Health Insurance | आरोग्यविमा घेताना लक्षात घ्यायची महत्त्वाची ५ सूत्रे

Health Insurance | मोठ्या आजारपणाच्या इलाजाखातर तुमची अनेक वर्षांची बचत कामी येऊ शकते. या अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय खर्चामुळे तुमचे आर्थिक गणित कोलमडून पडेल आणि तुम्ही आर्थिक अस्थैर्याला सामोरे जाल. अशा परिस्थितीच्या विळख्यात अडकायचे नसेल तर लवकरात लवकर हेल्थ इन्श्युरन्स म्हणजेच आरोग्यविमा पॉलिसी घ्या.

Health Insurance Tips
हेल्थ इन्श्युरन्स टिप्स 
थोडं पण कामाचं
  • आर्थिक नियोजनात आरोग्यविमा अत्यंत महत्त्वाचा
  • वैद्यकीय खर्चासाठी आरोग्यविमा आवश्यक
  • आरोग्यविमा घेताना लक्षात घ्यायच्या बाबी

Health Insurance |  मुंबई : आरोग्यविमा (Health Insurance)हा आर्थिक नियोजनातील (Financial Planning)महत्त्वाचा भाग झाला आहे. दिवसेंदिवस वैद्यकीय खर्च महाग होत चालला आहे. कोरोना महामारीच्या संकटाने आरोग्यविम्याचे महत्त्व (Importance of Health Insurance) सगळ्यांच्याच लक्षात आणून दिले. मोठ्या आजारपणाच्या इलाजाखातर तुमची अनेक वर्षांची बचत कामी येऊ शकते. या अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय खर्चामुळे तुमचे आर्थिक गणित कोलमडून पडेल आणि तुम्ही आर्थिक अस्थैर्याला सामोरे जाल. अशा परिस्थितीच्या विळख्यात अडकायचे नसेल तर लवकरात लवकर हेल्थ इन्श्युरन्स म्हणजेच आरोग्यविमा पॉलिसी घ्या. आरोग्य विम्यामुळे फक्त तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या उपचारांसाठी योग्य वेळी पैसाच उपलब्ध होणार नाही तर तुमची बचतदेखील सुरक्षित राहील. मात्र आरोग्य विमा घेताना काही मुद्द्यांचे भान राखणे आवश्यक असते. अशाच ५ महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल जाणून घेऊया. (Top 5 points to be considered while buying the Health Insurance)


१. वेटिंग पिरियड

आरोग्य विमा घेताना वेटिंग पिरियड लक्षात घ्या. तुमच्या वैद्यकीय खर्च किंवा आजारांवरील खर्च कंपनी लगेच देत नाही. त्यासाठी तुम्हाला काही कालावधीनंतर तुमचा खर्च मंजूर केला जातो. यालाच वेटिंग पिरियड म्हणतात. पॉलिसी घेतल्यापासून या कालावधीपर्यत कंपनी तुमच्या वैद्यकीय खर्चाचा क्लेम मंजूर करत नाही. या कालावधी १५ दिवसांपासून ९० दिवसांपर्यतचा असतो. 
ज्या कंपनीचा वेटिंग पिरियड कमी असेल तिला प्राधान्य द्या.

२. क्लेम सेटलमेंट रेशो

जेव्हा तुम्ही आरोग्य विमा पॉलिसी घेता तेव्हा ज्या कंपनीची ती पॉलिसी आहे त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो किती आहे हे नक्की पाहा. सेटलमेंट रेशो जास्त असणे फार महत्त्वाचे असते. जास्त क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे विमा कंपनीने जास्त क्लेमचे पैसे ग्राहकांना दिले आहेत किंवा जास्त क्लेम मंजूर केले आहेत. यामुळे हे कळते की कंपनीचे अंडर रायटिंग नियम जास्त कडक नाहीत. आयुर्विमा कंपन्या आपल्या वार्षिक अहवालात क्लेम सेटलमेंट रेशोचे आकडे देतात. कंपनीचा मागील तीन ते ५ वर्षांचा क्लेम सेटलमेंट रेशो तपासला पाहिजे.

३. पॉलिसीमधील समाविष्ट खर्च

विमा कंपन्या अनेक प्रकारच्या पॉलिसी बाजारात विकत आहेत. प्रत्येक विमा कंपनीचे काही नियम असतात. अर्थात सर्व विमा कंपन्या या आयआरडीएआयच्या मार्गदर्शक तत्त्वांखाली आणि नियमांखालीच काम करत असतात. आरोग्य विमा पॉलिसी घेताना सर्वात आधी लक्षात घ्या की त्यात कोणकोणत्या बाबी कव्हर होणार आहेत. ज्या पॉलिसीमध्ये चाचण्यांचा खर्च आणि अॅम्ब्युलन्सचा खर्च अशा जास्त बाबी कव्हर केल्या जात असतील अशी पॉलिसी घ्यावी. म्हणजे वैद्यकीय खर्चासाठी तुमच्या खिशातून पैसे खर्च करण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही.

४. को-पे निवडणे महाग ठरेल

थोडेसे पैसे वाचवण्यासाठी आणि प्रिमियम कमी करण्यासाठी बऱ्याच वेळा लोक को-पे ची सुविधा घेतात. को-पे म्हणजे क्लेम करताना पॉलिसीधारकाला त्याच्या खर्चातील (जवळपास १० टक्के) काही हिश्याचे भुगताना स्वत:च करावे लागते. या पर्यायामुळे तुमच्या खिशावर भार पडू शकतो.

५. हॉस्पिटलचे नेटवर्क

आरोग्य विमा घेण्यापूर्वी त्या पॉलिसीअंतर्गत येणाऱ्या हॉस्पिटल नेटवर्क कसे आहे. ज्या पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त हॉस्पिटलच्या नेटवर्कची सुविधा दिली जात असेल अशीच पॉलिसी घ्यावी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी