Govt puts curbs on sugar export, India ban sugar export : नवी दिल्ली : भारत सरकारने गव्हापाठोपाठ साखरेवर निर्यातबंदी लागू केली आहे. साखरेवरील निर्याबंदी १ जून २०२२ पासून लागू होणार आहे. भारत सरकारची विशेष परवानगी असेल तरच बंदी काळात संबंधित देशात साखरेची निर्यात होणार आहे. याआधी भारत सरकारने ज्यांना १३ मे २०२२ च्या आधी लेटर ऑफ क्रेडिट दिले आहे त्यांना निर्यातीची परवानगी आहे इतरांना पुढील आदेशापर्यंत निर्यात करता येणार नाही अशा स्वरुपाचा आदेश काढून गव्हाच्या निर्यातीवर बंदी लागू केली. गहू निर्यात बंद करतानाही भारत सरकारने बंदी काळात विशेष परवानगीच्याआधारे निर्यात करता येईल अशी मुभा दिली आहे. । काम-धंदा
LPG Gas Cylinder : तुम्हाला मिळू शकतो 200 रुपयांनी स्वस्त एलपीजी गॅस सिलिंडर, करा फक्त हे काम...
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल ९.५० रु. डिझेल ७ रु. स्वस्त तर LPG सिलेंडरवर २०० रुपयांची सबसिडी
दर नियंत्रणात ठेवणे आणि देशातील गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा करणे या उद्देशाने साखर निर्यातबंदी लागू करत असल्याचे भारत सरकारने जाहीर केले. साखरेवरील निर्यातबंदी ३१ ऑक्टोबर २०२२ किंवा पुढील आदेश यापैकी जे आधी येईल तिथपर्यंत लागू असेल.
रॉ शुगर अर्थात कच्ची किंवा प्रक्रिया न केलेली साखर, रिफाइंड शुगर अर्थात प्रक्रिया केलेली साखर आणि व्हाईट शुगर अर्थात पांढरी साखर या तीन प्रकारच्या साखरेवर निर्यातबंदी लागू आहे. भारतातून युरोपियन युनियन आणि अमेरिकेला सीएक्सएल कोटा आणि टीआरक्यू कोटा अंतर्गत होणाऱ्या साखरेच्या निर्यातीवर बंदी नसल्याचेही सरकारने जाहीर केले आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. तर ब्राझील हा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे, त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. खरं तर, ऑक्टोबर २०२१ ते एप्रिल २०२२ दरम्यान, भारताने ७१ लाख टन साखर निर्यात केली आहे, जी ६४ टक्के जास्त आहे. मे महिन्यात ८ ते १० लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता आहे. तसेच २०२१-२२ मध्ये ९० लाख साखर निर्यात होण्याची अपेक्षा आहे. याआधीच्या वर्षी ७२ लाख टन साखर निर्यात झाली होती.