Income Tax refund: आपल्याला अद्याप इनकम टॅक्स रिफंड मिळालेले नाही का? ही अडचण तर नाही?

जर आपण आयकर भरला असेल आणि आपल्याला रिफंड अजून मिळालेला नसेल तर तणाव येणे साहजिक आहे. पण आपल्याला हे तपासावे लागेल की आपल्याकडून या प्रक्रियेत काही चूक झाल्यामुळे तर रीफंड अडलेला नाही ना.

IT returns
आपल्याला अद्याप इनकम टॅक्स रीफंड मिळालेले नाही का? ही अडचण तर नाही? 

थोडं पण कामाचं

  • इनकम टॅक्स रिफंड न मिळण्यामागे असू शकतात ही कारणे
  • खात्याची चुकीची माहिती किंवा चुकीचा आयएफएससी कोड भरल्याने येऊ शकते अडचण
  • जर रीफंडची रक्कम 100 रुपयांपेक्षा कमी असेल तर रक्कम खात्यात जमा होत नाही

नवी दिल्ली: आयकर रिटर्न्स (IT returns) भरल्यानंतर जर काही रिफंड (refund) असेल तर आपल्याला अशी आशा असते की तो लवकरच मिळेल. मात्र जर आपल्याला रिफंड मिळालेला नसेल तर त्यामागे अनेक कारणे (reasons) असू शकतात जी समजून घेणे गरजेचे आहे. सामान्यत: सीपीसीमध्ये (CPC) आयटीआरची प्रक्रिया (ITR process) पूर्ण झाल्यानंतर रिफंड मिळतो. मात्र जर रिफंड जमा होण्यात विलंब (delay) होत असेल तर काहीतरी कमतरता (flaws) राहून गेली असल्याची शक्यता असते. कर निर्धारण वर्ष 2020-21चा इनकम टॅक्स रिटर्न CPC 2.0द्वारे प्रोसेस केला जात आहे आणि या विलंबाचे कारण हेही असू शकते.

रिफंड मिळण्यास होत आहे विलंब?

कोव्हिड-19मुळे आयकर विभागाच्या कामकाजात अडचणी येत आहेत. आयटीआरची प्रक्रिया वेगाने चालू करण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट केले जात आहे. आणि यामुळे इनकम टॅक्स रीफंडमध्ये विलंब होत आहे.

रिफंड येण्यात यामुळेही होऊ शकतो विलंब

जर आपण आयकर रिटर्न फाईल करताना जर आपण अर्धवट माहिती दिली असेल तरीही रिफंड मिळण्यात विलंब होऊ शकतो. बँकेचा आयएफएससी कोड किंवा बँक खात्याचा क्रमांक चुकीचा भरल्यानेही ही अडचण येऊ शकते. अनेकदा आवश्यक कागदपत्रे न दिल्याने रिफंड मिळण्यात अडचणी येतात. आयटीआर भरण्याच्या शेवटच्या दिवसानंतर रिफंड मिळण्यात उशीर झाल्यास आयकर विभागाला आपल्याला 6 टक्क्याच्या दराने व्याज द्यावे लागते.

100 रुपयांपेक्षा कमी आहे रिफंड तर खात्यात रक्कम येणार नाही

इनकम टॅक्स रीफंडची रक्कम 100 रुपयांपेक्षा कमी असल्यास रिफंड बँकेच्या खात्यात क्रेडिट होणार नाही. ही रक्कम भविष्यात इनकम टॅक्स रिटर्नच्या रकमेत समाविष्ट केली जाते. आयटीआर फाईल करण्याच्या आधी देय कराची रक्कम 100 रुपयांपेक्षा कमी असेल तर ही द्यावी लागलेत. जर आपण असे केले नसेल तर आयटीआर फाईल करता येत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी