  • प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल, पेट्रोलची गरज संपणार

Govt advisory to Automobile Manufacturers | नवी दिल्ली : वाहन उत्पादक कंपन्यांना (Automobile compnaies)पुढील सहा महिन्यात फ्लेक्स फ्युएलवर (Flex fuel) चालणारी वाहने बनवण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितिन गडकरी  (Union Minister Nitin Gadkari)यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांनी आता फ्लेक्झिबल फ्युएलवर चालणारी इंजिन असणारी वाहने बनवण्यास सुरूवात करावी, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी याबाबत ट्विटदेखील केले आहे. प्रदूषण (pollution)कमी करून वाहनांद्वारे होणारे कार्बन उत्सर्जन (Carbon emission) कमी करण्यासाठी सरकार पावले उचलत असून प्रदूषण कमी करणाऱ्या इंधनाला प्रोत्साहन दिले जाते आहे. त्याच दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. (Government issues advisory to automobile companies to manufacture Flex fuel vehicles in 6 months)

सहा महिन्यात नवीन इंधनावरील वाहने

आपल्या ट्विटमध्ये नितिन गडकरी यांनी म्हटले आहे की भारत करत असलेल्या पेट्रोलियमच्या आयातीला इंधन म्हणून पर्याय निर्माण व्हावा आणि आपल्या शेतकऱ्यांना त्याच थेट लाभ मिळावा यासाठी आम्ही भारतातील वाहन उत्पादक कंपन्यांना फ्लेक्स फ्युएलवर चालणारी वाहने आणि फ्लेक्स फ्युएल स्ट्रॉंग हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील सहा महिन्यांच्या निश्चित कालावधीत बीएस-६ निकषांचे पालन करणारी वाहने उत्पादन करावी असे ऑटोमोबाइल कंपन्यांना सांगण्यात आले आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यायी इंधन

फ्लेक्स फ्युएल वाहने ही १०० टक्के पेट्रोल, १०० टक्के बायो-इथेनॉल आणि त्यांच्या मिश्रणावर चालतात. याचबरोबर ही फ्लेक्स फ्युएल आणि हायब्रिड इलेक्ट्रिक तंत्रज्ञान यावरदेखील संयुक्तरित्या ही वाहने चालतात. या फ्लेक्स फ्युएल इंजिन असणाऱ्या वाहनांमुळे वाहनांद्वारे होत असलेले प्रदूषण, ग्रीनहाउस वायूंचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होईल. यामुळे भारताला सीओपी२६ मध्ये दिलेली आश्वासने पाळता येतील. जेणेकरून २०३० पर्यत एकूण कार्बन उत्सर्जन एक अब्ज टनांनी कमी करण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असेही नितिन गडकरी यांनी पुढे म्हटले आहे.

पेट्रोलमुक्त वाहने आणि पैशांची बचतदेखील

याआधी एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री गडकरींनी कार उत्पादक कंपन्यांना फ्लेक्सिबल फ्युएल इंजिन असलेली वाहने बाजारात आणण्याच्या सूचना केल्याचे सांगितले होते. सरकार ग्रीन फ्युएल आणि पर्यायी इंधनाला प्रोत्साहन देते आहे. फ्लेक्स फ्युएल इंजिनांसाठीच्या फाइलवर आपण स्वाक्षरी केल्याचे  आणि पुढील सहा महिन्यात या प्रकारची वाहने रस्त्यावर आणण्याच्या धोरणाबद्दल नितिन गडकरी यांनी माहिती दिली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग  मंत्री नितिन गडकरींनी म्हटले होते की टीव्हीएस मोटर्स आणि बजाज ऑटो या कंपन्यांनी याआधीच फ्लेक्स फ्युएल इंजिन असणाऱ्या दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचे उत्पादन सुरू केले आहे. लवकरच चारचाकी वाहने ही १०० टक्के इथेनॉलवर चालणार आहेत. आपल्याला पेट्रोलची आवश्यकता असणार नाही. ग्रीन फ्युएलच्या वापरामुळे आपल्या पैशांचीदेखील बचत होणार आहे.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी