EPF interest rate for 2021-22 : नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफ म्हणजे प्रॉव्हिडंड फंड (EPF)हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो. निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनात प्रॉव्हिडंड फंडाचे महत्त्व मोठे असते. मात्र आता केंद्र सरकारने ईपीएफवरील व्याजदरात (EPF Interest rate)कपात केली आहे. 2021-22 या वर्षासाठी आता 8.1 टक्के व्याज मिळणार आहे. ईपीएफच्या व्याजदरात कपात केली जाऊ शकते, अशी चर्चा आधीच सुरू झाली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांवर आणण्याच्या ईपीएफओ (EPFO) बोर्डाच्या प्रस्तावाचे समर्थन केले होते. त्या म्हणाल्या होत्या की 40 वर्षांपासून व्याजदर कमी केले गेलेले नाहीत आणि नव्याने कमी केलेले दर आजचे वास्तव दर्शवते. इतर अल्पबचत योजनांवरील व्याजदर आणखी कमी आहेत. (Government slashed EPF interest form 8.5 % to 8.1% for 2021-22)
अर्थमंत्री सीतारामन यांनी राज्यसभेत सांगितले होते की, 40 वर्षांपासून दर कमी केले गेले नाहीत. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्डाकडून घेतलेल्या निर्णयांच्या संदर्भात आता अर्थमंत्रालय शिक्कामोर्तब केले आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे आला होता. ईपीएफओने (EPFO)मार्च महिन्यात सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या 230 व्या बैठकीनंतर जाहीर केले होते की PF व्याज निधीला 8.1 टक्के कमी व्याज मिळेल. हा व्याजदर चार- दशकातील सर्वात कमी व्याजदर आहे.
अधिक वाचा : Passport Photo Change : पासपोर्टमधील फोटो कसा बदलायचा? जाणून घ्या हे कसे करायचे...
अधिक वाचा : LIC Dividend : एलआयसीच्या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी लाभांश जाहीर, गुंतवणुकदारांना मिळणार इतके पैसे...
चालू आर्थिक वर्षाच्या खर्चावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना सीतारामन पुढे म्हणाले, 'ईपीएफओचे एक केंद्रीय बोर्ड आहे जे त्यांना कोणता दर द्यायचा हे ठरवते आणि त्यांनी काही काळ त्यात बदल केलेला नाही. पण आता त्यांनी ते 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्के केले आहे.
गेल्या चार वर्षांत ईपीएफओवरील व्याजदरात अनेक वेळा कपात करण्यात आली आहे. 2019-20 मध्ये भविष्य निर्वाह निधी ठेवीवरील व्याजदर 8.5 टक्के होता, तर 2018-19 मध्ये तो 8.65 टक्के आणि 2017-18 मध्ये 8.55 टक्के होता. शेवटच्या वेळी जेव्हा EPF दर 8.1 टक्क्यांच्या अगदी जवळ होता तेव्हा 2011-12 मध्ये जेव्हा सेवानिवृत्ती निधी संस्थेने आपल्या सदस्यांना 8.25 टक्के-8.5 टक्के दर दिला होता.
दरम्यान, EPFO ने मार्च 2022 मध्ये 15.32 लाख सदस्य जोडले, या वर्षी फेब्रुवारीमध्ये असलेल्या 12.85 लाख नोंदणीकृत सदस्यांहून हे 19 टक्क्यांहून अधिक आहेत. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या तात्पुरत्या EPFO पेरोल डेटामध्ये मार्च 2022 मध्ये 15.32 लाख निव्वळ सदस्य जोडले गेले आहेत, असे कामगार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.