HDFC Bank hikes FD interest rates : नवी दिल्ली : भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) ग्राहकांसाठी खूशखबर आहे. कारण बँकेने निवडक मुदतठेवींसाठी (Fixed Deposit) म्हणजे 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन व्याजदर 6 एप्रिल 2022 पासून लागू झाले आहेत. एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बॅंकेचे विलीनीकरण (HDFC twins merger) झाल्याच्या बातमीनंतर फक्त 2 दिवसांनी व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. (HDFC Bank increases the interest rates on fixed deposit, check the latest rates)
एचडीएफसी बँकेने त्यांच्या 1 वर्षाच्या मुदतठेवीवरील व्याज दर 5 टक्क्यांवरून 10 बेसिस पॉइंटने वाढवत 5.10 टक्क्यांनी वाढवला आहे. तर 1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षे एफडीवर व्याजदर 5 टक्क्यांवरून 5.10 टक्के केला आहे. याआधी फेब्रुवारीमध्येही बँकेने 1 वर्षाचा एफडी व्याजदर 10 बेस पॉईंटने 4.9 टक्क्यांवरून 5 टक्के केला होता. तर 3 वर्ष ते 5 वर्षांचा एफडी व्याज दर 5.40 टक्क्यांवरून 5.45 टक्के केला होता.
एचडीएफसी बँक ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर 0.50 टक्के अतिरिक्त दर देते. शिवाय ज्येष्ठ नागरिक 5 वर्ष एक दिवस ते 10 वर्षे मुदतीच्या ठेवींवर 0.50 टक्क्यांच्या विद्यमान प्रीमियमच्या 0.25 टक्के आणि त्याहून अधिक प्रिमियमसाठी देखील पात्र आहेत.