HDFC Bank : एचडीएफसी बॅंकेने व्याजदरात केली वाढ, कर्ज झाले महाग, पाहा तपशील

Interest rate hike : देशातील सर्वात मोठी खासगी बॅंक असलेल्या एचडीएफसी बॅंकेने (HDFC Bank) मंगळवारी किरकोळ किंमतीच्या कर्ज दरात (MCLR) 35 बेसिस पॉइंट्स (bps) ने वाढ केली आहे. ओव्हरनाईट कर्जासाठी एमसीएलआर 7.15 टक्क्यांवरून 7.50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर एका महिन्याच्या कर्जासाठी, कर्जाचा दर 7.20 टक्क्यांवरून 7.55 टक्क्यांवर गेला आहे.

HDFC Bank rises MCLR rates
एचडीएफसी बॅंकेने व्याजदरात केली वाढ 
थोडं पण कामाचं
  • एचडीएफसी बॅंकेच्या व्याजदरात वाढ, इतरही बॅंकांकडून व्याजदरात वाढ
  • एचडीएफसी बॅंकेने एमसीएलआर दर 35 बेसिस पॉइंट्सने वाढवले
  • एमसीएलआर दरातील वाढ 7 जूनपासून लागू होणार

HDFC Bank Interest Rate : नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी खासगी बॅंक असलेल्या एचडीएफसी बॅंकेने (HDFC Bank) मंगळवारी किरकोळ किंमतीच्या कर्ज दरात (MCLR) 35 बेसिस पॉइंट्स (bps) ने वाढ केली आहे. ओव्हरनाईट कर्जासाठी एमसीएलआर 7.15 टक्क्यांवरून 7.50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर एका महिन्याच्या कर्जासाठी, कर्जाचा दर 7.20 टक्क्यांवरून 7.55 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता अधिक व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे. (HDFC Bank rises interest rates by 35 bps, check details)

अधिक वाचा : वाढू शकतो तुमच्या कर्जाचा हप्ता; महागाई कमी करण्यासाठी आरबीआय करू शकते मोठी घोषणा

कोणत्या कर्जासाठी किती वाढ

एचडीएफसी बॅंकेने व्याजदरात वाढ केल्यानंतर सर्वच प्रकारच्या आणि सर्वच कालावधीसाठीच्या कर्जाच्या व्याजदरात आता वाढ झाली आहे. एचडीएफसी बॅंकेच्या तीन महिन्यांच्या कर्जासाठी, सहा महिन्यांच्या कर्जासाठी आणि एक वर्षाच्या कर्जासाठी एमसीएलआर दर (MCLR) आता अनुक्रमे 7.60 टक्के, 7.70 टक्के आणि 7.85 टक्क्यांवर गेला आहे. दोन वर्षांच्या कर्जासाठी आणि तीन वर्षांच्या कर्जासाठी कर्जाचा दर अनुक्रमे 7.95 टक्के आणि 8.05 टक्क्यांवर पोचला आहे.

बँक एमसीएलआरची (MCLR) व्याख्या "विशिष्ट कर्जासाठी वित्तीय संस्थेने आकारणे आवश्यक असलेले किमान व्याज दर" अशी करते. MCLR दर कर्जासाठी व्याजदराची खालची मर्यादा म्हणजे किमान मर्यादा किती असेल हे देखील ठरवते. अन्यथा रिझव्‍‌र्ह बँकेने नमूद केल्याशिवाय एमसीएलआरद्वारे कर्जदारांसाठी व्याजदर निश्चित केले जाते. अर्थात आजपासून MCLR दर वाढवणारी एचडीएफसी बँक ही काही एकमेव बँक नाही.

अधिक वाचा : RBI On Currency Notes: नोटांवर राहणार महात्मा गांधींचा फोटो, फोटो बदलणार नसल्याचे आरबीआयने दिले स्पष्टीकरण

कॅनरा बॅंकेनेदेखील वाढवले व्याजदर

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या कॅनरा बँकेने देखील त्यांच्या एमसीएलआर दरांमध्ये वाढ जाहीर केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या कॅनरा बँकेने सहा महिन्यांच्या आणि एक वर्षाच्या कर्जासाठी एमसीएलआर अनुक्रमे 7.35 टक्के आणि 7.40 टक्क्यांपर्यत वाढवले आहेत. कॅनरा बॅंकेने ओव्हरनाईट कर्जासाठी,  एक-महिना आणि तीन महिन्यांच्या कर्जासाठी MCLR दर अनुक्रमे बदल न करता 6.65 टक्के आणि 6.95 टक्के ठेवले आहेत. एमसीएलआर दरातील वाढ 7 जूनपासून लागू होणार आहे.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 07 June 2022: सोन्यातील तेजी कायम, चांदीचा भावदेखील वधारला, पाहा ताजा भाव

आरबीआयकडून रेपो रेट वाढीची शक्यता

रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी आरबीआयच्या पतधोरण समितीच्या घोषणा जाहीर करण्याच्या एक दिवस आधी MCLR दरांमध्ये वाढ केली आहे. शक्तिकांता दास यांनी आधीच सूचित केले आहे की रेपो दरात आणखी एक वाढ होऊ शकते परंतु त्यांनी दरवाढीच्या प्रमाणात भाष्य केले नाही. अशी माहिती समोर आली आहे की आरबीआय व्याजदरात कमीत कमी 35 बेसिस पॉईंट्स (bps) वाढ करू शकते आणि 40 bps पेक्षा जास्त वाढ करू शकते जी गेल्या महिन्यात ऑफ-सायकल MPC बैठकीनंतर लागू झाली.

 रिझर्व्ह बँक  8 जून 2022 रोजी होणाऱ्या आगामी पतधोरण समितीच्या बैठकीत (MPC) व्याजदरांमध्ये आणखी एक वाढ जाहीर करू शकते. या महिन्यात रेपो दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी