पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम: एकदाच लावा 2 लाख रुपये, व्याजाच्या रुपात नंतर मिळतील 66,000 रुपये

या योजनेअंतर्गत आपल्याला एकरकमी दोन लाख रुपये जमा करावे लागतील आणि यावर आपल्याला दर महिन्याला व्याजाच्या रुपात उत्पन्न मिळेल, यात वैयक्तिक गुंतवणूकदार कमाल 4.5 लाखांची गुंतवणूक करू शकतो.

Money
पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम: एकदाच लावा 2 लाख रुपये, व्याजाच्या रुपात नंतर मिळतील 66,000 रुपये 

थोडं पण कामाचं

  • पोस्ट ऑफिस मंथली इनकम योजनेत गुंतवा पैसे
  • 1 लाख गुंतवल्यास दरवर्षी मिळणार 6600 रुपये
  • 5 वर्षांच्या आधी पैसे काढल्यास कापले जाणार पैसे

गुंतवणुकीच्या (Investment) दृष्टीने पोस्ट ऑफिस (post office) एक चांगला पर्याय मानला जातो. इथे आपल्याला चांगले रिटर्न्सही (good returns) मिळतात. आज आम्ही आपल्याला पोस्ट ऑफिसच्या अशा योजनेबद्दल (scheme) सांगणार आहोत जिथे आपल्याला 6.6 टक्के या दराने वार्षिक रिटर्न्स (yearly returns) मिळू शकतात. या योजनेअंतर्गत आपल्याला एकरकमी पैसे (one-time money) जमा करावे लागतील आणि त्यावर मासिक व्याज उत्पन्न (monthly interest income) मिळेल. यात वैयक्तिक गुंतवणूकदार (individual investor) कमाल 4.5 लाखांची गुंतवणूक करू शकतो तर संयुक्त खात्यात (joint account) 9 लाखांपर्यंतची गुंतवणूक करता येते.

पोस्ट ऑफिस मंथली इनकम योजनेत गुंतवा पैसे

पोस्ट ऑफिसमध्ये आपला पैसा सुरक्षित राहतो. पोस्ट ऑफिसच्या या नव्या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस मंथली इनकम योजना असे आहे. याचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा आहे. गुंतवणूक मॅच्युअर झाल्यानंतर आपल्याला पूर्ण रक्कम मिळते. या योजनेची खासियत अशी की ही पूर्णपणे जोखीममुक्त आहे आणि यावर मासिक व्याज मिळते. रिटर्न्स हे पूर्णपणे खात्रीशीर आहेत. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचे कुणीही यात नाव नोंदवू शकते. अल्पवयीनांच्या नावाने त्यांचे पालकही याचा लाभ घेऊ शकतात. याअंतर्गत कमीत कमी 1 हजार रुपये तर कमाल 4.5 लाख रुपये गुंतवता येतात. ही रक्कम 100च्या पटीत असावी लागते.

1 लाख गुंतवल्यास दरवर्षी मिळणार 6600 रुपये

या योजनेत गुंतवणूक केल्यास सिंपल व्याजमोजणी होते. जर आपण 1 लाख रुपये गुंतवलेत तर आपल्याला एका वर्षात 6600 रुपये आणि दर महिन्याला 550 रुपये मिळतील. ही रक्कम पाच वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळत राहील. दोन लाख रुपये गुंतवल्यास दर महिन्याला 1100 रुपये आणि एका वर्षात 143200 रुपये आणि पाच वर्षांत एकूण 66000 रुपये मिळतील. तर तीन लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1650, 4 लाखांच्या गुंतवणुकीवर 2200 रुपये मिळत राहतील.

5 वर्षांच्या आधी पैसे काढल्यास कापले जाणार पैसे

या योजनेत गुंतवणूक केल्यास एका वर्षाच्या आधी जमा रक्कम काढता येणार नाही. जर आपण एका वर्षानंतर आणि तीन वर्षांच्या आधी गुंतवणूक काढून घेतली तर यातून 2 टक्के रक्कम वजा केली जाईल. तीन वर्षांच्या नंतर आणि पाच वर्षांच्या आधी खाते बंद केल्यास 1 टक्के रक्कम ही कापून घेतली जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी