Job Opportunities | नव्या वर्षात मिळणार बंपर नोकऱ्या...मात्र ओमायक्रॉनची आहे चिंता

Job Opportunities in new year | उद्योगधंद्यांमध्ये आलेल्या गतीबरोबरच कंपन्यांच्या महसूलात वाढ (Business growth) झाल्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नव्या वर्षात म्हणजे २०२२ मध्ये रोजगाराच्या (employment)आणि नोकरीच्या संधी (job Opportunities)निर्माण होण्याची अपेक्षा आहे. मात्र यावर कोरोना महामारीचा नवा अवतार म्हणजे ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे (Omicron variant) अडथळे येऊ शकतात.

Job Opportunities in New Year
नव्या वर्षात नोकरीच्या मोठ्या संधी 
थोडं पण कामाचं
  • नव्या वर्षात म्हणजे २०२२ मध्ये नोकऱ्यांची मोठी संधी
  • कंपन्या आणि उद्योगांकडून नव्या नोकरभरतीत मोठी वाढ होण्याची चिन्हे
  • नोकरभरतीसाठी मोठ्या कंपन्या आहेत उत्सुक

Job Opportunities in New Year | नवी दिल्ली : नोकऱ्यांच्या शोधात असणाऱ्यांना २०२२ मध्ये अनेक संधी (Jobs)मिळू शकतात. उद्योगधंद्यांमध्ये आलेल्या गतीबरोबरच कंपन्यांच्या महसूलात वाढ (Business growth) झाल्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नव्या वर्षात म्हणजे २०२२ मध्ये रोजगाराच्या (employment)आणि नोकरीच्या संधी (job Opportunities)निर्माण होण्याची अपेक्षा आहे. मात्र यावर कोरोना महामारीचा नवा अवतार म्हणजे ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे (Omicron variant) अडथळे येऊ शकतात. ओमायक्रॉनमुळे जगाबरोबरच भारताचीदेखील चिंता वाढवली आहे. (Great job Opportunities in new year, but Omicron may be a concern)

कोरोनाच्या संकटाचे आव्हान टिकून

आगामी काळात नोकऱ्यांच्या संधी वाढू शकतात किंवा रोजगाराची उपलब्धता वाढू शकते मात्र पुढील काही दिवस यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्यामुळे अर्थचक्रावर आणि उद्योग धंद्यांवर विपरित परिणाम न होणे जास्त महत्त्वाचे आहे. तसे झाल्यास पुन्हा नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. २०२० मध्ये आलेले कोरोना महामारीचे संकट अद्याप संपलेले नाही. २०२०च्या पहिल्या सहामाहीत अर्थव्यवस्थेवर फारच गंभीर परिणाम झाले होते. उद्योगधंदे ठप्प झाले होते. यामुळे विविध क्षेत्रातील रोजगारावर फारच वाईट परिणाम झाला होता. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. मात्र उद्योगधंदे आणि रोजगाराच्या पातळीवर परिस्थिती सकारात्मक होताना दिसते आहे.

अर्थचक्राने पकडला वेग

ओमायक्रॉनची लाट आली काय किंवा न आली काय, पूर्ण लॉकडाउनचे दिवस आता मागे सरले आहेत. यापुढे ग्राहक असो की उद्योगधंदे, कार्यालये, कामकाज आणि आरोग्य यात एक संतुलन तयार करावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कार्यालयात जाऊन काम करायचे आहे. कंपन्या नोकरभरतीसाठी पुन्हा उत्सुक आहेत. विविध उपाययोजना आणि लसीकरणामुळे अर्थचक्राने वेग पकडला आहे.

तज्ज्ञांना काय वाटते?

सध्या विविध कंपन्यांचा विस्तार, शेअर बाजारातील आयपीओ, कंपन्यांचे विलीनीकरण, खरेदी इत्यादीमध्ये तेजी आली आहे. लसीकरणाचा वेग वाढल्यानंतर २०२२ मध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोना संकटाची टांगती तलवार आहे, मात्र मोठ्या कंपन्या आणि स्टार्टअप नव्या नोकरभरतीसंदर्भात उत्साही आहेत. जानेवारी ते मार्च या काळात मागील आठ वर्षातील सर्वात मोठी नोकरभरती होण्याची शक्यता आहे. भारतात जवळपास ४९ टक्के कंपन्या नवी नोकरभरती करण्याच्या तयारीत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत ४३ टक्के अधिक नोकरभरती होण्याची शक्यता आहे. खास कौशल्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना भरपूर मागणी असणार आहे.

मागील दीड वर्षात रुळावरून घसरलेली अर्थव्यवस्थेची गाडी आता रुळावर आली आहे. देशातील उद्योगधंद्यांनी विस्ताराला सुरूवात केली आहे. कंपन्या विस्तार करत आहेत आणि नवी नोकरभरती करत आहेत. त्यामुळे तरुणांना नव्या वर्षात नोकरीच्या दमदार संधी उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. त्यातही ज्यांच्याकडे खास कौशल्ये आहेत अशांना खास मागणी असणार आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी