जीटीडीसी मान्सून ट्रेक रविवार 14 जुलै 2019 रोजी बुद्रुक शेलॉप येथे

काम-धंदा
Updated Jul 10, 2019 | 18:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

जीटीडीसीचा यंदाच्या हंगामातील चौथा रविवार मान्सून ट्रेक 14 जुलै 2019 रोजी बुद्रुक शेलॉप येथे जाणार आहे. 

GTDC’s enthralling Mhadei river rafting commences
जीटीडीसी मान्सून ट्रेक  

पणजी : जीटीडीसीचा यंदाच्या हंगामातील चौथा रविवार मान्सून ट्रेक 14 जुलै 2019 रोजी बुद्रुक शेलॉप येथे जाणार आहे. 

या रविवारच्या ट्रेकचा कार्यक्रम विविध आकर्षणांनी भरलेला असून त्यात इतिहास आणि साहस यांचं अनोखं मिश्रण अनुभवायला मिळणार आहे. पहिल्यांदा सत्तारी आणि त्यानंतर नागरगाव येथे पोहोचून मग बुद्रुक शेलॉप गाठायचे आहे. तिथे ब्रम्हदेवाचे एक प्राचीन मंदिर पाहायला मिळते. 16 व्या शतकात करमाली ही स्थानिक देवता सत्तारीमध्ये स्थलांतरित करण्यात आली होती. त्यानंतर आपल्याला चार किलोमीटरचा ट्रेक करायचा असून त्यादरम्यान 3 झरे आणि एक मोठा धबधबा पाहायला मिळतो. शेळाप्याच्या गावकऱ्यांद्वारे रूचकर जेवण बनवले जाणार आहे. परतीच्या मार्गावर सर्व ट्रेकर्सना मोफत रोप दिले जाणार आहे. 

बुद्रुक शेलॉप हे सत्तारी तालुक्यातील वाल्पोई, गोव्याजवळ पाहायला मिळणारे छोटे, हंगामी धबधबे असून हा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. पॅकिंग बॅग भरा आणि निसर्गरम्य, सोप्या तरीही साहसी ट्रेकला चला. 

वाहतुकीची सोय म्हापसा रेसिडेन्सी आणि मडगाव रेसिडेन्सीपासून सकाळी अनुक्रमे 7.30 आणि 7.15 वाजता, तर पणजी येथून सकाळी 8.30 वाजता करण्यात आली आहे. जुना गोवा, बाणस्थरी आणि सांखली येथूनही वाहतुकीची सोय ठेवण्यात आली आहे.

इच्छुक ट्रेकर्सनी सोबत कपड्यांचा एक जादा जोड, रेनीवेयर, ट्रेकिंग शूज, खाद्यपदार्थ, दुर्बीण आणावी. धूम्रपान आणि मद्यपानास परवानगी नाही. 

यासाठीचे शुल्क प्रती व्यक्ती 800 रुपये असून त्यात जेवण, प्रवास आणि गाइडच्या खर्चाचा समावेश आहे. 

कृपया नोंद घ्यावी – शारीरिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्यांनी हा ट्रेक करू नये. 

आरक्षणासाठी संपर्क : फ्रॅन्सन - 9130254827/9823270967
अनिल दलाल, जीटीडीसी – 9422057704 व्हॉट्स अप क्रमांक)
ऑनलाइन आरक्षणासाठी - goa-tourism.com

ट्विटर: @TourismGoa
फेसबुक: officialgoatouris
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
जीटीडीसी मान्सून ट्रेक रविवार 14 जुलै 2019 रोजी बुद्रुक शेलॉप येथे Description: जीटीडीसीचा यंदाच्या हंगामातील चौथा रविवार मान्सून ट्रेक 14 जुलै 2019 रोजी बुद्रुक शेलॉप येथे जाणार आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola