EPFO Latest News: कोट्यवधी नोकरदारांना झटका! सरकारने नाकारला पेन्शन वाढीचा प्रस्ताव, आता असे होणार...

EPFO Update : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या म्हणजे ईपीएफओ (EPFO) सदस्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारने फेटाळला आहे. ईपीएफओ आपल्या पीएफ खातेधारकांना पेन्शनची सुविधा देते. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी नोकरदारांना आर्थिक मदत होते. तसे पाहिल्यास पीएफ ग्राहकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होते आहे.

EPFO Pension
ईपीएफओ पेन्शन 
थोडं पण कामाचं
  • अर्थमंत्रालयाने पेन्शनवाढ नाकारली
  • ईपीएफओकडून पीएफ खातेधारकांना पेन्शनची सुविधा
  • अनेक दिवसांपासून होती पेन्शनवाढीची मागणी

EPFO Pension Update: नवी दिल्ली : नोकरदारांसाठी पीएफ (PF)आणि पेन्शन (Pension) या अत्यंत महत्त्वाच्या बाबी असतात. या पार्श्वभूमीवर नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या म्हणजे ईपीएफओ (EPFO) सदस्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारने फेटाळला आहे. ईपीएफओ आपल्या पीएफ खातेधारकांना पेन्शनची सुविधा देते. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी नोकरदारांना आर्थिक मदत होते. तसे पाहिल्यास पीएफ ग्राहकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होते आहे. आता मात्र कामगार मंत्रालयाचा पेन्शन वाढीचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाने फेटाळला आहे. त्यामुळे करोडो नोकरदारांना झटका बसला आहे. (Government rejects the proposal of Pension hike for EPFO members)

अधिक वाचा - Diabetes Control : ही 5 हिरवी पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहेत वरदान...पाहा जबरदस्त फायदे

पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव

पीएफ ग्राहकांना मिळणारे 1,000 रुपयांचे पेन्शन  वाढवण्याचा प्रस्ताव कामगार मंत्रालयाने दिला होता. संसदीय समिती यासंदर्भात अर्थ मंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागणार आहे. अर्थात हा प्रस्ताव नेमकी किती पेन्शनवाढ करण्याचा होता यासंदर्भातील माहिती मात्र समोर आलेली नाही. कामगार मंत्रालय आणि ईपीएफओच्या उच्च अधिकार्‍यांनी बीजेडी खासदार भर्त्रीहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालील कामगार विषयक संसदीय स्थायी समितीला ईपीएफ पेन्शन योजना आणि त्यातील निधीच्या व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. कामगार मंत्रालयाच्या पेन्शनवाढीच्या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयाने हरकत घेतली आहे. 

अर्थमंत्रालयाच्या निर्णयानंतर समितीने आता या हालचालीबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी अर्थ मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांना बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. कामगार विषयक संसदीय स्थायी समितीने विविध ईपीएफओ सदस्य, विधवा इत्यादी पेन्शनधारकांना किमान 2,000 रुपयांची पेन्शन वाढ देण्याचा प्रस्ताव दिला होता.

अधिक वाचा - Weather Change Sickness: सावधान! बदलणारा ऋतु घेऊन येतोय ‘हे’ गंभीर आजार, असा करा बचाव

ईपीएफओची सुविधा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) केंद्रीय पेन्शन वितरण प्रणाली स्थापन करण्याच्या प्रस्तावावर विचार करत असून त्याला मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. या प्रणालीच्या स्थापनेमुळे, देशभरातील 73 लाख पेन्शनधारकांच्या खात्यावर निवृत्ती वेतन एकाच वेळी हस्तांतरित केले जाऊ शकते. सध्या EPFO ​​ची 138 प्रादेशिक कार्यालये त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या खात्यात पेन्शन हस्तांतरित करतात. ईपीएफओने पेन्शनर्ससाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. आता पेन्शनधारक त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी चेहरा ओळखण्याच्या सुविधेची (Face Authentication)मदत घेऊ शकतात. वृद्धापकाळामुळे ज्यांना त्यांचे बायोमेट्रिक्स (फिंगरप्रिंट आणि बुबुळ) जुळवण्यात अडचणी येतात अशा निवृत्तीवेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र दाखल करण्यास मदत होईल.

अधिक वाचा - Diabetes अन् Cholesterolसह 15 आजार दूर करते 'ही' भाजी, म्हटलं जातं ऑल इन वन औषधी वनस्पती

ऑनलाइन फ्रॉडच्या संख्येत वाढ होत असल्याचे पाहत ईपीएफओ आपल्या सदस्यांना सावध केले आहे. ईपीएफओने म्हटले आहे की, ईपीएफओ कधीही आपल्या सदस्यांकडून म्हणजे ईपीएफ खातेधारकांकडून आधार, पॅन, यूएएन, बँक तपशीलांची माहिती विचारत नाही. त्यामुळेच जर कोणी फोन किंवा सोशल मीडियावर अशी माहिती तुमच्याकडे मागितली तर काळजी घ्या आणि ही माहिती अजिबात देऊ नका. अशा फसव्या फोन कॉलला प्रतिसाद देऊ नका किंवा अशा कोणत्याही संदेशांना उत्तर देऊ नका.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी