Meta lay Offs : भारतातून कॅनडात गेलेल्या कर्मचाऱ्याची रुजू झाल्यावर दोनच दिवसात 'META'मधून हकालपट्टी, लिहिली भावूक पोस्ट

LinkedIn post : मार्क झुकरबर्गच्या मेटाने एका झटक्यात 11,000 हून अधिक कर्मचार्‍यांना (Lay offs in Meta) कामावरून काढून टाकण्याचा हुकूम जारी केला आहे. META मध्ये कामावरून काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये हिमांशू व्ही नावाचा एक भारतीय तरुण आहे. या निर्णयानंतर हिमांशूवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या भारतीय कर्मचाऱ्याने लिंक्डइनवर पोस्ट लिहून आपले दु:ख शेअर केले आहे.

Meta Lay Off
मेटामधून कर्मचाऱ्याची हकालपट्टी झाल्यावर भावनिक पोस्ट 
थोडं पण कामाचं
  • ट्विटरनंतर फेसबुकमधून हजारो कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
  • भारतातून कॅनडात मेटामध्ये नोकरी करण्यासाठी गेलेल्या तरुणाची पोस्ट व्हायरल
  • रुजू झाल्यावर दोनच दिवसात गेली नोकरी

Emotional Post Former Meta employee :नवी दिल्ली : कोणाच्या वाट्याला जगात कधी आणि कशी परिस्थिती येईल हे सांगता येत नाही. नुकत्याच ट्विटर आणि मेटासारख्या जगातील दोन आघाडीच्या कंपन्यांनी ज्या पद्धतीने हजारो कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली त्यावरून तर हे आणखी अधोरेखित झाले आहे. काही दिवसांपूर्वीपर्यत या कर्मचाऱ्यांचे आयुष्य हे करियरच्या एक्सप्रेस वेवरून जोरात प्रवास करत होतं. मात्र अवघ्या काही दिवसांत त्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या मेटा (Meta) आणि ट्विटरने (Twitter) मोठ्या प्रमाणावर कामावरून काढून टाकण्यात आली आहे. जगातील या दोन मातब्बर तंत्रज्ञान कंपन्यांमधील कर्मचारी कपातीमुळे असंख्य भारतीयांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. मार्क झुकरबर्गच्या मेटाने एका झटक्यात 11,000 हून अधिक कर्मचार्‍यांना (Lay offs in Meta) कामावरून काढून टाकण्याचा हुकूम जारी केला आहे. META मध्ये कामावरून काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये हिमांशू व्ही नावाचा एक भारतीय तरुण आहे. या निर्णयानंतर हिमांशूवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. त्याचे कारणही असेच आहे. हिमांशू (Himanshu V) मेटा मध्ये रुजू झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर त्याने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. (Himanshu V got fired 2 days after joining in Meta)

अधिक वाचा  : तुरुंगात बाहेर येताच संजय राऊतांना कोणाचा फोन?

दोनच दिवसापूर्वी झाला होता रुजू

मेटा मधून कामावरून काढून टाकल्यानंतर हिमांशू या भारतीय कर्मचाऱ्याने लिंक्डइनवर पोस्ट लिहून आपले दु:ख शेअर केले आहे. त्याच्यासोबत घडलेल्या प्रकारामुळे तो दु:खी आणि अस्वस्थ का आहे हे त्याने आपल्या पोस्टमध्ये  आहे. हिमांशूने म्हटले आहे की तो META मध्ये रुजू होण्यासाठी भारतातून कॅनडात गेला होता. तिथे गेल्यावर तो मेटाच्या ऑफिसमध्ये रुजू झाला होता. मात्र त्याच्या दुर्दैवाने दोनच दिवसांनंतर त्याची META मधील नोकरी संपुष्टात आली आहे. कारण मेटाने आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

आपल्या पोस्टमध्ये हिमांशूने पुढे लिहिले की, 'मी त्या सर्वांचे दु:ख समजू शकतो जे सध्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. आता माझे काय? खरे सांगायचे तर, मला याची कोणतीही कल्पना नाही. आता पुढे काय होते याची मी वाट पाहतो आहे. जर तुम्हाला कॅनडामध्ये किंवा भारतात सॉफ्टवेअर इंजिनियरची जागा किंवा नोकरी आढळल्यास, कृपया मला कळवा. हिमांशूची ही भावनिक पोस्ट सगळ्यांच्याच मनाला भिडणारी आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे. कारण मेटा आणि ट्विटरच्या टाळेबंदीला केवळ हिमांशूच बळी पडलेला नाही. याचा फटका जगभरातील हजारो कर्मचाऱ्यांना बसला आहे.

अधिक वाचा - Diabetes Control : वयाच्या 40-50 व्या वर्षी फास्टिंग शुगर 100-125mg/dl असेल तर आहे मधुमेहाचा धोका...पाहा कसे कराल नियंत्रण

META ची 13% कर्मचारी कपात

मार्क झुकरबर्गच्या फेसबुकची मूळ कंपनी असलेली मेटाने 13 टक्के म्हणजेच जवळपास 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. मार्क झुकेरबर्ग यांनी बुधवारी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महसूलात झालेली घसरण आणि तंत्रज्ञान उद्योगात सुरू असलेल्या संकटामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. मेटाने केलेल्या या मोठ्या कर्मचारी कपातीबद्दल झुकरबर्गने एका निवेदनात म्हटले आहे की, "दुर्दैवाने, माझ्या अपेक्षेप्रमाणे ते झाले नाही."

अधिक वाचा : Earthquake:देशात भूकंपाचे धक्के, दिल्ली-यूपीसह 7 राज्यांमध्ये हादरे; नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू

मस्कच्या ताब्यात गेल्यावर ट्विटरची कर्मचारी कपात 

याआधी इलॉन मस्कने ट्विटरबरोबरचा सौदा पूर्ण करत ट्विटर आपल्या ताब्यात घेतली आहे. ट्विटरच्या अधिग्रहणानंतर मस्कने धडाक्याने निर्णय घेत तेथील कर्मचार्‍यांना मोठ्या प्रमाणात बाहेरचा रस्ता दाखवला आहे. गेल्या आठवड्यात ट्विटरने आपल्या 7500 कर्मचाऱ्यांपैकी 50 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. हे एव्हढ्यावर थांबलेले नाही तर मस्क यांनी संकेत दिले आहेत की पुढे जाऊन ट्विटरमध्ये आणखी बरेच मोठे बदल होऊ शकतात.

यानंतर आता आणखी कोणत्या कंपन्या कर्मचारी कपात करण्याचा मार्ग धरतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी