Govt puts curbs on wheat export, India ban wheat export : नवी दिल्ली : भारतातून गहू निर्यात करण्यावर केंद्र सरकारने पुढील आदेशापर्यंत बंदी लागू केली आहे. ही बंदी देशातले गव्हाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात लागू केली आहे.
जगाला सर्वाधिक गहू निर्यात करणाऱ्या देशांमध्ये युक्रेन हा देश आघाडीवर आहे. पण रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या लढाईमुळे युक्रेनमधून होणाऱ्या गहू निर्यातीवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत भारतीय गहू निर्यात सुरू केली आणि नंतर देशात गव्हाची मागणी असताना गव्हाची कमतरता भासली तर दर वधारतील. हा धोका टाळण्यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी लागू केली आहे. गव्हाचा देशाला आवश्यक साठा करून झाल्यानंतर गहू निर्यातीसाठी परवानगी दिली जाईल, असे वृत्त आहे.