HDFC बँकेत तुमचे खाते आहे? मग असे ओळखा तुम्हाला येणारे SMS खरे की खोटे

HDFC Bank: एचडीएफसी बँकेत तुमचे अकाऊंट आहे का? जर असेल आणि तुम्हाला बँकेच्या नावाने एसएमएस येत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

hdfc bank sms how to find out real or fake read simple tips in marathi
HDFC बँकेत तुमचे खाते आहे? मग असे ओळखा तुम्हाला येणारे SMS खरे की खोटे (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL

HDFC Bank SMS service: सध्याच्या काळात टेक्नोलॉजीचा वापर मोठ्या वेगाने होताना दिसत आहे. मात्र, याच टेक्नोलॉजीच्या जगात सायबर क्राईम, फसवणुकीचे प्रमाणही वेगाने वाढताना दिसत आहे. एसएमएसच्या माध्यमातून फेक लिंक शेअर करुन नागरिकांची फसवणूक केली जात असल्याच्याही घटना समोर येत आहे. बँकेच्या नावाने येणारे हे एसएमएस खरे आहेत की खोटे हे ओळखणे सुद्धा अनेकांना कठीण जाते. यामुळेच अनेकजण या गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात आणि त्यांना पैशांचा गंडा घातला जातो.

ग्राहकांची ही समस्या लक्षात घेता एचडीएफसी बँकेने एसएमएसच्या संबंधित काही माहिती शेअर केली आहे. ही माहिती तुम्हाला फसवणूक होण्यापासून वाचवण्यासाठी फायदेशीर ठरेल. बँकेद्वारे पाठवण्यात येणाऱ्या SMS च्या साठी काही स्टँडर्ड म्हणजेच मानक निश्चित केली आहेत.

हे पण वाचा : दगाबाज रे.... या कारणांमुळे पार्टनरला फसवतात मुलं-मुली

How to identify Fake SMS

 1. HDFC Bank ने SMS पाठवण्याच्या संदर्भात काही मानके निश्चित केली आहेत.
 2. यामध्ये बँक म्हणते की, त्यांच्याकडून कधीही 10 अंकी मोबाइल क्रमांकावरुन SMS पाठवले जात नाहीत.
 3. बँकेचे अधिकृत SMS हे नेहमी HDFCBK किंवा HDFCBN आयडीवरुन पाठवण्यात येतात. 
 4. बँकेकडून कोणत्याही अधिकृत एसएमएसमध्ये पाठवण्यात आलेल्या लिंकची सुरुवात ही नेहमी hdfcbk.io ने सुरू होते.
 5. यासोबतच बँकेने माहिती शेअर केली आहे की, ग्राहक त्यांच्या बनावट एसएमएस आणि इतर पद्धतीने होणाऱ्या फसवणुकीपासून कसे बचाव करु शकतात.

हे पण वाचा : या पत्त्यावर तिसरा 8 अंक तुम्हाला दिसला का? शोधा बरं

गुन्हेगार अशी करतात फसवणूक

फसवणूक करण्यासाठी गुन्हेगार SMS मध्ये जी लिंक पाठवतात त्याद्वारे तुमचा मोबाइल फोन हॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. यासोबतच कधी-कधी एसएमएसच्या माध्यमातून गुन्हेगार तुमच्या बँक अकाऊंटच्या संदर्भातील माहिती (OTP, CVV, PIN, Password) गुप्तपणे घेऊ इच्छितात. याच्या सहाय्याने गुन्हेगार तुमच्या खात्यातील रक्कम गायब करतात.

हे पण वाचा : गरोदर असताना उपवास करावा की नाही?

असा करा तुमचा बचाव

 1. अशा प्रकारे येणाऱ्या फेक एसएमएसला तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ओळखून आपला बचाव करु शकता.
 2. कधीही 10 अंकी मोबाइल नंबरवरुन आलेल्या एसएमएसला उत्तर देऊ नका.
 3. तुमच्या बँक अकाऊंटच्या संदर्भात माहिती मागत असलेल्या सर्वच एसएमएसला रिप्लाय देऊ नका. 
 4. कोणत्याही कॉल, एसएमएसच्या माध्यमातून OTP, CVV, PIN, Password, Aadhar or PAN संदर्भातील माहिती शेअर करू नका.
 5. कोणत्याही प्रकारचा बनावट, फेक एसएमएस आल्यास बँकेच्या फिशिंग रिस्पॉन्स सिस्टमवर तक्रार दाखल करा. याच्या संदर्भातील माहिती तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल.
 6. अशा प्रकारची तक्रार तुम्ही बँकेच्या टोल-फ्री नंबरवर सुद्धा करु शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी