H-1B Visa | लाखो भारतीयांसाठी खुशखबर! H-1B व्हिसाधारकासंदर्भात अमेरिकन सरकारचा मोठा निर्णय

H-1B Visa Holders | एच-४ व्हिसा हा अमेरिकन नागरिकत्व आणि सेवांसाठी एच-१बी व्हिसा धारकांच्या जवळच्या नातेवाईकांना (जोडीदार आणि २१ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले) यांना दिला जातो. हा व्हिसा सर्वसामान्यपणे त्या लोकांना दिला जातो ज्या लोकांनी अमेरिकेत रोजगारावर आधारित कायदेशीररित्या कायमस्वरुपी निवासी अधिकार मिळवण्याची प्रक्रिया आधीच सुरू केली आहे. तर एच-१बी व्हिसा हा अमेरिकन कंपन्यांना परदेशी कर्मचाऱ्यांना रोजगार देण्याची परवानगी देतो.

H-1B Visa
एच-१बी व्हिसा 
थोडं पण कामाचं
  • बायडन प्रशासनाने (Joe Biden administration) एच-१बी व्हिसासंदर्भात एक महत्त्त्वाचा निर्णय
  • H-1B व्हिसा धारकांच्या पत्नीला ऑटोमॅटिक वर्क ऑथरायझेशन व्हिसा मिळणार
  • एच-१बी व्हिसाधारकांमध्ये मोठी संख्या भारतीय आयटी कर्मचाऱ्यांची

H-1B Visa Holders | वॉशिंग्टन : अमेरिकेच्या बायडन प्रशासनाने (Joe Biden administration)एक महत्त्त्वाचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा फायदा अमेरिकेत काम करू इच्छिणाऱ्या भारतीयांना होणार आहे. बायडन प्रशासनाने निर्णय घेतला आहे की H-1B व्हिसा धारकांच्या पत्नीला ऑटोमॅटिक वर्क ऑथरायझेशन व्हिसा ( Automatic Work Authorization Visa) मिळेल. यामुळे लाखो भारतीय आयटी कर्मचाऱ्यांना (IT Professionals) मोठा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे हजारो भारतीय-अमेरिकन महिलांना (Indo-American Women) मोठा फायदा होणार आहे. एच-१बी व्हिसाधारकांमध्ये (H-1B Visa holders) मोठी संख्या भारतीय आयटी कर्मचाऱ्यांची आहे. (H-1B Visa : Joe Biden administration takes important decision regarding H-1B Visa holders)

एच-४ आणि एच-१बी व्हिसा

एच-४ व्हिसा हा अमेरिकन नागरिकत्व आणि सेवांसाठी एच-१बी व्हिसा धारकांच्या जवळच्या नातेवाईकांना (जोडीदार आणि २१ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले) यांना दिला जातो. हा व्हिसा सर्वसामान्यपणे त्या लोकांना दिला जातो ज्या लोकांनी अमेरिकेत रोजगारावर आधारित कायदेशीररित्या कायमस्वरुपी निवासी अधिकार मिळवण्याची प्रक्रिया आधीच सुरू केली आहे. तर एच-१बी व्हिसा हा अमेरिकन कंपन्यांना परदेशी कर्मचाऱ्यांना रोजगार देण्याची परवानगी देतो. याच्या आधारावर अनेक कंपन्या विशेषत: आयटी कंपन्या भारतीय  आणि चीनसारख्या देशांमधील हजारो कर्मचाऱ्यांना दरवर्षी नोकरी देतात. या कर्मचाऱ्यांच्या जोडीदारांच्या वतीने काही महिन्यांआधी अमेरिकन इमीग्रेशन लॉयर्स असोसिएशनने एक खटला दाखल केला होता. त्यानंतर गृहविभाग या निर्णयावर पोचला आहे.

९० हजार एच-४ व्हिसा देण्यात आले

याआधी ओबामा प्रशासनाने एच-१बी व्हिसा धारकांच्या पत्नीला वर्क ऑथरायझेशन देण्यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यांनी कॅटेगरीच्या आधारावर काम करण्याची परवानगी दिली होती. अमेरिकन प्रशासनाकडून आतापर्यत ९०,००० पेक्षा जास्त एच-४ व्हिसा देण्यात आले आहेत. यामध्ये बहुतांश लोक भारतीय अमेरिकन आहेत. बायडन प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्यानंतर एच-१बी आणि एल-२ व्हिसा धारकांच्या पत्नीला आता वर्क ऑथरायझेशनसाठी अर्ज करावा लागणार नाही. शिवाय अमेरिकत काम करण्यासाठी पुराव्याच्या रुपात काम करत असलेल्या कंपनीकडून फक्त एका कागदपत्राचीच गरज असेल. या निर्णयाअंतर्गत एच-४ व्हिसाधारकांच्या पत्नीला अमेरिकेत राहण्याचा कायदेशीर अधिकार आहे आणि त्यांना फक्त आपले रोजगाराशी संबंधित कागदपत्रे अपडेट करण्याची गरज आहे.

बायडन यांनी ट्रम्प यांचा निर्णय मागे घेतला होता

राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर एक आठवड्याच्या आत जो बायडन यांनी भारतीय महिलांना ही खुशखबर दिली होती. बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला मागे घेतले होते. ट्रम्प यांनी एच-१बी धारकांच्या पत्नीला किंवा पतीला काम करण्याची परवानगी देणाऱ्या एच-४ व्हिसावर बंदी घातली होती. यामध्ये बहुतांश अतिशय कुशल भारतीय महिला आहेत. 

असंख्य भारतीय आयटी कर्मचारी दरवर्षी नोकरीनिमित्त अमेरिकेत जात असतात. भारत आणि चीन या देशांतील आयटी कर्मचाऱ्यांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी