Government Scheme | आता सरकार विवाहितांना देणार मोठा लाभ, दरमहा मिळणार 44,793 रुपये

married scheme : विवाहितांनी (Married People)आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) विवाहितांची झोळी भरणार आहे. त्यांच्या सर्व चिंता थोड्याशा गुंतवणुकीने संपणार आहेत. पत्नीला स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने ही कमी बचत योजना सुरू केली. ज्याला खूप पसंती दिली जात आहे. न्यू पेन्शन सिस्टम (NPS) मध्ये गुंतवणूक करून तुम्ही दरमहा 44,793 रुपये कमवू शकता. जर तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असाल, तर तुम्ही विलंब न करता अर्ज करू शकता.

Government scheme for married people
विवाहितांसाठी सरकारची फायदेशीर योजना 
थोडं पण कामाचं
  • पत्नीला स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने मोठी योजना आणली आहे
  • छोट्याशा बचतीद्वारे मिळेल १.२ कोटी रुपयांचा लाभ
  • होईल म्हातारपणीचे आर्थिक नियोजन, व्हाला चिंतामुक्त

NPS for Married Couple : नवी दिल्ली : विवाहितांनी (Married People)आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) विवाहितांची झोळी भरणार आहे. त्यांच्या सर्व चिंता थोड्याशा गुंतवणुकीने संपणार आहेत. पत्नीला स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने ही कमी बचत योजना सुरू केली. ज्याला खूप पसंती दिली जात आहे.  न्यू पेन्शन सिस्टम (NPS) मध्ये गुंतवणूक करून तुम्ही दरमहा 44,793 रुपये कमवू शकता. जर तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असाल, तर तुम्ही विलंब न करता अर्ज करू शकता. कारण एनपीएसमध्ये गुंतवणूक (Investment) केल्यास तुम्हाला वार्षिक 10 टक्के परतावा मिळतो. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही 60 वर्षांचे व्हाल, तेव्हा तुमच्या पत्नीच्या खात्यात एकूण 1.12 कोटी रुपये जमा होतील. ज्यानंतर तुमच्या सर्व चिंता संपतील. (Government's this scheme for married people can make good retirement planning)

अधिक वाचा : Gold Price Today | सोने-चांदी झाले स्वस्त...ग्राहकांमध्ये खरेदीचा जोरदार उत्साह, पाहा आजचा सोन्याचा भाव, करा संधीचे सोने!

जबरदस्त फायद्याची एनपीएस योजना

वास्तविक, पत्नीला स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केली होती. ज्यामुळे तुमच्या म्हातारपणाच्या चिंता दूर होतील आणि आर्थिक ताण येणार नाही. कारण जेव्हा तुम्ही 60 वर्षांचे असाल, तेव्हा या योजनेतून तुम्हाला पैसे मिळू लागतात. एवढेच नाही तर पत्नी स्वत:च्या पैशाने काही व्यवसायही सुरू करू शकते. याद्वारे नियमित उत्पन्न मिळत राहील आणि पती-पत्नीचे भविष्य चांगले होईल. योजनेत सामील होण्यासाठी, तुम्ही कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पत्नीच्या नावावर नवीन पेन्शन सिस्टम खाते उघडू शकता.

अधिक वाचा : Investment Tips | तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करूनदेखील जास्त परतावा देखील मिळवू शकता! जाणून घ्या या खास टिप्स

1,000 रुपयांत उघडा खाते 

न्यू पेन्शन सिस्टम म्हणजे नवीन पेन्शन प्रणाली अंतर्गत नवीन खाते उघडण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याचीही गरज नाही. या योजनेअंतर्गत फक्त एक हजार रुपयांमध्ये खाते उघडून तुम्ही लाभ घेऊ शकता. वयाच्या 60 व्या वर्षी, जेव्हा तुमच्या खात्याची मॅच्युरिटी पूर्ण होईल, तेव्हा तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. इथे लक्षात घ्या की जर तुमची पत्नी 30 वर्षांची असेल आणि तुम्ही तिच्या एनपीएस खात्यात दरमहा पाच हजार रुपये गुंतवले तर 60 वर्षांच्या वयापर्यंत तिच्या खात्यात 1.12 कोटी रुपये जमा होतील. यातून त्यांना सुमारे 45 लाख रुपये मिळतील. याशिवाय त्यांना दरमहा सुमारे 45 हजार रुपये पेन्शन मिळू लागेल.

अधिक वाचा : Social Media Profile | तुमचे सोशल मीडिया प्रोफाइल कसे आहे? व्हा जागरुक...नोकरी देताना कंपन्या पाहतात तुमचे प्रोफाइल

योजनेची वैशिष्ट्ये

एनपीएस म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS – National Pension System) ही PFRDA द्वारे संचलित स्कीम आहे. यामध्ये इक्विटी प्रकारातसुद्धा गुंतवणूक केलेली असते. या योजनेत ६०व्या वर्षी तुम्हाला एकरकमी संपूर्ण रक्कमदेखील मिळते. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी व्यक्तीचे वय १८ ते ६५ वर्षांदरम्यान असले पाहिजे. एनपीएसमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. यात पहिला पर्याय टियर-१ हा असतो आणि दुसरा पर्याय टियर-२ हा असतो. या योजनेत फक्त १,००० रुपयांद्वारे खाते उघडता येते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी