Tax Evasion | देशभरातील क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजवर जीसएटी यंत्रणेचा हातोडा, मोठी कर चोरी उघड!

Cryptocurrency market: डीजीजीआय अधिकाऱ्यांनी वझिरएक्स (WazirX)या क्रिप्टोकरनी एक्सचेंज सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या आवारात, कार्यालयात शोध मोहिम हाती घेतली होती. या कंपनीकडून एक अॅपदेखील चालवले जाते. वझिरएक्सला कर चुकवल्याबद्दल (Tax evasion)४९.२० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. वझिरएक्सने क्रिप्टोकरन्सीच्या (Cryptocurrency)खरेदी-विक्रीसाठी एक्सचेंजची सेवा पुरवताना मोठ्या प्रमाणात कर चुकवला आहे.

Crackdown on cryptocurrency exchanges
क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजवर जीएसटीची मोठी कारवाई 
थोडं पण कामाचं
  • जीएसटी विभागाची क्रिप्टोकरन्सी अॅपच्या कार्यालयावर छापे
  • वझिरएक्स या अॅपने कोट्यवधींच्या जीएसटी कराची केली चोरी
  • क्रिप्टोकरन्सीवरील नियमनासाठी सरकार प्रयत्नशील

Crackdown on cryptocurrency exchanges: नवी दिल्ली : डायरेक्टोरेट जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजन्सने (डीजीजीआय) (DGGI)देशातील क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांसाठी (Cryptocurrency exchanges)सेवा देणाऱ्या मोठ्या कंपन्या, अॅप्स यांची करचोरी पकडली आहे. डीजीजीआय अधिकाऱ्यांनी वझिरएक्स (WazirX)या क्रिप्टोकरनी एक्सचेंज सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या आवारात, कार्यालयात शोध मोहिम हाती घेतली होती. या कंपनीकडून एक अॅपदेखील चालवले जाते. वझिरएक्सला कर चुकवल्याबद्दल (Tax evasion)४९.२० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. वझिरएक्सने क्रिप्टोकरन्सीच्या (Cryptocurrency)खरेदी-विक्रीसाठी एक्सचेंजची सेवा पुरवताना मोठ्या प्रमाणात कर चुकवला आहे. (GST Mumbai office Crackdown on cryptocurrency exchanges across country for tax evasion)

जीएसटी कार्यालयाची कारवाई

जीएसटीच्या मुंबईतील झोनल कार्यालयाने वझिरएक्सवर आपल्या व्यवसायावरील ४०.५ कोटी रुपयांचा जीएसटी कर चुकवल्या आरोप लावला आहे. जीएसटीच्या मुंबई कार्यालयाने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की त्यांनी कंपनीकडून व्याज आणि दंडापोटी ४९.२० कोटी रुपयांची कॅश वसूल केली आहे. वझिरएक्सवरील जीएसटीच्या दणक्याची कारवाई केंद्र सरकारने क्रिप्टोकरन्सीसंदर्भात घेतलेल्या धोरणाची पार्श्वभूमीवर झाली आहे. केंद्र सरकारने भारतात क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्यासाठी कायदा आणण्याचे ठरवले आहे. क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीत भारतात मागील काही कालावधीत ज्या पद्धतीने वाढ झाली आहे ते पाहता सरकारने त्यावर नियमन आणण्याचे ठरवले आहे. बिटकॉइन आणि इथेरियम या लोकप्रिय आणि प्रचलित क्रिप्टोकरन्सी आहेत. या क्रिप्टोकरन्सीचे मूल्य सरकारने संसदेत बिल आणण्याचे ठरवल्यावर घसरले होते.

क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ

क्रिप्टोकरन्सीमध्ये खूपच चढउतार असतात. यात वेगाने वाढ होते आणि त्यापेक्षा जास्त वेगाने घसरण होते. यावर्षी बिटकॉइन ६५,००० डॉलरच्या पलीकडे पोचले होते. मात्र घसरण झाल्यावर तो ३०,००० डॉलरच्या खाली आला होता. सध्या बिटकॉइन (Bitcoin) ५१,००० डॉलरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. २०२२ मध्ये क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल करन्सीच्या गुंतवणुकदारांचे काय होणार हे बरेचसे केंद्र सरकारच्या धोरणावर अवलंबून आहे. सप्टेंबर महिन्यात चीनने क्रिप्टोकरन्सीच्या ट्रान्झॅक्शनवर पूर्ण बंदी आणली होती. अर्थात जाणकारांच्या मते ब्लॉकचेन तंत्रज्ञान (Blockchain technology) जगभर मोठ्या प्रमाणात स्वीकारले जाते आहे. भारतात सरकारने क्रिप्टोकरन्सीवर बिल आणण्याची तयारी केली आहे. 

दिवसेंदिवस क्रिप्टोकरन्सी  लोकप्रिय होत चालली आहे. तरुणांचा याकडे मोठा ओढा आहे. २०२१ मध्ये क्रिप्टोकरन्सीतील गुंतवणुकीत चांगलीच वाढ झाली आहे. शेअर बाजाराएवढेच आकर्षण क्रिप्टोकरन्सीचे आहे. क्रिप्टोकरन्सीच्या गुंतवणुकदारांसाठी सरलेले वर्ष यादगार ठरले आहे. अनेक डिजिटल करन्सींनी (Digital currency) यावर्षी ७००० टक्क्यांपर्यत परतावा दिला आहे. अर्थात नियमनाच्या पातळीवर सरकार क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण आणण्यासाठी बिल आणण्याच्या तयारीत आहे. आगामी अर्थसंकल्पात क्रिप्टोकरन्सीसंदर्भात काही मार्गदर्शक सूत्रे (Guidelines for cryptocurrency) जाहीर केली जाऊ शकतात. गुंतवणुकदारांसाठी मात्र २०२१ हे वर्ष फारच लाभदायी ठरले. 

रिझर्व्ह बॅंकदेखील क्रिप्टोकरन्सीवर देशात नियंत्रण आणण्यासाठी आग्रही आहे. त्यादृष्टीने आरबीआय अभ्यास करते आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी