Passenger regulation : आता विजय मल्ल्या, नीरव मोदीसारखे लोक पळून जाऊ शकणार नाहीत, सरकार करते आहे ही व्यवस्था

Passenger regulation : विजय मल्ल्या(Vijay Mallya), नीरव मोदी (Nirav Modi)आणि मेहुल चोक्सीसारखे (Mehul Choksi) लोक शांतपणे देश सोडून पळून जाऊ शकणार नाहीत. या लोकांवर देशातील बँकांची अब्जावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे आणि ते आता परदेशात आरामात राहत आहेत. पण भविष्यात हे टाळण्यासाठी सरकार खात्रीपूर्वक व्यवस्था करत आहे. सरकारने विमान कंपन्यांना सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्काची आणि देयकाची माहिती सीमाशुल्क अधिकाऱ्यांना विमान उड्डाणाच्या 24 तास आधी देण्यास सांगितले आहे.

Passenger regulation
मल्ल्या, नीरव मोदसारखे फरार होणे आता शक्य नाही 
थोडं पण कामाचं
  • विजय मल्ल्या आणि नीरव मोदीसारखे आता फ्रॉड करून देश सोडून पळून जाता येणार नाही
  • आंतरराष्ट्रीय प्रवाशासंदर्भात सरकारने उचलली पावले
  • विमान कंपन्यांना आता आंतरराष्ट्रीय प्रवाशांची माहिती कस्टम्सला द्यावी लागणार

Government inititative to catch fraudsters : नवी दिल्ली : विजय मल्ल्या(Vijay Mallya), नीरव मोदी (Nirav Modi)आणि मेहुल चोक्सीसारखे (Mehul Choksi) लोक शांतपणे देश सोडून पळून जाऊ शकणार नाहीत. या लोकांवर देशातील बँकांची अब्जावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे आणि ते आता परदेशात आरामात राहत आहेत. पण भविष्यात हे टाळण्यासाठी सरकार खात्रीपूर्वक व्यवस्था करत आहे. सरकारने विमान कंपन्यांना सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्काची आणि देयकाची माहिती सीमाशुल्क अधिकाऱ्यांना विमान उड्डाणाच्या 24 तास आधी देण्यास सांगितले आहे. गुन्हेगारांना देश सोडून पळून जाणे शक्य होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. (Government takes initiative to avoid cases like Vijay Mallya and Nirav Modi)

अधिक वाचा : कॉमनवेल्थमध्ये मेडल जिंकणाऱ्या या खेळाडूला मोदी म्हणाले 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स'

कस्टम्सला माहिती द्यावी लागणार

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) सोमवारी 'पॅसेंजर नेम रेकॉर्ड इन्फॉर्मेशन रेग्युलेशन, 2022' अधिसूचित करून विमान कंपन्यांना त्याचे पालन करण्यास सांगितले. आर्थिक आणि इतर गुन्हेगार पळून जाण्यापासून रोखण्यासाठी प्रवाशांचे जोखमीचे विश्लेषण करणे हा या नियमाचा उद्देश आहे. या तरतुदीमुळे तस्करीसारख्या बेकायदेशीर धंद्याला आळा घालण्यास मदत होणार आहे. या अधिसूचनेनुसार, “प्रत्येक विमानसेवा कंपनीने प्रवाशांची नावे आणि इतर नोंदी सीमाशुल्क विभागाला कळवाव्यात. ही माहिती सामान्य व्यवसायिक कामकाजाचा भाग म्हणून विमानसेवा कंपनीकडून आधीच गोळा केली गेली आहे.

अधिक वाचा :  मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, 12000 हून कमी किमतीची चीनी मोबाइल होणार बंद?

कोणत्या प्रवाशांची माहिती देणे आवश्यक

त्यात पुढे म्हटले आहे की प्रत्येक विमानसेवा कंपनीला याच्या अंमलबजावणीसाठी कस्टम्सकडे नोंदणी करावी लागेल. विमान कंपन्यांना भारतात येणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची माहिती द्यावी लागेल. या माहितीमध्ये प्रवाशाचे नाव, बिलिंग पेमेंट माहिती (क्रेडिट कार्ड नंबर), तिकीट जारी करण्याची तारीख आणि त्याच PNR तिकिटावर प्रवास करणाऱ्या इतरांची नावे समाविष्ट असतील.

अधिक वाचा : क्रिकेट जगतावर शोककळा, या प्रसिद्ध अंपायरचे झाले निधन

विजय मल्ल्या मार्च २०१६ पासून इंग्लंडमध्ये फरार झाला आहे. कर्जबाजारी झालेल्या आणि बंद पडलेल्या मल्ल्याच्या किंग फिशर एअरलाइन्सवर ९,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. मात्र हे कर्ज बुडवून मल्ल्या फरार झाला आहे. सध्या तो इंग्लंडमध्ये जामिनावर आहे. सध्या मल्ल्याविरोधात भारत सरकारकडून लंडनच्या न्यायालयात प्रत्यार्पणासंदर्भात खटला लढवला जातो आहे.

अलीकडेच काही दिवसांपूर्वी मल्ल्याच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता. फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्याच्या (Vijay Mallya)मुंबईतील किंगफिशर हाऊसची (Kingfisher House) विक्री झाली होती. हैदराबाद येथील एक बांधकाम व्यावसायिकाने विजय मल्ल्याचे किंगफिशर हाऊस ५२ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. या बांधकाम कंपनीचे नाव सॅटर्न रिअॅल्टर्स (Saturn Realtors)असे आहे. मल्ल्याला कर्ज देणाऱ्या बॅंकांनी किंगफिशर हाऊस विकण्याचे अनेक प्रयत्न याआधी केले होते. मात्र त्यांना किंगफिशर हाऊससाठी ग्राहक मिळत नव्हते. सॅटर्न रिअॅल्टर्सने बॅंका मागत असलेल्या किंमतीच्या कितीतरी कमी किंमतीत ही मालमत्ता विकत घेतली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी