स्वप्नाचं घर होणं जरा अवघडचं; नऊ शहरांत किमती वाढल्या किमती, या शहरात म्हणावं लागेल कोणी घर देत का घर

काम-धंदा
भरत जाधव
Updated Jul 28, 2022 | 12:03 IST

सामान्य व्यक्ती आपल्या जीवनात दोन महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण करण्याचं स्वप्न (dream) आपल्या मनी बाळगत असतो. त्यातील एक स्वप्न म्हणजे घर (house) तयार करणं. परंतु वाढत्या महागाईमुळे (inflation) सामान्य नागरिकाचं हे स्वप्न जरा दुरापास्त होताना दिसत आहे. देशातील (country) नऊ शहरांमध्ये घरांच्या सरासरी किमतींमध्ये एप्रिल ते जून या काळात सरासरी पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे.

The dream of a house will remain unfulfilled in these three cities of the state
राज्यातील या तीन शहरात घराचं स्वप्न राहील अपूर्ण   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • चेन्नईमध्ये घराच्या किमतींमध्ये सर्वाधिक पंधरा टक्क्यांनी वाढल्या आहेत.
  • देशातील नऊ शहरांमध्ये घरांच्या सरासरी किमतींमध्ये वाढ
  • मुंबई, ठाणे, पुण्यातील घरांच्या किमतींमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नवी दिल्लीः सामान्य व्यक्ती आपल्या जीवनात दोन महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण करण्याचं स्वप्न (dream) आपल्या मनी बाळगत असतो. त्यातील एक स्वप्न म्हणजे घर (house) तयार करणं. परंतु वाढत्या महागाईमुळे (inflation) सामान्य नागरिकाचं हे स्वप्न जरा दुरापास्त होताना दिसत आहे. देशातील (country) नऊ शहरांमध्ये घरांच्या सरासरी किमतींमध्ये एप्रिल ते जून या काळात सरासरी पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये (Chennai) ही वाढ सर्वाधिक पंधरा टक्के आहे. तर कोलकाता येथे घरांच्या किमतींमध्ये सर्वांत कमी म्हणजे एक टक्का वाढ झाली आहे, अशी माहिती 'प्रॉपइक्विटी' या माहिती विश्लेषण संस्थेने दिली आहे.

महाराष्ट्रातील तीन शहरातील घरांच्या किमतीही वाढल्या असून या ठिकाणी स्वप्न घर होणं अवघड झाले आहे. मुंबई ठाणे, आणि पुणे या शहरात आपलं घर असावं असं बहुतेकांचं स्वप्न असतं. परंतु आता किमती वाढल्यामुळे आता घर घेण्याचा विचार करत असाल तर काही काळ हा निर्णय न घेतलेला बरा. एका बाजुला महागाई वाढत आहे, जगणं कठिण होत आहे तर दुसऱ्या बाजुला मंदीची चाहूल लागली आहे. अशात घराच स्वप्न म्हणजे डोंगर खोदण्यासारखे आहे. 

Read Also : OMG: या ठिकाणी सापडला दुर्मिळ गुलाबी हिरा

दरम्यान, प्रॉपइक्विटी या विश्लेषण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये घरांच्या किमती प्रतिचौरसफूट ६,७४४ रुपयांवर पोहोचल्या आहेत. वर्षभरापूर्वी या काळात घरांच्या किमती ५,८५५ रुपये प्रतिचौरसफूट इतक्या होत्या. गुरुग्राममध्ये घरांच्या किमतींमध्ये १२ टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि १०,३१५ रुपये प्रतिचौरसफूट दरांवरून प्रतिचौरसफूट ११,५१७ रुपयांवर या किमती गेल्या. हैदराबादमध्येही १२ टक्क्यांनी घरांच्या किमती वाढल्या असून, त्या प्रतिचौरसफूट ६,४७२ रुपयांवर पोहोचल्या आहेत. नोएडामध्ये नऊ टक्के (७,४११ प्रतिचौरसफूट), बेंगळुरूमध्ये ८ टक्क्यांनी (६,१९६ रुपये प्रतिचौरसफूट) किमती वाढल्या आहेत. मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये घरांच्या किमतींमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

Read Also: स्मिता ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीने अनेकांना धक्का

मुंबईमध्ये घरांच्या किमती प्रतिचौरसफूट १८,२५९ रुपयांवर पोहोचल्या आहेत. ठाणे येथे प्रतिचौरसफूट ६,३२५ रुपये, तर पुण्यामध्ये प्रतिचौरसफूट ५,३४८ रुपये घरांच्या किमती गेल्या आहेत. घरांच्या किमतींमध्ये गेल्या वर्षभरात अपेक्षित वाढ होत असल्याचे 'प्रॉपइक्विटी'चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक समीर जासुजा यांनी सांगितले. बांधकाम क्षेत्रात नऊ शहरांमध्ये प्रकल्पनोंदणी वर्षभरात एकूण ५१ टक्क्यांनी वाढ झाली; पण आधीच्या तिमाहीच्या तुलनेत त्यात २४ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले. 

https://youtu.be/orWolZgbxK0

Read Also : 3-0 ने मालिका जिंकत भारताचा वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश

ठाणे शहरांत घरांच्या विक्रीमध्ये वाढ होत असल्याचे निरीक्षण 'कल्पतरू लिमिटेड' संस्थेचे संचालक मुकेशसिंह यांनी सांगितले. पुणे शहरात घरांच्या विक्रीमध्ये दुपटीने वाढ झाली असून, २१,९२७ घरांची (युनिट्स) विक्री झाली आहे. मुंबईमध्ये ९८ टक्क्यांनी विक्रीत वाढ झाली असून, ११,७३३ घरांची (युनिट्स) विक्री झाली आहे. इतर शहरांतही घरांच्या विक्रीमध्ये वाढ नोंदवली गेली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी