Small Saving Scheme Update : सर्वसामान्य गुंतवणुकदारांसाठी महत्त्वाची बातमी! या अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ

Interest rates : अल्पबचत योजनांवरील व्याजदरात आगामी तिमाहीसाठी वाढ झाली आहे. अल्पबचत योजना या सर्वसामान्यांचा गुंतवणुकीचा आवडता पर्याय आहे. केंद्र सरकारने 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांवरील व्याजदरात 30 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे. अर्थात काही योजना अशाही आहेत ज्यावरील व्याजदरात बदल करण्यात आलेले नाहीत.

small savings schemes
अल्पबचत योजनांवरील व्याजदर 
थोडं पण कामाचं
  • केंद्र सरकारने गुरुवारी तिसऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनेसाठी नवीन व्याजदर जाहीर केले
  • अल्पबचत योजनांवरील व्याजदरात 30 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे.
  • काही अल्पबचत योजनांचे व्याजदर मात्र जैसे थे

Small Saving Scheme Interest Rates : नवी दिल्ली : सरकारने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना मोठा दिलासा दिला आहे. अल्पबचत योजना (Small Saving Scheme) या सर्वसामान्यांचा गुंतवणुकीचा आवडता पर्याय आहे. सुकन्या समृद्धी योजना, एफडी, किसान विकास पत्र यासारख्या अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने गुरुवारी तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर-डिसेंबर) अल्पबचत योजनेसाठी नवीन व्याजदर (Small Saving Scheme Interest Rates)जाहीर केले. केंद्र सरकारने 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांवरील व्याजदरात 30 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसमधील 3 वर्षांच्या मुदत ठेवींचे व्याजदर सध्याच्या 5.5 टक्क्यांवरून 5.8 टक्के झाले आहेत. इतरही योजनांवरील व्याजदर वाढले आहेत. अर्थात काही योजना अशाही आहेत ज्यावरील व्याजदरात बदल करण्यात आलेले नाहीत. त्याविषयी विस्ताराने जाणून घेऊया. (Government rises interest rates for some small savings schemes amid RBI MPC meeting)

अधिक वाचा: WhatsApp Video Call : आता व्हिडीओ कॉलिंग आणखी होणार सोपे, WhatsApp ने आणले नवीन फीचर

सरकारने वाढवले व्याजदर 

अल्पबचत योजनांवरील व्याजदरात आगामी तिमाहीसाठी वाढ झाली आहे. केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर 7.4% वरून 7.6% केला आहे. तर किसान विकास पत्रासाठी (KVP) व्याजदर 6.9% वरून 7% वर नेला आहे. याशिवाय दोन आणि तीन वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरदेखील वाढवला आहे. एवढेच नाही तर किसान विकास पत्राबाबतच्या कालावधीतदेखील बदल करण्यात आला आहे. तुमच्या माहितीसाठी आता किसान विकास पत्रासाठीचा गुंतवणूक कालावधी 123 महिने करण्यात आला आहे तर व्याजदर 7 टक्के करण्यात आला आहे.

अधिक वाचा: Free Data : 50 जीबी डेटा मोफत देणारा जबरदस्त स्वस्त प्लॅन, इतरही सुविधा

या योजनांच्या व्याजदरात बदल नाही

एकीकडे सरकारने काही अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. तर दुसरीकडे बचत ठेवी, 1-वर्ष, 5-वर्षांसाठीच्या एफडी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NCS), सुकन्या समृद्धी योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)या योजनांवरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे या योजनांच्या गुंतवणुकदारांना मोठा झटका बसला आहे. या योजनांचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत.  या योजनांच्या गुंतवणुकदारांना पूर्वीप्रमाणेच व्याजदर मिळत राहतील. 

अधिक वाचा: Online Shopping: बिनधास्त करा ऑनलाइन शॉपिंग, 'हे' अ‍ॅप्स देतील दुप्पट डिस्काउंट

आरबीआयची बैठक (RBI MPC meeting)

लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे अल्पबचत योजनांवरील व्याजदरांसंदर्भातील घोषणा आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर केली जाते. मात्र यावेळी सरकारने हे नवे व्याजदर एक दिवस आधीच जाहीर केले आहे. वास्तविक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची बैठक 28 सप्टेंबर रोजी सुरू झाली आणि 30 सप्टेंबर रोजी संपणार आहे. अशा स्थितीत उद्या धोरणात्मक दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

अल्पबचत योजना या गुंतवणुकीचा चांगला पर्याय असतात. सरकारद्वारे या योजना संचालित केल्या जात असल्यामुळे त्यातील भांडवल सुरक्षित तर असतेच शिवाय त्यावर चांगले व्याजदेखील मिळते. शिवाय यात नियमित बचतीद्वारे गुंतवणूक करता येत असल्यामुळे दीर्घकालावधीत मोठी रक्कम उभारता येते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी