HDFC Twins Merger | मोठी बातमी! एचडीएफसी आणि एचडीएफसी बॅंकेचे विलीनीकरण...टीसीएसला मागे टाकत बनणार देशातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी

HDFC & HDFC Bank Share : एचडीएफसी लि. (HDFC)आणि एचडीएफसी बॅंक (HDFC Bank) या देशातील वित्तीय क्षेत्रातील दोन सर्वात बड्या कंपन्यांचे म्हणजे एचडीएफसी ट्विन्सचे विलीनीकरण (Merger of HDFC Twins) झाले आहे. एचडीएफसी ट्विन्सच्या विलीनीकरणाच्या बातमीने शेअर बाजारात जोरदार तेजी आली आहे. यानंतर एचडीएफसीच्या शेअरच्या किंमतीत 14 टक्के आणि एचडीएफसी बॅंकेच्या शेअरच्या किंमतीत 10 टक्क्यांची तुफान तेजी आली आहे.

HDFC Twins Merger
एचडीएफसी आणि एचडीएफसी बॅंकेचे होणार विलीनीकरण 
थोडं पण कामाचं
  • देशाच्या वित्तीय क्षेत्रातील मोठी आणि महत्त्वाची घडामोड, एचडीएफसी आणि एचडीएफसी बॅंकेचे होणार विलीनीकरण
  • विलीनीकरणाच्या बातमीनंतर शेअर बाजारात जोरदार तेजी, एचडीएफसी ट्विन्सच्या शेअर्समध्ये आली तुफान तेजी
  • विलीनीकरणानंतर एचडीएफसी बाजारमूल्यात टीसीएसला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनणार

Share Price sky rocketted after meger of HDFC Twins : नवी दिल्ली :  एचडीएफसी लि. (HDFC)आणि एचडीएफसी बॅंक (HDFC Bank) या देशातील वित्तीय क्षेत्रातील दोन सर्वात बड्या कंपन्यांचे म्हणजे एचडीएफसी ट्विन्सचे विलीनीकरण (Merger of HDFC Twins) होण्याची घोषणा झाली आहे. एचडीएफसी ट्विन्सच्या विलीनीकरणाच्या बातमीने शेअर बाजारात (Share Market) जोरदार तेजी आली आहे. या जबरदस्त बातमीनंतर सेन्सेक्सनमध्ये 1500 अंशांची जोरदार उसळी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आली आहे. यानंतर एचडीएफसीच्या शेअरच्या किंमतीत 14 टक्के आणि एचडीएफसी बॅंकेच्या शेअरच्या किंमतीत 10 टक्क्यांची तुफान तेजी आली आहे. एचडीएफसी ट्विन्सने सोमवारी त्यांच्या एकत्रित बाजार मूल्यानीशीबाजारमूल्यानुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीला म्हणजे  टाटा समूहाच्या टीसीएस (TCS)ला मागे टाकले आहे. (HDFC & HDFC Bank to get merge, can be India's second largest company)

अधिक वाचा : Gold Price Today | सोने-चांदी झाले स्वस्त...ग्राहकांमध्ये खरेदीचा जोरदार उत्साह, पाहा आजचा सोन्याचा भाव, करा संधीचे सोने!

एचडीएफसी ट्विन्सच्या शेअर्समध्ये आली तुफान तेजी

देशातील वित्तीय क्षेत्रातील या दोन बलाढ्य कंपन्यांच्या विलीनीकरणाच्या घोषणेनंतर, एचडीएफसीचे बाजार भांडवल 5 लाख कोटी रुपयांवर (5,05,725.10 कोटी रुपये) पोचले. कंपनीचा शेअर 13.54 टक्क्यांची जबरदस्त तेजी दाखवून 2,782.70 रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करत होता. तर दुसरीकडे एचडीएफसी बँकेचा शेअर 9.82 टक्क्यांनी वाढून 1,654.25 रुपयांवर व्यवहार करतो आहे. या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बॅंकेने बाजारमूल्याचा 9 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. एचडीएफसी बॅंकेचे बाजारमूल्य आज 9,16,927.47 कोटी रुपयांवर पोचले आहे.

अधिक वाचा : Elon Musk Update | इलॉन मस्कच्या टेस्लाची कमाल...एका दिवसात टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीत आख्ख्या फोर्ड मोटरपेक्षा जास्त वाढ

एचडीएफसी ट्विसन्सचे बाजारमूल्य

एचडीएफसी ट्विन्सचे (HDFC twins)एकत्रित बाजार मूल्य 14,22,652.57 कोटी रुपये झाले आहे तर टीसीएसच्या 13,73,882.31 कोटीच्या पुढे आहे. म्हणजेच विलीनीकरणानंतर एचडीएफसी ट्विन्सने टाटा समूहाच्या टीसीएसला बाजारमूल्यात मागे टाकले आहे. टीसीएसचा शेअर आज 3754.75 रुपयांवर व्यवहार करतो आहे. बाजारमूल्यानुसार देशातील सर्वात मोठी कंपनी मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य सध्या 17,95,506.15 कोटी रुपये इतके आहे.

अधिक वाचा : Investment Tips | तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करूनदेखील जास्त परतावा देखील मिळवू शकता! जाणून घ्या या खास टिप्स

कोणाला किती शेअर मिळणार

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांच्या विलीनीकरणाचा एक भाग म्हणून, एचडीएफसीच्या प्रत्येक 25 शेअरमागे एचडीएफसी बँकेचे 42 शेअर्स गुंतवणुकदारांना दिले जातील. यानंतर एचडीएफसी बँक 100 टक्के सार्वजनिक भागधारकांच्या मालकीची असेल आणि एचडीएफसीचे विद्यमान भागधारक एचडीएफसी बँकेच्या 41 टक्के मालकीचे असतील. 31 डिसेंबर 2021 पर्यंत एचडीएफसीची एकूण मालमत्ता 6,23,420.03 कोटी रुपये होती तर उलाढाल 35,681.74 रुपये होती. त्याचबरोबर एचडीएफसीची निव्वळ संपत्ती 1,15,400.48 कोटी रुपये आहे. दुसरीकडे एचडीएफसी बँकेची एकूण मालमत्ता 19,38,285.95 कोटी रुपये होती. 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी एचडीएफसी बॅंकेची उलाढाल 1,16,177.23 कोटी रुपयांची होती (इतर उत्पन्नासह). 31 डिसेंबर 2021 ला एचडीएफसी बॅंकेची 2,23,394.00 कोटी रुपयांची निव्वळ संपत्ती होती.

विलीनीकरणाने सर्वांचाच फायदा

एचडीएफसी बँकेने सांगितले की, प्रस्तावित व्यवहारामुळे एचडीएफसी बँकेला त्याचा गृह कर्ज पोर्टफोलिओ तयार करता येईल आणि सध्याची ग्राहकांची संख्या वाढेल. खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या  बॅंकेने सांगितले की प्रस्तावित व्यवहार हा दोनी कंपन्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या महत्त्वपूर्ण पूरक गोष्टींचा लाभ घेण्यावर आधारित आहे. "प्रस्तावित व्यवहारामुळे संबंधित भागधारक, ग्राहक, कर्मचार्‍यांसह विविध भागधारकांसाठी अर्थपूर्ण मूल्य निर्माण होईल. कारण एकत्रित व्यवसायाला वाढीव प्रमाण, सर्वसमावेशक उत्पादन ऑफर, ताळेबंदाची लवचिकता आणि महसुलाच्या संधी, ऑपरेटिंग कार्यक्षमता आणि अंडररायटिंगमध्ये समन्वय साधण्याची क्षमता, इतर कार्यक्षमता यांचा फायदा होईल." असे एचडीएफसी बॅंकेने म्हटले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी