२०२०मध्ये आहेत हे ७ मोठे विकेंड, पहा सुट्ट्यांची ही लिस्ट

काम-धंदा
Updated Dec 02, 2019 | 20:47 IST | टाइम्स नाऊ हिंदी

मोठा विकेंड प्लॅन तुम्हाला करायचा आहे तर तुमच्यासाठी पुढच्या वर्षात खुशखबर आहे. सणांसाठी असो वा भटकंतीसाठी, येत्या वर्षात या मोठ्या विकेंड्सची संधी सोडू नका.

List of holidays
२०२०मध्ये आहेत हे ७ मोठे विकेंड, पहा सुट्ट्यांची ही लिस्ट  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • मोठा विकेंड प्लॅन तुम्हाला करायचा आहे तर तुमच्यासाठी पुढच्या वर्षात खुशखबर आहे.
  • सणांसाठी असो वा भटकंतीसाठी, येत्या वर्षात या मोठ्या विकेंड्सची संधी सोडू नका.
  • वर्षातला पहिला मोठा विकेंड हा २१ फेब्रुवारी म्हणजेच महाशिवरात्रीच्या शुक्रवारी आहे.

मुंबई : नवीन वर्ष सुरू होण्याआधी आपल्यापैकी अनेकांना येणाऱ्या पुढच्या वर्षात किती सुट्ट्या, सण कधी आणि आपले वाढदिवस कोणत्या वारी अशा अनेक गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असते. मात्र सर्वात प्रिय असतात त्या आपल्या हक्काच्या सुट्ट्या. मग त्यातही आपण पाहतो की कोणती सुट्टी कोणत्या वारी येते, मग शनिवारी आणि रविवारला जोडून कोणत्या सुट्ट्या आहेत. या सुट्ट्या कळल्या की आपण प्लॅन करतो मस्त मोठा आणि आरामदायी विकेंड किंवा मग भटकंती. मोठ्या सुट्ट्या आल्या की बच्चे कंपनीलाही सुट्टी आलीच. मग असे डेस्टिनेशन तुमच्या बच्चे कंपनीसोबत शोधायला तुम्ही आतापासूनच सुरूवात करा.

मोठा विकेंड प्लॅन तुम्हाला करायचा आहे तर तुमच्यासाठी पुढच्या वर्षात खुशखबर आहे. २०२०ची सुरूवात ही बुधवारच्या सुट्टीपासून होत आहे, तर २६ जानेवारी रविवारी आहे. वर्षातला पहिला मोठा विकेंड हा २१ फेब्रुवारी म्हणजेच महाशिवरात्रीच्या शुक्रवारी आहे. हे मोठे विकेंड पुढच्या वर्षात आहेत खरे, केवळ २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन दिवसांची सुट्टी रविवार असल्याने वेगळी मिळणार नाही. सणांसाठी असो वा भटकंतीसाठी, येत्या वर्षात या मोठ्या विकेंड्सची संधी सोडू नका.

२०२०मधील सुट्ट्या आणि लांबसडक विकेंड खालीलप्रमाणे आहेत:

तारीख

वार

सुट्टी

१ जानेवारी

बुधवार

नववर्ष

२६ जानेवारी

रविवार

प्रजासत्ताक दिन

२१ फेब्रुवारी

शुक्रवार

महाशिवरात्री

१० मार्च

मंगळवार

होळी

१० एप्रिल

शुक्रवार

गुड फ्रायडे

२५ मे

सोमवार

रमजान ईद

३ ऑगस्ट

सोमवार

रक्षाबंधन

१५ ऑगस्ट

शनिवार

स्वातंत्र्य दिन

२२ ऑगस्ट

शनिवार

गणेश चतुर्थी

२ ऑक्टोबर

शुक्रवार

महात्मा गांधी जयंती

२५ ऑक्टोबर

रविवार

दसरा

१६ नोव्हेंबर

सोमवार

दिवाळी

३० नोव्हेंबर

सोमवार

गुरूनानक जयंती

२५ डिसेंबर

शुक्रवार

ख्रिसमस

अशाप्रकारे तुम्हाला येणाऱ्या नववर्षात ७ मोठाले विकेंड मिळणार आहेत. वर दिलेल्या लिस्टवरून तारखा तर तुम्हाला कळल्याच असतील मग भटकंतीचं नियोजन तर केलंच पाहिजे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी