JEE Mains 2023 Result OUT: पोरांनो! जेईईचा निकाल आलाय; या लिंकने थेट चेक करा आपला Result

काम-धंदा
भरत जाधव
Updated Feb 07, 2023 | 16:23 IST

National Testing Agency (NTA) Joint Entrance Examination (JEE) Main 2023 Engineering (BE/BTech, paper 1)चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2023 च्या दरम्यान झालेली परीक्षा दिली असेल त्या विद्यार्थ्यांनी आपला निकाल तापसून घ्यावा. देश आणि विदेशात ही परीक्षा घेण्यात आली होती.

Guys! JEE Result Out; Check Here
पोरांनो! जेईईचा निकाल आलाय;येथे करा चेक   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जेईई मेनची अंतिम उत्तरपत्रिका देखील जाहीर करण्यात आली आहे.
  • 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2023 च्या दरम्यान जेईई मेन परीक्षा झाली होती.
  • जेईई मुख्य सत्र 1 पेपर 1 मध्ये, 8.6 लाखांहून अधिक उमेदवारांनी अभियांत्रिकीच्या पेपरसाठी नोंदणी केली होती.

JEE Mains 2023 Result :   National Testing Agency (NTA) Joint Entrance Examination (JEE) Main 2023 Engineering (BE/BTech, paper 1)चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2023 च्या दरम्यान झालेली परीक्षा दिली असेल त्या विद्यार्थ्यांनी आपला निकाल तापसून घ्यावा.  देश आणि विदेशात ही परीक्षा घेण्यात आली होती.  तुमचा निकाल तुम्हाला बघायचा असेल तर येथे दिलेल्या लिंकद्वारे आपण थेट निकाल जाणून घेता येईल. 

(JEE) Main 2023 Results

परिक्षार्थीनी सर्वात आधी   jeemain.nta.nic.in आणि  ntaresults.nic.in येथे जावे
आता  Candidate Activity कॅटेगरीमध्ये येथे  दोन लिंक मिळतील 
Link 1 – Results for JEE MAIN (2023): Paper 1 – B.E. / B.Tech
Link 2 – Results for JEE MAIN (2023): Paper 1 – B.E. / B.Tech

 या लिंकवर करा. येथे आपले ओळखपत्र (Credential) सबमिट करा . पेपर 2 चा अजून निकाल आलेला नाही. परंतु पेपर 1चे निकाल जाहीर करम्यात आले आहेत. निकाल जाजहीर करण्याआधी एजन्सीने जेईई मेन प्रोव्हिजनल उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली  आणि परीक्षार्थ्यांकडून प्रतिक्रिया मागविण्यात आली होती. जेईई मेनची अंतिम उत्तरपत्रिका देखील जाहीर करण्यात आली आहे.  NTA ने JEE मेन 2023 सत्र 1 परीक्षेची अंतिम उत्तर की देखील जारी केली आहे.

परीक्षार्थ्यांचा विक्रम 

यावेळी जेईई मुख्य सत्र 1 पेपर 1 मध्ये, 8.6 लाखांहून अधिक उमेदवारांनी अभियांत्रिकीच्या पेपरसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 8.22  लाख म्हणजे  95.79 टक्के परीक्षार्थी बसले होते. जेईई मेन 2023 चा निकाल यंदा अवघ्या 6 दिवसात जाहीर झाला आहे. NTAने जेईई मेन 2023 जानेवारी किंवा सत्र 1 परीक्षा 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केली होती. 6 फेब्रुवारीला रात्री उशिरा निकाल जाहीर झाला. 

JEE Mains साठी आजपासून नोंदणी सुरू 

जेईई मेन 2023 एप्रिलच्या परीक्षा सत्राचे आयोजन  6 ते 12 एप्रिल 20223 च्या दरम्यान होणार आहे. या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेचे आज पासून नोंदणी केली जाणार आहे. नोंदणी करण्याची लिंक सुरू झाल्यानंतर उमेदवार अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर जाऊन अर्ज करावा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी