मेरे देशवाशियो आणि मतदारांनो ऐकलं का ! Voter ID आणि Aadhaar Card होणार लिंक; कशी कराल तुम्ही तुमची नोंदणी?

काम-धंदा
भरत जाधव
Updated Aug 02, 2022 | 12:56 IST

मतदार ओळखपत्र म्हणजेच, Voter ID Card किती महत्वाचे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. आता मतदान कार्डला 'आधार' मिळणार आहे. मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात आधार कार्ड आणि मतदान कार्ड जोडणीविषयी विधेयक मांडण्यात आले आणि मंजूर देखील झाले आहे. आता निवडणूक आयोगाने (Election Commission of India) देशभरात मतदार ओळखपत्र (Voter ID Card) आधार कार्डशी (Aadhaar Card) लिंक करण्याची मोहीम सुरू केली आहे. 

Voter ID and Aadhaar Card will be linked; How to register?
Voter ID आणि Aadhaar Card होणार लिंक; कशी कराल नोंदणी?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • डिसेंबर 2021 मध्ये हे विधेयक लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं आहे.
 • महाराष्ट्र आणि झारखंडसारख्या राज्यांमध्ये निवडणूक आयोगाची विशेष मोहीम सुरू झाली आहे.

Election Commission of India : मतदार ओळखपत्र म्हणजेच, Voter ID Card किती महत्वाचे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. आता मतदान कार्डला 'आधार' मिळणार आहे. मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात आधार कार्ड आणि मतदान कार्ड जोडणीविषयी विधेयक मांडण्यात आले आणि मंजूर देखील झाले आहे. आता निवडणूक आयोगाने (Election Commission of India) देशभरात मतदार ओळखपत्र (Voter ID Card) आधार कार्डशी (Aadhaar Card) लिंक करण्याची मोहीम सुरू केली आहे. 

महाराष्ट्र आणि झारखंडसारख्या राज्यांमध्ये निवडणूक आयोगाची विशेष मोहीम सुरू झाली आहे. निवडणूक आयोग हे काम 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान ही जोडणी प्रक्रिया पूर्णपणे ऐच्छिक आणि विनामूल्य ठेवण्यात आली आहे. कोणत्याही मतदारांना हे करण्यास भाग पाडलं जाणार नाही. 

Read Also : मृत्यूनंतर मृतदेहाला एकटं का सोडलं जात नाही?

काय आहे दुरुस्ती विधेयक? 

निवडणूक आयोगाच्या या मोहिमेत मतदारांची ओळख पटवून देण्यासाठी आणि मतदार यादीतील नोंदींचं प्रमाणीकरण या उद्देशानं मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याचं काम केलं जात आहे. दरम्यान, निवडणूक कायदा (सुधारणा) विधेयक (Election Law Amendment Bill), मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करण्यास अधिकृत करतं. डिसेंबर 2021 मध्ये हे विधेयक लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं आहे.

Read Also : 'हर घर तिरंगा' मोहिमेचे व्हिडिओ-थीम साँग होणार लाँच

मग कशी कराल तुम्ही तुमची नोंदणी

 • आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी, सर्वात आधी NVSP पोर्टल (National Voter’s Service Portal) – www.nvsp.in वर नोंदणी करावी लागेल.
 • वेबसाइटवर जा आणि New User पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर मोबाईल नंबर आणि तुमचा कॅप्चा टाका.
 • आता तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो टाका.
 • यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुमची सर्व माहिती टाका. 
 • आता Submit बटणावर क्लिक करून तुमची सर्व माहिती रजिस्टर करा. 
 • मतदार ओळखपत्राशी आधार लिंक करा 
 • NSVP पोर्टलच्या मुख्यपृष्ठावर, मतदार यादीवर (Electoral Roll) क्लिक करा. त्यानंतर तुमचा मतदार आयडी किंवा EPIC क्रमांक (EPIC NO.) आणि तुमच्या राज्याचा तपशील एंटर करा.
 • आता फीड आधार क्रमांक (Feed Aadhaar No) दिसेल. यावर क्लिक केल्यावर एक नवीन विंडो उघडेल. यामध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड तपशील आणि EPIC क्रमांक टाका.
 • यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा  E-mail ID वर OTP येईल. तुम्ही ते प्रविष्ट करताच, आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक झाल्याचं नोटीफिकेशन तुम्हाला दिसेल.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी