मुंबई : देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. कर्जाच्या व्याजदरात 85 बेस पॉईंट्सची कपात म्हणजे मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) बँकेने जाहीर केली आहे. वेगवेगळ्या मुदतीच्या कर्जासाठी ही कपात करण्यात आली असून नवीन दर 10 एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत. बँकेच्या या निर्णयामुळे कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. (HDFC reduced the loan interest rate by 85 basis points)
अधिक वाचा : सोन्याचे दागिने दिसू लागलेत काळे? मग किचनमधील 'या' 3 वस्तू वापरा अन् मिनिटांत दागिन्यांची चमक वाढवा
भारतीय रिझर्व्ह बँकेने पॉलिसी रेट (रेपो रेट) सलग सहा वेळा वाढवल्यानंतर, यावेळी नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या एमपीसी बैठकीत, त्याच्या गतीला ब्रेक लागला. यानंतर HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे. याचा फायदा बँकेच्या त्या ग्राहकांना होईल ज्यांची कर्जे MCLR शी जोडलेली आहेत. यामध्ये पर्सनल आणि वाहन कर्जाचा समावेश आहे. पण गृहकर्ज घेणाऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा कमी आहे, कारण बहुतांश गृहकर्ज एचडीएफसी लिमिटेडकडून घेण्यात आले आहेत.
अधिक वाचा : प्रेग्नेन्ट श्लोका मेहताने 'NMACC' मध्ये नेसली होती 100 वर्षापूर्वीची सोनेरी साडी, बहीण दीयाने केला खुलासा
एचडीएफसी बँकेने एमसीएलआरमध्ये कपात केल्यानंतर नवीन दर पाहिल्यास, एका रात्रीच्या कर्जासाठी एमसीएलआर 8.65 टक्क्यांवरून 7.80 टक्क्यांवर आला आहे. याशिवाय, एक महिन्याचा MCLR आता 8.65 टक्क्यांऐवजी 70 बेसिस पॉइंट्सने कमी होऊन 7.95 टक्क्यांवर आला आहे. बँकेने तीन महिन्यांच्या कर्जावरील एमसीएलआरमध्ये 40 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे आणि ती 8.7 टक्क्यांऐवजी 8.3 टक्के केली आहे. याशिवाय सहा महिन्यांचा MCLR ८.८ टक्क्यांवरून ८.७ टक्के करण्यात आला आहे.
अधिक वाचा : WhatsApp वर एका क्लिकमध्ये बुकिंग करा LPG गॅस सिलेंडर, वाचा काय आहे प्रोसेस
रेपो रेट कमी झाल्यामुळे बँकांना कर्ज स्वस्त मिळते आणि ते MCLR मध्ये कपात करून कर्जाचा EMI कमी करतात. दुसरीकडे, जेव्हा रेपो दरात वाढ होते, तेव्हा बँकांना आरबीआयकडून महाग कर्ज मिळते, ज्यामुळे त्यांना एमसीएलआर वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागतो आणि ग्राहकांचा बोजा वाढतो.